Nanded | जोरदार पावसाने सहस्त्रकुंड धबधबा चांगलाच प्रवाहित, पर्यटकांची मोठी गर्दी!

| Updated on: Jul 05, 2022 | 2:53 PM

दरवर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यातच प्रवाहित होणारा धबधबा यंदा मात्र मॉन्सून लांबल्याने आता प्रवाहित झालाय. सध्या पावसाचे प्रमाण कमी असल्याने धबधब्याने अक्राळविक्राळ स्वरूप धारण केले नाही. मात्र संथपणे वाहणारे पाणी पाहण्यासाठी इथे आतापासूनच गर्दी होतेय. धबधब्याचे नयनरम्य दृश्य डोळ्यात साठवण्यासाठी प्रशासनाने उंच मनोरे तयार केले आहेत.

Nanded | जोरदार पावसाने सहस्त्रकुंड धबधबा चांगलाच प्रवाहित, पर्यटकांची मोठी गर्दी!
Image Credit source: tv9
Follow us on

नांदेड : नांदेड (Nanded) जिल्हात गेल्या काही दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावलीयं. यामुळे नांदेड जिह्यातील सहस्त्रकुंड इथला धबधबा चांगलाच प्रवाहित झालाय. आषाढ सरी जोरदार बरसतांना दिसत आहेत. त्यामुळे धबधब्याचे नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी इथे तरुणाईने गर्दी केलीय. किनवट (Kinwat) तालुक्यातील पैनगंगा नदीवर असलेला हा धबधबा कालपासून सुरू असलेल्या पावसाने चांगलाच प्रवाहित झालाय. आजसकाळपासूनच पर्यटकांनी मोठी गर्दी केलीयं. पाण्याचे उडणारे निसर्गनिर्मित तुषार मनमोहक ठरतायंत. पुढील काही दिवसांमध्ये पर्यटकांची (Tourists) गर्दी अजून वाढण्याची शक्यता वर्तवली जातंय.

धबधब्याचे नयनरम्य दृश्य डोळ्यात साठवण्यासारखेच

दरवर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यातच प्रवाहित होणारा धबधबा यंदा मात्र मॉन्सून लांबल्याने आता प्रवाहित झालाय. सध्या पावसाचे प्रमाण कमी असल्याने धबधब्याने अक्राळविक्राळ स्वरूप धारण केले नाही. मात्र संथपणे वाहणारे पाणी पाहण्यासाठी इथे आतापासूनच गर्दी होतेय. धबधब्याचे नयनरम्य दृश्य डोळ्यात साठवण्यासाठी प्रशासनाने उंच मनोरे तयार केले आहेत. या मनोऱ्यावर जाऊन निवांतपणे धबधबा पाहता येतोय, त्यातून पर्यटक आता मोठ्या प्रमाणात फोटोग्राफी करण्याचा आनंद देखील घेऊ शकता.

हे सुद्धा वाचा

सहस्त्रकुंड धबधब्याला जाण्याचा मार्ग

सहस्त्रकुंड धबधब्याला आपण रेल्वेने देखील जाऊ शकतो. नांदेड आणि आदिलाबाद येथून बऱ्याच रेल्वे आहेत. तसेच सहस्त्रकुंड धबधब्याला आपण बायरोड देखील जाऊ शकतो. नांदेड- भोकर- हिमायतनगर – इस्लापुर हुन सहस्त्रकुंडला जाता येऊ शकते. विदर्भातील पर्यटकांना उमरखेड हुन ढाणकी बिटरगाव मार्गे सहस्त्रकुंड पाहता येऊ शकते. जर सहस्त्रकुंड धबधबा बघण्यासाठी मुंबई येथील पर्यटकांना यायचे असेल तर त्यांच्यासाठी नंदीग्राम एक्सप्रेस ही रेल्वे गाडी आहे. धबधब्यामुळे थंड वारे देखील मोठ्या प्रमाणात वाहते.