नितेश राणे यांचं ट्वीट, अजित पवार यांची चिडचिड बघीतली, मग त्यांनी अजितदादांना म्हंटलं,…

हे लोकं रायगडला कधी नतमस्तक होताना दिसत नाही. यांचे चेलेपेले शिवाजी महाराज यांची घोषणा देताना दिसत नाहीत, असा घणाघातही नितेश राणे यांनी केला.

नितेश राणे यांचं ट्वीट, अजित पवार यांची चिडचिड बघीतली, मग त्यांनी अजितदादांना म्हंटलं,...
नितेश राणे
Follow us
| Updated on: Jan 05, 2023 | 4:45 PM

सिंधुदुर्ग : भाजपचे आमदार नितेश राणे यांनी आज ट्विट केलंय. त्या ट्विटबाबत बोलताना नितेश राणे म्हणाले, काल अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांची चिडचिड बघितली. महाराष्ट्रानं आता अजित पवार यांना धरणवीर अशी अधिकृत पदवी दिलेली आहे. त्यानंतर त्यांची चिडचिड अपेक्षित होती. महाराष्ट्राचे धरणवीर कोण, असं आता गुगलवर टाकलं तरी नाव अजित पवारचं येणार, अशी गुगली नितेश राणे यांनी टाकली. खालच्या पातळीवर टीका केल्याशिवाय समाधान होणार नाही, हे अजित पवार यांना चांगलं माहीत होतं. त्यांनी त्या पद्धतीचं वक्तव्य केलेलं आहे. त्याबद्दल मला काहीही वाईट वाटलं नसल्याचंही नितेश राणे म्हणाले.

आम्ही सोडलेला बाण योग्य जागी जाऊन लागला आहे. याचं मला अधिक समाधान वाटलं. मुद्दा मला टिल्लू असा बोलावण्याचा नाहीय. या टिल्लूनी तुम्हाला सिंधुदुर्ग बँकेच्या निमित्तानं कसा घाम फोडला. हे उभ्या महाराष्ट्रानं बघीतलं आहे.

मुद्दा असा आहे की, यांना छत्रपती संभाजी महाराज यांना हिंदू धर्मापासून वेगळं करायचं आहे. कारण हे औरंगजेबबरोबर व्हॅलेंटाईन साजरा करणारे लोकं आहेत, अशी टीकाही नितेश राणे यांनी केली.

हिंदू धर्माचा त्याग संभाजी महाराज यांनी केला नाही. औरंग्यासमोर झुकले नाहीत, हे त्यांना सहन होत नाही. संभाजी महाराज यांना धर्मवीर म्हणणं हे ते स्वीकारणार नाही, हे आम्हाला पहिलेपासून माहिती आहे, असं राणे म्हणाले.

हे लोकं रायगडला कधी नतमस्तक होताना दिसत नाही. यांचे चेलेपेले शिवाजी महाराज यांची घोषणा देताना दिसत नाहीत, असा घणाघातही नितेश राणे यांनी केला.

Non Stop LIVE Update
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.