‘एक खोका, मतदाराला धोका’ ठाकरे सेनेच्या नगरसेवकाने शिंदे गटात प्रवेश करताच मतदार संतापले, केली मोठी मागणी
Dharashiv Shivsena Conflict: खासदार ओमराजे निंबाळकर यांनी उद्धव सेनेला रामराम ठोकला आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना जवळ केली. त्यांच्यानंतर काही नगरसेवक, पदाधिकारी यांनी सुद्धा तोच कित्ता गिरवला. धाराशिवमध्ये पक्षांतरानंतर राजकारण तापलं आहे. मतदारांनीच नगरसेवकाच्या विरोधात बॅनर झळकवले आहे.

खासदार ओमराजे निंबाळकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला दोन महिन्यांपूर्वी रामराम ठोकला. त्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सत्ता पक्षात प्रवेश केला. ठाकरे सेनेतील 9 पैकी 6 आमदार फुटले. त्यात निंबाळकर हे सुद्धा होते. त्यानंतर धाराशिव जिल्ह्यात काही जण त्यांच्या मागे गेले. काहींनी शिंदे सेना जवळ केली. या नगरसेवकानेही तोच कित्ता गिरवला. पण वॉर्डातील मतदारांना हे पक्षांतर काही रुचले नाही. त्यांनी त्यांचा रोष बॅनरद्वारे व्यक्त केला. त्यांनी नगरसेवकाविरोधातच बॅनर झळकावले. त्याची राज्यभर चर्चा सुरू झाली आहे.
एक खोका, मतदाराला धोका
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या चार नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर धाराशिव शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. धाराशिवमध्ये पक्षांतरानंतर राजकारण तापलं आहे. नगरसेवकांच्या घरासमोर मतदारांनी बॅनर झळकावले आहे. धाराशिव शहरातील समता कॉलनीमध्ये ठाकरे शिवसेनेचे नगरसेवक संतोष घाडगे यांच्या घरासमोर संतप्त आशयाचे बॅनर झळकले आहेत. एक खोका, मतदाराला धोका या आशयासह इतर आरोप या बॅनवर करण्यात आले आहेत. आपण निवडून दिलेल्या नगरसेवकाविरोधातच वॉर्डातील मतदारांनी संताप व्यक्त केला आहे.
“आमचे मत आम्हाला परत द्या”
पक्षांतराचा निषेध करत या बॅनरमधून मतदारांनी आपला संताप व्यक्त केला आहे. “आमचे मत आम्हाला परत द्या”, “एक खोका, मतदाराला धोका”, “हा शिक्का पुसला जाणार नाही”, “एक कोटीचा गद्दार” अशा आशयाचे आरोप करणारे मजकूर बॅनरवर झळकत आहेत. नगरसेवक संतोष घाडगे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांच्या मतदारसंघातच अशा प्रकारचे बॅनर लागल्याने पक्षांतराच्या मुद्द्यावरून स्थानिक पातळीवर नाराजी उफाळून आल्याचे चित्र आहे.
धाराशिवमध्ये उद्धव सेनेच्या नगरसेवकांची पळवापळवी
खासदार ओमराजे निंबाळकर यांनी शिंदे सेनेत प्रवेश केल्यापासून जिल्ह्यातील उद्धव सेनेच्या नगरसेवकांची पळवापळवी सुरू झाली आहे. कळंब नगर परिषदेतील उद्धव ठाकरे गटातील 10 नगरसेवक अगोदरच भाजपमध्ये दाखल झाले आहेत. तर धाराशिव शहरातील नगरसेवकांनाही भाजपमध्ये आणण्याचा प्रयत्न सुरू होता. पण खासदार ओमराजे निंबाळकर यांनी ऑपरेशन टायगर राबवत ऑपरेटन लोट्सला ब्रेक लावल्याचा दावा करण्यात येत आहे. उद्धव सेनेतील नगरसेवकांच्या या पळवापळीने मतदारांमध्ये मात्र असंतोष वाढत असल्याचे दिसून येत आहे.