AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nepal Flood: अख्खं मार्केट वाहून गेलं, फक्त प्रेतं वाहून येत होती… नुसता मृतदेहांचा खच, प्रत्यक्षदर्शीने जे सांगितलं त्याने सर्वच हादरले

Nepal Flood: नेपाळमध्ये आलेल्या पुरामुळे अनेक गावं उद्ध्वस्त झाली आहेत. एका प्रत्यकदर्शीने जे काही सांगितले ते ऐकून सर्वजण हादरले आहेत. हे लोक स्वत:चा जीव वाचवण्यासाठी एका डोंगरावर गेले.

Nepal Flood: अख्खं मार्केट वाहून गेलं, फक्त प्रेतं वाहून येत होती... नुसता मृतदेहांचा खच, प्रत्यक्षदर्शीने जे सांगितलं त्याने सर्वच हादरले
nepal flash FloodImage Credit source: tv9 Marathi
| Updated on: Aug 27, 2026 | 12:52 PM
Share

नेपाळमध्ये अचानक आलेल्या पुरामुळे अनेक गावं उद्ध्वस्त झाली आहेत. अनेक ठिकाणी गावेच्या गावे वाहून गेली आहेत. तर काही ठिकाणी बाजार पेठा वाहून गेल्या आहेत. आतापर्यंत 165 लोकांच्या मृत्यूची पुष्टी झाली आहे. एक हजाराहून अधिक लोक बेपत्ता आहेत. यात ३०० हून अधिक भारतीय समाविष्ट आहेत. नेपाळमधील पुराच्या परिस्थितीत तेथील लोकांच्या कहाण्या ऐकून हृदय हेलावून टाकले आहे.

त्रिशूली रिव्हर पॉईंटपासून सुमारे ३२ किलोमीटर दूर बैरेनीमध्ये जिथे संपूर्ण हाईवेवर महापूर आला, तिथल्या लोकांचे म्हणणे आहे की याआधी असे कधीच झाले नाही. कारण इथे आसपास कोणतीही नदीही नाही. लोकांनी सांगितले की घरे आणि दुकानांमध्ये महापुराचा मलबा घुसला. महापूरामुळे सगळे काही वाहून गेले आहे. लोकांनी सांगितले की मलबा ज्या मार्गाने आला, त्याच मार्गाने परतही गेला. आपत्तीनंतर बुलडोझरने हायवेच्या मध्यभागातून मलबा हटवण्यात येत आहे.

प्रेते वाहून येत होती – पूरग्रस्त

पूरग्रस्तांनी सांगितले की वरून पाण्याचा प्रवाह येत होता. या पाण्यात अनेक प्रेते वाहून येत होती. गाड्या वाहत होत्या. आम्ही डोंगरावर गेलो होतो. म्हणून वाचलो. प्राणी इथेच सोडून गेलो होतो, बहुतेक वाहून गेले. एका व्यक्तीने सांगितले की असे यापूर्वी कधीच पाहिले नाही. लोक म्हणत आहेत की चीनचा डॅम फुटला म्हणून असे झाले. महापूर खूप जास्त होता, लोक पळत होते. प्राण जात होते.

एका स्थानिक व्यक्तीने सांगितले की, ‘‘घरे वाहून गेली आहेत. इथे सर्व पूल वाहून गेले, त्रिशूली बाजाराजवळ ४० पूल वाहून गेले. त्रिशूली बाजार वाहून गेला, देवी घाटही वाहून गेला. शाळाही होती, तीही वाहून गेली. देवी घाटात पुढे रस्ताच नाही.’’ पूरग्रस्त एकाने म्हटले की कधी असे पाहिले नाही. हाईवे पूर्ण वाहून गेला. त्रिशूली हाईवे पूर्ण बंद आहे.

नेपाळमध्ये पूर कसा आला?

चीन-नेपाळ सीमेवरील रसुवागढीजवळ असलेल्या तिमुरे येथे सर्वप्रथम पुराचा तडाखा बसला. रसुवागढीपासून सुमारे २० किलोमीटर वरच्या बाजूस झालेल्या हिमस्खलनामुळे ल्हेंडे नदीचा प्रवाह अडवला गेला, ज्यामुळे पूर आला. विनाशनंतर भारताने नेपाळला मदत पाठवली. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांना फोन केला आणि मदतीचे आश्वासन दिले. त्यानंतर भारतीय वायुसेना मदत सामग्री घेऊन नेपाळला पोहोचली आहे.

Follow Us
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
अभिजीत दीपके आजीच्या अंत्यदर्शनाला मुकले; दिल्ली पोलिसांच्या कारवाई...
अभिजीत दीपके आजीच्या अंत्यदर्शनाला मुकले; दिल्ली पोलिसांच्या कारवाईमुळे नातेवाईकांची तीव्र नाराजी
दिल्लीतील 57 मेट्रो स्थानके बंद; सर्वोच्च न्यायालयात गृह सचिवांविरोधात
दिल्लीतील 57 मेट्रो स्थानके बंद; सर्वोच्च न्यायालयात गृह सचिवांविरोधात अवमान याचिका! सुनावणी सुरु