Video: अगोदर माईकवर सॅनिटायझर फवारणी, मेरे सपनोंका गोंदिया अभी बना नही, प्रफुल पटेलांचा शायराना अंदाज

| Updated on: Oct 18, 2021 | 2:29 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यसभा खासदार प्रफुल पटेल यांनी कोरोना नियमांबाबत सतर्कता दाखवून दिली आहे. गोंदियातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात बोलताना त्यांनी माईकवर सॅनिटायझर फवारणी केली.

Video:  अगोदर माईकवर सॅनिटायझर फवारणी,  मेरे सपनोंका गोंदिया अभी बना नही, प्रफुल पटेलांचा शायराना अंदाज
प्रफुल पटेल
Follow us on

गोंदिया: राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यसभा खासदार प्रफुल पटेल यांनी कोरोना नियमांबाबत सतर्कता दाखवून दिली आहे. गोंदियातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात बोलताना त्यांनी माईकवर सॅनिटायझर फवारणी केली. सॅनिटायझर फवारणीनंतर त्यांनी भाषणाला सुरुवात केली. मेरे सपनोंका गोंदिया बना नही, अशी शायरी देखील त्यांनी केली. गोंदिया शहराचा विकास साधायचा असल्यास येत्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉग्रेसला बळकट करा, असे पटेल म्हणाले.

सॅनिटायझर फवारणी

राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात भाषणाला सुरुवात करण्यापूर्वी प्रफुल पटेल यांनी पहिल्यांदा माईकवर सॅनिटायझर फवारणी केली. प्रफुल पटेल यांच्या या कृतीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात एकदा पत्रकारांच्या बुमवर सॅनिटायझर फवारणी केली होती.

मेरे सपनोंका गोंदिया बना नही

आगामी जिल्हा परिषद तसेच नगर पालिका निवडणूक पाहता सर्वच राजकीय पक्षानी आपल्या मोर्चे बांधणीला सुरवात केली आहे. गोंदिया जिल्ह्यात लवकरच होणाऱ्या नगर परिषदेच्या निवडणुका पाहता राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षातर्फे गोंदियात कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे नेते खासदार प्रफुल पटेल राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचा उमेदवाराना निवडून देण्याचं आवाहन केलं. आजभी मेरे सपनोंका गोंदिया बना नही, अशा शायरीतून त्यांची खंत बोलून दाखवली. तर गोंदिया शहराचा विकास साधायचा असल्यास येत्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉग्रेसला बळकट करा, असे पटेल म्हणाले.

गोंदियात धान उत्पादक संकटात

गोंदिया जिल्हात खरीप हंगामातील धान अंतिम टप्प्यात आहे. परंतु, मागील काही दिवसापासून धान रोगावर किडीचा प्रादुर्भाव झाल्याची बाब समोर आल्याने शेतकऱ्यांना धान पीक उत्पादनात घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जिल्हात भात पिकाचे उत्पादन घेणारा शेतकरी सध्या चिंताग्रस्त दिसत आहे. शेतकऱ्यांनी धान पिकाची लागवड केली आहे. औषध उपचार व अनेक उपाय योजना करून सुद्धा धानावर वातावरणाचा परिणाम झाला आहे. धानावर कडाकरपा सह विविध रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. खरीप हंगामातील धान पीक अंतिम टप्प्यात असताना अवकाळी पावसाने धूमाकाळ घातला. परिसरात कडाकरपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. अनेक वेळा कीडनाशक फवारणी करूनही रोग आटोक्यात आले नाही. दरम्यान, लोम्ब निघाले मात्र धान भरले नाही. रोगाच्या प्रादुर्भावामुळे उत्पादन मोठया प्रमाणात घटण्याची शक्यता आहे.

इतर बातम्या

शरद पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी सह्याद्रीवर, वळसे-पाटीलही पोहोचले; चर्चा नेमकी कशावर?

औरंगाबाद: डॉ.राजन शिंदे यांच्या खुनातील शस्त्र अखेर सापडले, डंबेल, चाकू अन् टॉवेल पोलिसांच्या हाती, गुन्ह्याचा उलगडा लवकरच

Praful Patel spray sanitizer on mike video viral on social media