AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video Vijay Vadettiwar | राणा, राज प्रकरणात विजय वडेट्टीवार यांनी एंट्री; चंद्रपुरात वडेट्टीवारांची जीभ घसरली

अरे घरोघरी हनुमान चालीसा वाचला जातो. हिंदू धर्मात लग्नापूर्वी हनुमानचींच दर्शन करावं लागतं. हे आम्हाला सांगतील का की, आम्ही हनुमान चालीसा वाचावा. ज्यानं त्यानं आपआपल्या धर्माचं पालन केलं पाहिजे, असंही विजय वडेट्टीवार म्हणाले.

Video Vijay Vadettiwar | राणा, राज प्रकरणात विजय वडेट्टीवार यांनी एंट्री; चंद्रपुरात वडेट्टीवारांची जीभ घसरली
मंत्री विजय वडेट्टीवारImage Credit source: tv 9
| Edited By: | Updated on: Apr 24, 2022 | 5:44 PM
Share

चंद्रपूर : राणा-राज प्रकरणात राज्याच्या मदत-पुनर्वसन मंत्र्यांनी उडी घेतली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथे काँग्रेसच्या आरोग्य शिबिरातील भाषणात मंत्री विजय वडेट्टीवार यांची जीभ घसरली. राज ठाकरे यांच्या भोंगा उतार-झेंडा बदलू भूमिकेवर वडेट्टीवार यांनी सडकून टीका केली. राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा XXX ( पायजामा) फाटलाय अशी भाषा वडेट्टीवार यांनी वापरली. राणा दाम्पत्याने राज्य-मुंबईची कायदा-सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत दाम्पत्यासाठी XXX अशा शब्दांचा वापर त्यांनी केला. राणा दाम्पत्याने (Rana couple) हनुमान चालीसाचे (Hanuman Chalisa) महत्व आम्हाला सांगू नये अशी टीका त्यांनी केली.

राणा दाम्पत्यानं कायदा सुव्यवस्था बिघडवली

विजय वडेट्टीवार म्हणाले, राणा दाम्पत्यानं कोणतंही काम नसताना विनाकारण आतंक माजविला आहे. दिल्ली, मुंबईला वेठीस धरले आहे. मुंबईला अशांत करण्याचा प्रयत्न केला. कायदा आणि सुव्यवस्था बिघाडण्याचं काम केलंय. हे सर्व करण्यामागे यांचा उद्देश काय आहे, हे कळत नाही. आम्ही म्हंटल की, मुख्यमंत्री ठाकरे यांनी हनुमान चालीसा म्हणावं. नाहीतर आम्ही मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा म्हणू.

पाहा व्हिडीओ

नेमकं काय म्हणाले वडेट्टीवार

अरे तुमच्या बापाचं काय चाललं, अशा शब्दात विजय वडेट्टीवार यांनी राणा दाम्पत्याला फैलावर घेतलं. तुम्हाला म्हणायचं आहे तर म्हणा. जिथं वाचायचं तिथं वाचा. नाही नाही उद्धवजी ठाकरे यांनी वाचलं पाहिजे. ठाकरे काय तुमच्या बापाचे … आहेत काय. असे काही नालायक लोकं या देशात झाले आहेत. आपआपसात झगडा करण्यासाठी हनुमान चालीसा वाचावा. अरे घरोघरी हनुमान चालीसा वाचला जातो. हिंदू धर्मात लग्नापूर्वी हनुमानचींच दर्शन करावं लागतं. हे आम्हाला सांगतील का की, आम्ही हनुमान चालीसा वाचावा. ज्यानं त्यानं आपआपल्या धर्माचं पालन केलं पाहिजे, असंही विजय वडेट्टीवार म्हणाले.

Akola Shiv Sena | भोंगा कोणाचा, हनुमान चालीसा कोण बोलतेय? सचिन अहीर यांची भाजपवर खोचक टीका!

Nagpur Crime | हैदराबादवरून एमपीकडं जाणारा 197 किलो गांजा जप्त, नागपूर गुन्हे शाखेची मोठी कारवाई

Anil Bonde | राज्यात आणीबाणीची परिस्थिती; अनिल बोंडे म्हणतात, शिवसेनेची ही शेवटची फडफड, कारण काय?

CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.