सांगली महापालिकेने उभारलं कार्पोरेट दर्जाचं वाचनालय, अभ्यासिकेतून अनेक मोठे अधिकारी घडतील, मनपा आयुक्तांना विश्वास

सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेने कार्पोरेट दर्जाचे वाचनालय आणि अभ्यासिका सुरु केली आहे. महापालिकेकडून वि.स. खांडेकर वाचनालयाचे नूतनीकरण करण्यात आले आहे.

सांगली महापालिकेने उभारलं कार्पोरेट दर्जाचं वाचनालय, अभ्यासिकेतून अनेक मोठे अधिकारी घडतील, मनपा आयुक्तांना विश्वास
सांगली महापालिकेकडून अद्ययावत दर्जाचं वाचनालय अभ्यासिका

सांगली :  सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेने कार्पोरेट दर्जाचे वाचनालय आणि अभ्यासिका सुरु केली आहे. महापालिकेकडून वि.स. खांडेकर वाचनालयाचे नूतनीकरण करण्यात आले आहे. या अद्ययावत अभ्यासिकेच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी मोठ्या पदापर्यंत पोहचतील असा विश्वास मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी व्यक्त केला आहे. एखाद्या खासगी इन्स्टिट्यूटप्रमाणे महापालिकेने पाहिली कॉर्पोरेट अभ्यासिका बनवल्याचे आयुक्त कापडणीस यांनी सांगितले.

महानगरपालिका क्षेत्रामधील सर्वात जुनं वाचनालय

सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका वि. स. खांडेकर वाचनालयाची अद्यावत इमारची स्थापना 16 एप्रिल 1975 साली झाली आहे. महानगरपालिका क्षेत्रामधील सर्वात जुने वाचनालय असून शहराचे एक प्रमुख सांस्कृतिक केंद्र म्हणून ओळख आहे. या वाचनालयास शासनाकडून अ वर्ग दर्जाचे उत्कृष्ट ग्रंथालय म्हणून सन 1990 मध्ये मानाचा प्रथम क्रमांकाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार पुरस्कार देऊन सन्मानीत केले आहे.

स्पर्धा परीक्षा करण्याऱ्या विद्यार्थ्यांसाठी अद्ययावत अभ्यासिका

तसेच शहरी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या तयारीकरिता 1984 पासून अभ्यासिकेची सोय उपलब्ध करुन दिली आहे. त्याचा लाभ घेऊन विद्यार्थी राज्य शासनाच्या उच्च पदावर काम करीत आहेत. या अभ्यासिकेची सुरवात 15 टेबल आणि केवळ एक रुपया महीना फी पासून सुरु झाली होती. आज त्याच अभ्यासिकेचे अदयावत नुतनिकरण होत असून त्यामधून शहर व ग्रामीण भागातील विद्यार्थीना यूपीएससी, एमपीएससी व इतर स्पर्धा परीक्षेची पूर्व तयारीसाठी ही अदयावत अभ्यासिका उपलब्ध करून देण्यात आली आहे.

कार्पोरेट अभ्यासिकेप्रमाणे महापालिकेकडून वाचनालयाचे नूतनीकरण

या अभ्यासिकेत वायफाय कनेक्शन, बसण्यासाठी उत्तम व्यवस्था, एलसीडी स्क्रिन, पाण्याची, स्वछतागृहाची सोय करण्यात आली आहे. तसेच सर्वप्रकारची वाचनीय पुस्तके सुद्धा उपलब्ध करून देण्यात आली आहेत. याचबरोबर खासगी कार्पोरेट अभ्यासिकेप्रमाणे महापालिकेकडून वि.स. खांडेकर वाचनालयाचे नूतनीकरण करण्यात आले आहे. “या माध्यमातून अनेक विद्यार्थी याठिकाणी अभ्यास करून मोठ्या पदावर पोहोचतील. सध्या कोविड परिस्थितीमुळे अभ्यासिका सुरू केलेली नाही मात्र लवकरच कोव्हिड नियमांचे पालन करून अभ्यासिकेला परवानगी दिली जाईल”, असेही आयुक्त नितीन कापडणीस यांनी सांगितले.

(Sangali municipal Carporation set up a corporate level VS Khandekar library)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI