AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पंधरा दिवसापूर्वीच थाटामाटात विवाह, पण संसार सुरु होण्याआधीच नवविवाहित जोडप्याचा करुण अंत

डोळ्यात नवीन संसाराची स्वप्ने घेऊन नवविवाहित जोडपे देवदर्शनाला गेले. देवाचे दर्शन घेऊन नव्या संसाराची सुरुवात करणार होते. मात्र नियतीच्या मनात काही वेगळेच होते.

पंधरा दिवसापूर्वीच थाटामाटात विवाह, पण संसार सुरु होण्याआधीच नवविवाहित जोडप्याचा करुण अंत
लग्नाच्या दुसऱ्या दिवशी नवरीचे पलायनImage Credit source: socialmedia
| Updated on: Apr 04, 2023 | 1:41 PM
Share

सांगली / शंकर देवकुळे : विवाह हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्वाचा क्षण असतो. विवाहानंतर प्रत्येकाच्या नवीन आयुष्याला सुरवात होते. नव्या संसाराची नवी स्वप्ने डोळ्यात असतात. अशीच स्वप्ने डोळ्यात घेऊन नवविवाहित ढमणगे जोडपे देवदर्शनाला गेले होते. मात्र डोळ्यातली स्वप्न पूर्ण होण्याआधीच जोडप्याचा अंत झाल्याची धक्कादायक घटना घडली. कर्नाटक राज्यातून देवदर्शन घेऊन परतत असतानाच नवदाम्पत्याचा कार अपघातात करुण अंत झाला. कर्नाटक राज्यातील हलूर जवळील जत-जांबोटी महामार्गावर ट्रक आणि कार अपघात घडला. यात नवविवाहित जोडपे ठार झाले, तर आई-वडिल जखमी झाले आहेत. जखमी आई-वडिलांवर इस्लामपूर येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

नवविवाहित जोडपे आई-वडिलांसह देवदर्शनाला गेले होते

इस्लामपूर येथील रहिवासी असलेल्या ढमणगे कुटुंबातील इंद्रजित ढमणगे या तरुणाचा 18 मार्च रोजी कल्याणी हिच्याशी विवाह झाला. इंद्रजित हा मुंबईत टीसीएस कंपनीत नोकरी करत होता. विवाहानंतर दोघे जण आई-वडिलांसह कर्नाटक राज्यातील शाकंभरी देवीच्या दर्शनाला गेले होते. देवीचे दर्शन घेऊन शनिवारी सर्व कुटुंबीय आपल्या कारने घरी परतत होते.

देवदर्शनाहून परतत असताना कारला अपघात

समोरुन येणाऱ्या ट्रकला कारने धडक दिली

परतीच्या प्रवासात असतानाच मुडलंगी जवळीस हलूर येथे समोरुन येणाऱ्या ट्रकला त्यांच्या कारने धडक दिली. या धडकेत इंद्रजित आणि कल्याणीच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर इंद्रजितचे आई-वडिल मोहन ढमणगे आणि मिनाक्षी ढमणगे हे दोघेही गंभीर जखमी असून, त्यांच्यावर इस्लामपूर येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मयत नवविवाहित जोडप्यावर अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.