नाना पटोलेंचं वक्तव्य महाराष्ट्राला न शोभणारं, काँग्रेसचा हिंदू-मुस्लीम वाद सुरु करण्याचा प्रयत्न, संजय कुटेंची टीका

| Updated on: Oct 24, 2021 | 9:21 AM

काँग्रेस नेते नाना पटोले यांनी असं वक्तव्य करणे हे अतिशय दुर्दैवी असून हे त्यांची प्रवृती दाखवून देणारे वक्तव्य आहे. मुस्लिमांना भाजपच्या विरोधात करण्याचा हा प्रयत्न असल्याची टीका देखील भाजप नेते संजय कुटे यांनी केलीय.

नाना पटोलेंचं वक्तव्य महाराष्ट्राला न शोभणारं, काँग्रेसचा हिंदू-मुस्लीम वाद सुरु करण्याचा प्रयत्न, संजय कुटेंची टीका
नाना पटोले संजय कुटे
Follow us on

बुलडाणा: नाना पटोले यांचे वक्तव्य म्हणजे हिंदू मुस्लिम तुष्टीकरणाचा प्रयत्न आहे. आता आपण सत्तेत येणार नाही या भीतीपोटी काँग्रेसकडून हिंदू मुस्लीम वाद सुरू करण्यात येतोय, असा आरोप नाना पटोले यांच्या वक्तव्यावर संजय कुटे यांनी केलाय. एनसीबीने शाहरुख खानच्या मुलावर केलेली कारवाई म्हणजे भाजपकडून हिंदू-मुस्लीम ध्रुवीकरणाचा कट शिजत असल्याचे असल्याचे वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले होते.

काँग्रेस नेते नाना पटोले यांनी असं वक्तव्य करणे हे अतिशय दुर्दैवी असून हे त्यांची प्रवृती दाखवून देणारे वक्तव्य आहे. मुस्लिमांना भाजपच्या विरोधात करण्याचा हा प्रयत्न असल्याची टीका देखील भाजप नेते संजय कुटे यांनी केलाय.

नाना पटोलेंचं वक्तव्य महाराष्ट्राला न शोभणारं

आपण पुन्हा सत्तेत येणार नाही, या भीतीपोटी पटोले यांनी असे वक्तव्य करून हिंदू मुस्लीम तुष्टीकरणाचा हा प्रयत्न केलाय.त्यांचे हे वक्तव्य महाराष्ट्राला न शोभणारे असल्याची प्रतिक्रिया भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष आ. डॉ. संजय कुटे यांनी दिलीय.. ते बुलडाणा येथे सुरु असलेल्या भाजपाच्या निवासी प्रशिक्षण वर्गाच्या समारोपाच्या कार्यक्रमाला आले असताना बोलत होते.

नाना पटोले नेमकं काय म्हणाले?

लोकांच्या प्रश्नांशी भाजपला काही देणं घेणं नाही त्यामुळे ईडी आणि सीबीआय चौकशी लावणं हे भाजपकडून केलं जातंय. भाजप मूळ प्रश्नांवर काम करत नाही, सावरकर आणतील, कधी वल्लभभाई आणतील, आपला देश या पलीकडे चाललाय. आम्हाला नागरिक शास्त्र शिकवायची भाषा करतात. हे प्रश्न विचारण्याचे त्यांची लायकी नाही, अशी टीका नाना पटोले यांनी केली होती. आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी मुस्लीम आणि हिंदू वाद निर्माण करण्याचं काम भाजप करत आहे, अशी टीका नाना पटोलेंनी केली होती.

इतर बातम्या:

SuperFast News | सुपरफास्ट 50 गाव 50 बातम्या | 24 October 2021

T20 World Cup 2021 IndvsPak live streaming: जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येईल भारत- पाकिस्तानचा हाय व्होल्टेज सामना

Sanjay Kute said Nana Patole trying to polarization of Hindu Muslim with statement on Aryan Khan Case