गडचिरोली जिल्ह्यात नवे निर्बंध, दुकाने 4 वाजेपर्यंतच सुरु ठेवता येणार, जाणून घ्या काय बंद काय सुरु ?

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका टाळण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यात नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

गडचिरोली जिल्ह्यात नवे निर्बंध, दुकाने 4 वाजेपर्यंतच सुरु ठेवता येणार, जाणून घ्या काय बंद काय सुरु ?
लॉकडाऊन प्रतिकात्मक फोटो

गडचिरोली : राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी अजूनही धोका पूर्णपणे टळलेला नाही. डेल्टा प्लस या उत्परिवर्तीत कोरोना विषाणूमुळे कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका टाळण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यात नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. (schools cinema halls will be closed in Gadchiroli know all details of Corona lockdown new rule)

सार्वजनिक कार्यक्रमांच्या उपस्थितीवरही मर्यादा

जिल्हाधिकारी कार्यालयाने नुकतेच नवे निर्बंध जारी केले आहेत. या नव्या निर्बंधानुसार उद्यापासून (28 जून) सर्व आस्थापना तसेच दुकाने दुपारी 4 वाजेपर्यंतच सुरु राहणार आहेत. तसेच सार्वजनिक कार्यक्रमांच्या उपस्थितीवरही मर्यादा घालण्यात आली आहे. दुपारी चार वाजल्यानंतर अत्यावश्यक सेवेची दुकाने वगळता सर्व दुकाने बंद राहतील.

गडचिरोली जिल्ह्यात काय बंद काय सुरु ? नवे नियम कोणते ?

शासनाने राज्यात निर्बंध लागू केल्यानंतर गडचिरोली जिल्ह्यातही स्टेज 3 नूसार कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनेंतर्गत नवे निर्बंध जारी करण्यात आले आहेत. हे नवे निर्बंध उद्या (28 जून) पासून लागू होतील. जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी दीपक सिंगला यांनी याबाबत लेखी आदेश जारी केले आहेत.

1) सर्व प्रकारच्या खासगी आस्थापनांसह दुकाने, हॉटेल सकाळी 7 ते दुपारी 4  वाजेपर्यंत सुरू ठेवता येतील.

2) अत्यावश्यक सेवा, कृषि विषयक सेवेची दुकाने संपूर्ण आठवडाभर सुरू राहतील. तर उर्वरित सर्व दुकाने शनिवार व रविवारी बंद असतील.

3) याबरोबरच सार्वजनिक कार्यक्रम व लग्न समारंभाकरीता फक्त 50 लोकांच्या उपस्थितीला मंजुरी असेल.

4) शाळा महाविद्यालये पुढील आदेशापर्यंत विद्यार्थ्यांच्या उपस्थितीसह सुरू करण्यास मनाई करण्यात आली आहे.

5) रेस्टॉरंट, उपहारगृहे आठवड्यामध्ये सोमवार ते शुक्रवारपर्यंत सकाळी 7 ते दुपारी 4 वाजेपर्यंत 50 % डायनिंग क्षमतेसह सुरू ठेवण्याची मुभा असेल.

6) खासगी/शासकीय कार्यालयातील उपस्थिती 50% असेल.

इतर बातम्या :

Maharashtra Coronavirus LIVE Update : औरंगाबादेत सुट्टीच्या दिवशी लसीकरण केंद्रावर तुफान गर्दी

Video | आरक्षण विषयाचे राजकरण करु नये, हा एक सामाजिक समतेचा विषय : संजय राऊत

आम्ही निवडणूक आयोगाला मनुष्यबळ देणार नाही, काय करायचं ते करा : विजय वडेट्टीवार

(schools cinema halls will be closed in Gadchiroli know all details of Corona lockdown new rule)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI