VIDEO: चक्क रुग्णाच्या वॉर्डात घाणीचे साम्राज्य, धुळ्यात शासकीय रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

| Updated on: Aug 26, 2021 | 11:44 AM

धुळे शहरालगत असणाऱ्या भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या वॉर्डातच चक्क घाणीचं साम्राज्य असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे

VIDEO: चक्क रुग्णाच्या वॉर्डात घाणीचे साम्राज्य, धुळ्यात शासकीय रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
Follow us on

धुळे : एकिकडे कोरोना विरोधात लढाईबाबत आरोग्य यंत्रणा तयार असल्याचा दावा सरकार करत आहे. दुसरीकडे सरकारी रुग्णालयांची स्थिती मात्र वेगळंच काही तरी सांगतेय. धुळे शहरालगत असणाऱ्या भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या वॉर्डातच चक्क घाणीचं साम्राज्य असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे विविध आजारांवर उपचार घेणाऱ्या रुग्णाच्या विभागात घाणीचे साम्राज्य असेल तर रुग्णाचे आरोग्य सुधारणार तरी कसे? असा सवाल सर्व सामान्य नागरिक उपस्थित करत आहे.

राजकीय पक्षांकडून वारंवार प्रश्न उपस्थित, मात्र रुग्णालय प्रशासनाकडून दुर्लक्षच

हिरे शासकीय रुग्णालयाच्या वॉर्ड नं 33 च्या महिला वॉर्डासह इतर वॉर्डात मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे रुग्णांचे आरोग्य बरे होण्याऐवजी आणखी बिघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यावर विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी ही बाब निदर्शनास आणून दिली. मात्र, त्यानंतर देखील रुग्णालय प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष होतंय. या रुग्णालयात दर महिन्याला स्वच्छतेवर लाखो रुपये होणारे खर्च केला जातो, ते पैसे कुठं जातात? असाही प्रश्न आता विचारला जातोय.

“स्वच्छता कर्मचाऱ्यांसह मेडिकल ऑफिसर काय करतात?”

स्वच्छता कर्मचाऱ्यांसह मेडिकल ऑफिसर काय करतात? नागरिकांच्या आरोग्याशी होणारा खेळ कधी थांबेल? असे विविध प्रकारचे प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत. हिरे रुग्णालयाचे अधिष्ठाता सापळे यांना नुकत्याच काही पक्षांसह संघटनानी याबाबत पूर्व कल्पना दिली. मात्र, त्यानंतरही याकडे दुर्लक्ष होतंय. यामागे नेमकं कारण काय? यामागे काही आर्थिक हितसंबंध आहेत का? हे प्रश्न आता संशोधनाचा भाग आहे.

“रुग्णालय प्रशासनाकडून अस्वछतेचा कळस का?”

दररोज जिल्ह्यासह पर जिल्ह्यातून गोरगरीब, गरजू रुग्ण विविध आजारांवरील उपचार करण्यासाठी शासन मान्यता असलेले भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात येत असतात. त्यांच्यावर विविध प्रकारचे उपाय करून बरेच रुग्ण बरे होऊन घरी देखील जातात. मात्र, आता प्रशासनाने अस्वछतेचा कळस गाठलाय का? असा संतप्त सवाल रुग्णाच्या नातेवाईकांनी केला आहे.

“गलथान कारभाराला जिल्हाधिकारी बुस्टर डोस देतील का?”

जिल्ह्यात डेंग्यू, मलेरिया, टायफाईडने डोके वर काढले आहे. असंख्य रुग्ण यावर हिरे रुग्णालयात उपचार घेत आहेत. अशा परिस्थितीमध्ये घाणीच्या या साम्राज्यामुळे रुग्ण बरे होण्याऐवजी अजून आजारी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. या गलथान कारभाराला जिल्हाधिकारी बुस्टर डोस देतील का याकडेही जिल्हावासियांचे लक्ष लागून आहे.

हेही वाचा :

नाशिकमधील इगतपुरी ग्रामीण रुग्णालय ‘व्हेंटिलेटर’वर, कोसळणाऱ्या छतामुळे रुग्णांचा जीव टांगणीला

आमदार निलेश लंकेंनी अरेरावी, शिवीगाळ, मारहाण केली नाही; ‘त्या’ लिपिकाचा खुलासा! नेमंक प्रकरण काय?

‘अहो… मी बाप गमावला, आता तरी आरोग्य यंत्रणा सुधारा’, वर्ध्यात तरुणीचा आक्रोश

व्हिडीओ पाहा :

Serious condition garbage in Hire government hospital Dhule