AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एखाद्या शासकीय योजनेला गणपतराव देशमुखांचे नाव द्या, कार्यकर्त्यांची मागणी; शंभूराज देसाई म्हणतात…

गृहराज्यमंत्री शंभुराजे देसाई यांनी आज दिवंगत गणपतराव देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. देसाई यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भावना दिवंगत माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्या कुटुंबियांपर्यंत पोहोचवून त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले.

एखाद्या शासकीय योजनेला गणपतराव देशमुखांचे नाव द्या, कार्यकर्त्यांची मागणी; शंभूराज देसाई म्हणतात...
Shambhuraj Desai
| Edited By: | Updated on: Aug 08, 2021 | 6:16 PM
Share

पंढरपूर : गृहराज्यमंत्री शंभुराजे देसाई यांनी आज दिवंगत गणपतराव देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. देसाई यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भावना दिवंगत माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्या कुटुंबियांपर्यंत पोहोचवून त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. तसेच गणपतराव देशमुख यांचे नाव एखाद्या शासकीय योजनेला देण्याची मागणी होत आहे, याबाबत महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे आश्वासनही यावेळी देसाई यांनी दिले. (Shambhuraj Desai visited Ganpatrao Deshmukh residence)

शरद पवार देशमुख कुटुंबीयांची सांत्वन भेट घेणार

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आज सांगोला दौऱ्यावर आहेत. दिवंगत माजी आमदार गणपतराव देशमुख (Ganpatrao Deshmukh) यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट ते घेणार आहेत. तब्बल 50 वर्ष राज्याच्या विधानसभेत आमदार म्हणून आपली कारकीर्द गाजवलेले ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचं 30 जुलै रोजी निधन झालं.

गणपतराव देशमुख यांच्या निधनानंतर शरद पवार अंत्यसंस्काराला उपस्थित राहू शकले नव्हते. त्यामुळे सांगोल्यात जाऊन शरद पवार हे गणपतराव देशमुख यांच्या घरी जातील. तिथे त्यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतील. गणपतराव देशमुखांच्या निधनानंतर विविध पक्षीयांनी शोक व्यक्त केला होता. पवारांनीही ट्विटरवरुन गणपतरावांना श्रद्धांजली अर्पण केली होती.

नाशिकमधील गर्दीप्रकरणी गुन्हे दाखल करणार

नाशिकमध्ये खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते होणाऱ्या उड्डाणपुलाच्या उद्घाटन कार्यक्रमाला स्थानिक नेतेमंडळी आणि कार्यकर्त्यांनी तूफान गर्दी केली होती. गोडसेंसह अनेकांच्या चेहऱ्यावर मास्कदेखील नव्हता. याबाबत माध्यमांच्या प्रतिनिधींनी गृहराज्यमंत्री देसाई यांच्याकडे विचारणा केली असता, देसाई म्हणाले की, याबाबत मला कोणतीही माहिती नाही, तसे झाले असेल तर मी चौकशी करतो आणि जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करु.

गणपतराव देशमुख 11 वेळा आमदार

गणपतराव देशमुख यांचा जन्म 10 ऑगस्ट 1926 रोजी झाला. अत्यंत साधी राहणी असलेल्या गणपतराव देशमुख यांनी तब्बल 54 वर्षे सांगोला मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. एकाच मतदारसंघातून विधानसभेवर सर्वाधिक वेळा निवडून येण्याचा विक्रम शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्या नावावर आहे. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मतदारसंघातून 11 वेळा त्यांनी विक्रमी विजय मिळवले.

2009 च्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळवून, करुणानिधी यांच्या पाठोपाठ दहाव्यांदा आमदारकीची निवडणूक जिंकणारे आबासाहेब देशमुख हे देशातले दुसरे आमदार ठरले.

आबासाहेब देशमुखांनी सांगोल्यातून सगळ्यात पहिल्यांदा 1962 च्या निवडणुकीत विजय मिळवला. त्यानंतर 1972 आणि 1995 या दोन पंचवार्षिक वगळता प्रत्येक विधानसभा निवडणुकीत सांगोल्यातील जनतेने त्यांच्या निस्सीम प्रेम केलं.

गणपतराव देशमुख हे बहुतांश काळ विरोधी बाकांवरच होते, मात्र 1978 मध्ये शरद पवार यांनी पुलोद सरकार स्थापले त्यावेळी त्यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला. त्यानंतर 1999 मध्ये शेकापने काँग्रेस आघाडी सरकारला पाठिंबा दिला तेव्हाही गणपतराव देशमुख यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला होता.

इतर बातम्या

Ganpatrao Deshmukh Funeral | गणपतराव देशमुख अनंतात विलीन, अखेरचा निरोप देताना अनेकांना अश्रू अनावर

Ganpatrao Deshmukh Funeral | गणपतराव देशमुखांच्या अंत्यदर्शनाला लोटला जनसागर

तब्बल 11 वेळा निवडून येऊनही एसटीतून प्रवास करणारा अवलिया; वाचा, गणपतराव देशमुखांचे किस्से

(Shambhuraj Desai visited Ganpatrao Deshmukh residence)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.