तब्बल 11 वेळा निवडून येऊनही एसटीतून प्रवास करणारा अवलिया; वाचा, गणपतराव देशमुखांचे किस्से

साधं नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर अनेकांचे पाय जमिनीवर राहत नाहीत. त्यांचा थाटमाट आणि तोरा न्याराच असतो. पण महाराष्ट्राच्या विधानसभेत तब्बल 11 वेळा निवडून येऊनही... (Maharashtra's 11-term MLA and former minister Ganpatrao Deshmukh dead)

तब्बल 11 वेळा निवडून येऊनही एसटीतून प्रवास करणारा अवलिया; वाचा, गणपतराव देशमुखांचे किस्से
Ganpatrao Deshmukh

सोलापूर: साधं नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर अनेकांचे पाय जमिनीवर राहत नाहीत. त्यांचा थाटमाट आणि तोरा न्याराच असतो. पण महाराष्ट्राच्या विधानसभेत तब्बल 11 वेळा निवडून येऊनही… पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्यापासून ते देवेंद्र फडणवीसांपर्यंतच्या मुख्यमंत्र्यांसोबत काम करूनही प्रचंड साधी राहणीमान असलेले गणपतराव देशमुख विरळेच. नेहमी एसटीने फिरणाऱ्या गणपतरावांनी कधीच बडेजाव केला नाही. तसेच आपल्या पद आणि प्रतिष्ठेचा कधीच दुरुपयोग केला नाही आणि करू दिला नाही. (Maharashtra’s 11-term MLA and former minister Ganpatrao Deshmukh dead)

गणपतराव देशमुख यांनी काल शुक्रवारी रात्री सोलापूरच्या अश्विनी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. वयाच्या 95व्या वर्षी या ध्येयवादी नेत्याने जगाचा निरोप घेतला. त्यांच्या जाण्यामुळे एक ध्येयवादी नेता गमावल्याची भावना व्यक्त होत आहे.

कंडक्टरची गणपतरावांशी हुज्जत

गणपतराव देशमुख अत्यंत साधे होते. मुंबईतील विधानसभेचं अधिवेशन असो की नागपूरचे हिवाळी अधिवेशन ते प्रत्येक अधिवेशनाला एसटीनेच जायचे. 2017मध्ये झालेल्या नागपूर अधिवेशनालाही ते एसटीनेच आले होते. ते कुठेही जायचे असेल तर एसटीनेच जायचे. एसटी प्रवासाचा नियम त्यांनी मोडला नाही. तो शिरस्ता त्यांनी कायम ठेवला. एकदा एसटीने प्रवास करत असताना त्यांना कंडक्टरने तिकीट विचारलं. त्यावर मी आमदार आहे, असं गणपतराव म्हणाले. आमदार आणि एसटीतून प्रवास करतोय? यावर कंडक्टरचा विश्वासच बसेना. त्याने गणपतरावांशी हुज्जत घालायला सुरुवात केली. अखेर त्याने डेपोतील अधिकाऱ्यांना बोलावलं. अधिकाऱ्यांनी गणपतरावांना ओळखलं. त्यांची माफी मागितली अन् गणपतरावांचा प्रवास सुकर झाला.

आणि गणपतरावांनी दिलगिरी व्यक्त केली

2002मधील ही गोष्ट. तेव्हा शेकाप आघाडी सरकारमध्ये सामील होता. गणपतराव देशमुख हे मंत्री होते. रायगड झेडपी निवडणुकीवरून शेकापचा सत्तेतून बाहेर पडायचा निर्णय झाला. पण त्यावेळी गणपतराव देशमुख यांना राजीनामा द्यायला एक दिवस उशीर झाला. त्यामुळे पक्षात गोंधळ झाला. मग पक्षाकडून त्यांना विचारणाही करण्यात आली. या प्रकाराने एनडी पाटील खवळले होते. ते जाहीरपणे म्हणले ‘आमच्या मंत्र्याना राजीनामा द्या, असे बहुतेक पोस्ट कार्ड पाठवून सांगावे लागतंय.’ नंतर त्या बैठकीत गणपतरावांनी पक्षाच्या नेतृत्वापुढे दिलगिरी व्यक्त केली. गणपतराव हे एनडी पाटलांपेक्षा वयाने मोठे. पण ते एनडी यांचा अधिकार मान्य करायचे. राजकारणातील नितीमूल्य आणि पक्षशिस्त पाळण्याचा इतका संयमितपणा त्यांच्याकडे होता.

तर मुख्यमंत्री झाले असते…

पुण्याच्या जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूची 5वी युवा संसद जानेवारी 2020मध्ये पार पडली. या कार्यक्रमाला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थित होते. यावेळी त्यांनी एक किस्सा सांगितला. 1999मध्ये मुख्यमंत्री कोणाचा होणार असा पेच निर्माण झाला. कारण आम्हाला पूर्ण बहुमत मिळालं नव्हतं. त्यामुळे मुख्यमंत्री शिवसेनेचा होणार की भाजपचा होणार अशी चर्चा सुरू होती. पण बहुमत नसल्याने आमदार आपल्यासोबत येणार नाहीत, हेही दिसत होते. त्यावेळी शेकापचे तीन आमदार निवडून आले होते. तेव्हा गोपीनाथ मुंडेही मुख्यमंत्री नको आणि नारायण राणेही मुख्यमंत्री नको… गणपतराव देशमुखांना मुख्यमंत्री करा… असा विचार आला. त्यावर सर्व सहमतही होते. पण नंतर ते झालं नाही, असा गौप्यस्फोट पाटील यांनी केला होता. (Maharashtra’s 11-term MLA and former minister Ganpatrao Deshmukh dead)

 

संबंधित बातम्या:

 राज्याच्या राजकारणातील एक पर्वाचा अस्त, गणपतराव देशमुखांच्या राजकीय आणि सामाजिक कारकिर्दीचा आढावा

राजकारणातील अजातशत्रू हरपला, ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचं निधन

एकाच मतदारसंघातून तब्बल 54 वर्षे आमदार होण्याचा विक्रम, शेतकरी कामगार पक्षाचा लढवय्या नेता गणपतराव देशमुख

(Maharashtra’s 11-term MLA and former minister Ganpatrao Deshmukh dead)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI