AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : गे बाय… ती भुतूर येऊचीच रव्हली व्हती! नायतर शाप नायसो करुन टाकल्यान असता

कोरगावकरांचो घर, अख्खो गाव घामाघूम, इषय साधोसुधो नव्हतो! त्येका बघानच सगळ्यांची तंतरली

Video : गे बाय... ती भुतूर येऊचीच रव्हली व्हती! नायतर शाप नायसो करुन टाकल्यान असता
प्रातिनिधिक फोटोImage Credit source: TV9 Marathi
| Updated on: Oct 20, 2022 | 1:42 PM
Share

महेश सावंत, TV9 मराठी, सिंधुदुर्ग : कोकणात मगरी (Crocodile in Konkan) दिसल्याच्या घटना क्वचितच ऐकायला मिळतात. पण जेव्हा ऐकायला मिळतात, तेव्हा त्याची चर्चा फक्त तालुक्यापुरती मर्यादित राहत नाही. तर अख्ख्या जिल्ह्यात वाऱ्यासारखी पसरते. सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यातील कुडाळ (Kudal) तालुक्यात घडलेल्या अशाच एका घटनेची चर्चा झाली नसती, तरच नवल. घटना कुडाळ तालुक्यातील तेर्सेबांबडे-कोरगावकर वाडीतली. मगर चक्क एका एका इसमाच्या घराजवळच आढळून आली. वेळीच ही बाब लक्षात आली म्हणून थोडक्यात मोठा अनर्थ टळला. मगरीने हल्ला चढवण्याच्या आधीच प्रसंगावधान राखल्यामुळे वेळीच धोका टाळता आला.

कुडाळमध्ये कुठे?

सांगलीतल्या कृष्णा नदीत मगरी आढळून येणाच्या घटना वरचेवर ऐकायला मिळतात. पण सिंधुदुर्गात मगर सर्रास आढळून येत नाही. कुडाळ तालुक्यात मात्र मगर आढळून आल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. यात शर्थीचे प्रयत्न करत मगरीला पकडण्यात आलं. त्यानंतर तिला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलं.

गावच्या ठिकाणी शहरासारखा लखलखीत उजेड नसतो. अशातच एक मगर तेर्सेबांबर्डे-कोरगावकर वाडीतल्या वस्तीत शिरली. या वस्तीत नाना कोरगावकर यांच्या घराशेजारी मगर रात्रीच्या सुमारास दबा धरुन लपून बसली होती. कुणाला तरी मगर लपलेली असल्याचा संशय आला. निरखून पाहिलं, तर खरंच मगर असल्याचं निदर्शनास आलं.

पाहा व्हिडीओ :

तब्बल पाच ते सहा फूट लांबीची ही मगर असल्याचं स्थानिकांच्या लक्षात आलं आणि सगळ्यांना घाम फुटला. आता करायचं काय, मगरीला घालवायचं कसं, हा प्रश्न सगळ्यांना पडला होता.

अखेर गावातल्या लोकांनी प्रसंगावधान राखलं. त्यांनी वनविभागाच्या पथकाला या बाबतची माहिती दिली. त्यानंतर वनविभागाने प्राणी मित्रांची मदत घेतली. गावातील लोकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं. त्यानंतर मगरीचं अंधारातच रेस्क्यू ऑपरेशन केलं. दोरखंड, गोण्यांच्या मदतीने लाकडांच्या आड लपून बसलेल्या मगरीला वन विभागाच्या पथकानं पकडलं.

भक्ष्यांच्या शोधात ही मगर नागरीवस्तीत आली असावी, असा संशय व्यक्त केला जातोय. या मगरीला स्थानिक वनविभागाच्या पथकाने पकडून नैसर्गिक अधिवासात सोडलं. पण तोपर्यंत गावातील लोकांची एकच घाबरगुंडी उडाली होती. भरवस्तीत मगर आढळून आल्यामुळे गावातील लोक कमालीचे धास्तावले होते. वेळीच मगरीला पकडण्यात आल्यामुळे कोरगावकरांनीही सुटकेचा निश्वास सोडला.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.