ईडी म्हणजे आता पान तंबाखूच्या दुकानासारखी, उद्या माझ्याही घरी येतील, प्रणिती शिंदेंची खोचक टीका

| Updated on: Oct 24, 2021 | 5:11 PM

देशातच भीतीचे वातावरण पसरले आहे. मी आज त्यांच्या विरोधात बोलत आहे. उद्या माझाही घरी ईडी येईल. ईडी आता पान तंबाखूच्या दुकानासारखी झाली आहे, अशी घणाघाती टीका आमदार प्रणिती शिंदे यांनी केली. त्या सोलापुरात एका कार्यक्रमात बोलत होत्या.

ईडी म्हणजे आता पान तंबाखूच्या दुकानासारखी, उद्या माझ्याही घरी येतील, प्रणिती शिंदेंची खोचक टीका
PRANITI SHINDE
Follow us on

सोलपूर : देशातच भीतीचे वातावरण पसरले आहे. मी आज त्यांच्या विरोधात बोलत आहे. उद्या माझाही घरी ईडी येईल. ईडी आता पान तंबाखूच्या दुकानासारखी झाली आहे, अशी खोचक टीका आमदार प्रणिती शिंदे यांनी केली. त्या सोलापुरात एका कार्यक्रमात बोलत होत्या. यावेळी त्यांनी ईडीसह अन्य तपास संस्था तसेच केंद्र सरकारला लक्ष्य केलं.

ईडी आता पान तंबाखूच्या दुकानासारखी झाली

देशातच भीतीचे वातावरण पसरले असून मी आज त्यांच्या विरोधात बोलत आहे. उद्या माझ्याही घरी ईडी येईल. ईडी आता पान तंबाखूच्या दुकानासारखी झाली आहे. कोणाच्याही घरी ईडीचे लोक जातात आणि त्यांना उचलून आणतात, असं प्रणिती शिंदे म्हणाल्या. तसेच ज्यांनी शेतकऱ्यांना मारलं ते लोक खुलेपणाने फिरत आहेत. जे लोक निर्दोष आहेत त्यांना तरुंगात टाकलं जातंय. लोकांमध्ये भीती निर्माण करण्याचा प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपकडून सुरू आहे, असे म्हणत त्यांनी लखीमपूर खेरी येथील हिंचारावारुन केंद्र सरकारला घेरलं.

एमआयएम, वंचित बहूजन आघाडी कोणत्याही कामाचे नाही

तसेच पुढे बोलताना त्यांनी एमआयएम तसेच वंचित बहुजन आघाडी या पक्षांवरदेखील सडकून टीका केली. एमआयएम आणि वंचित बहूजन आघाडी हे होन्ही पक्ष कोणत्याही कामाचे नाहीत. ते भाजपसाठी काम करतात, लोकांना पेटवतात व भांडणे लावतात, असे प्रणिती शिंदे म्हणाल्या.

महाविकास आघाडीच्या नेत्यांची चौकशी 

दरम्यान, मागील काही महिन्यांपासून  ईडी, आयकर विभाग, तसेच सीबीआयच्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या नेत्यांना लक्ष्य केलं जात असल्याचा आरोप करण्यात येतोय. शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ, शिवसेना खासदार भावना गवळी, परिवहनमंत्री अनिल परब, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे, अशा अनेक नेत्यांची मागे ईडी, तसेच आयकर विभागासह अन्य संस्थांच्या माध्यमातून वेगवेगळ्या आरोपांखाली चौकशी केली जातेय. भाजप नेते तथा माजी खसदार किरीट सोमय्या यांनीदेखील महाविकास आघाडीच्या नेत्यांना लक्ष्य केलं असून ते सातत्याने वेगवेगळे आरोप करताना दिसतात. याच पार्श्वभमीवर परिणीती शिंदे यांनी भाजप तसेच तपास संस्थांवर वरील भाष्य केलं आहे.

इतर बातम्या :

आरोग्य विभाग परीक्षेतील गोंधळावरुन भाजप आक्रमक, राजेश टोपेंनी राजीनामा द्यावा, माधव भांडारी यांची मागणी

‘नवाब मलिक केवळ मुस्लिम समाजाचे म्हणून त्यांच्यावर गंभीर आरोप’, संजय राऊतांच्या स्फोटक पत्रकार परिषदेचे सर्व मुद्दे

मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय निवडणुकीत शरद पवार मोठ्या फरकानं विजयी, अध्यक्षस्थानी विराजमान होणार

(solapur MLA praniti shinde slams bjp and central government on ed enquiry of maha vikas aghadi leaders)