मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय निवडणुकीत शरद पवार मोठ्या फरकानं विजयी, अध्यक्षस्थानी विराजमान होणार

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय निवडणुकीत विजय झालाय. शरद पवार हे अध्यक्षपदासाठी प्रमुख दावेदार होते. या निवडणुकीत 34 पैकी 31 जणांनी मतदान केलं. त्यात 29 मतं शरद पवार यांना, तर धनंजय शिंदे यांना 2 मतं मिळाली आहे.

मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय निवडणुकीत शरद पवार मोठ्या फरकानं विजयी, अध्यक्षस्थानी विराजमान होणार
शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
Follow us
| Updated on: Oct 24, 2021 | 3:27 PM

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय निवडणुकीत विजय झालाय. शरद पवार हे अध्यक्षपदासाठी प्रमुख दावेदार होते. या निवडणुकीत 34 पैकी 31 जणांनी मतदान केलं. त्यात 29 मतं शरद पवार यांना, तर धनंजय शिंदे यांना 2 मतं मिळाली आहे. दरम्यान, मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाची निवडणूक राजकीय आखाडा बनल्याचा आरोप करण्यात आला होता. (Sharad Pawar’s victory in Mumbai Marathi Granth Sangrahalaya election)

तर मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय निवडणुकीत उपाध्यक्षपदासाठी विद्या चव्हाण, प्रभाकर नारकर, शशी प्रभू, माजी न्यायमूर्ती अरविंद सावंत, प्रतीप कर्णिक, प्रभाकर नारकर, अमला नेवाळकर यांचा विजय झाला आहे. तर संतोष कदम, रजनी जाधव, आनंद प्रभू, प्रमोद खानोलकर, झुंजार पाटील, संजय भिडे आणि सुधिर सावंत यांचा पराभव झाला आहे.

निवडणूक लोकशाही मार्गानं नाही- शिंदे

निवडणूक पार पडल्यानंतर धनंजय शिंदे यांनी ही निवडणूक लोकशाही मार्गानं झाली नसल्याचा आरोप केलाय. आम्ही याबाबत आमचं मत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोर मांडलं. तरीही निवडणूक घेतली. आम्ही न्यायालयात जाणार असल्याचं ते म्हणाले. तर दुसरीकडे निवडणूक लोकशाही मार्गानेच झाल्याचा दावा निवडणूक निर्णय अधिकारी किरण सोनवणे यांनी केलाय. न्यायालयात जाण्याचा अधिकार आहे. निवडणूक प्रक्रियेत कोणताही गैरप्रकार झाला नाही, असंही त्यांनी म्हटलंय.

तर ही निवडणूक लोकशाही मार्गाने आणि घटनेप्रमाणेच झाली आहे. साहित्य आणि वाचक प्रेमींसाठी ही संस्था काम करते. यात राजकारण हा विषय नाही. आप पक्षाला महापालिका निवडणुकीत फायदा व्हावा या हेतूनं त्यांनी ही निवडणूक लढवली, अशी प्रतिक्रिया विद्या चव्हाण यांनी दिलीय.

सरस्वतीच्या संस्थेत गैरकारभार सुरु – शिंदे

तत्पूर्वी ही निवडणूक एकप्रकारे राजकीय आखाडा बनली होती. त्यावरुन ही साखर कारखान्याची, बँकेची निवडणूक नाही. सरस्वतीच्या संस्थेत गैरकारभार सुरु आहे. ही दंडेशलाही आहे. या विरोधात न्यायालयात जाणार असल्याचं धनंजय शिंदे म्हणाले होते. तर राष्ट्रवादीच्या नेत्या आणि उमेदवार विद्या चव्हाण यांनी शरद पवार यांच्यावरील आरोपांचे खंडण केले आहेत. पवारांवर आरोप केले की प्रसिद्धी मिळते हे काही जणांना माहीत आहे. त्यामुळे दिवाळीनंतर मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या बाबत करण्यात आलेल्या आरोपाला उत्तर दिले जाईल, असं विद्या चव्हाण म्हणाल्या होत्या.

गलगलींची तक्रार

आज रविवारी, 24 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 11 ते 1 वाजता नायगाव येथील संग्रहालयाच्या सुरेंद्र गावस्कर सभागृहात होत आहे. या निवडणुकीत शरद पवार यांनी अध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केला असून धनंजय शिंदे यांनी आव्हान दिले आहे. अनिल गलगली यांनी निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला असून 34 ऐवजी 6000 पेक्षा अधिक मतदारांना मतदानाचा अधिकार देण्यासाठी धर्मादाय आयुक्तांना पत्र पाठविले आहे. विशेष म्हणजे ज्या 34 मतदारांना मतदान करण्याचा अधिकार देण्यात आला आहे. त्यात 16 उमेदवारांना समावेश नाही. अनिल गलगली यांच्या मते संस्थेच्या घटनेच्या कलम 10:1 प्रमाणे 6000 पेक्षा अधिक मतदार असताना जाणूनबुजून फक्त 34 मतदारांना मतदानाचा अधिकार देण्यात आला आहे.

महत्वाची बाब म्हणजे शरद पवार यांच्यापासून कोणीही यापूर्वी संग्रहालयाच्या निवडणूकीचा साधा अर्जही भरला नव्हता. या पार्श्वभूमीवर संग्रहालयाच्या गेल्या पन्नास वर्षांत प्रथमच या निवडणुकीत धनंजय शिंदे यांनी आव्हान उभे केलं होतं. संग्रहालयाच्या सर्व सभासदांना घटनेप्रमाणे निवडणूकीत भाग घेण्याचा हक्क असूनही संग्रहालयाच्या पदाधिकाऱ्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना चुकीची माहिती दिली. तसंच फक्त 34 सभासदांना मतदानाचा अधिकार देऊन शरद पवार गटाच्या उमेदवारांच्या हाती संग्रहालयाची सूत्रे सोपवण्याचा घाट घातला आहे, अशी चर्चा आहे.

इतर बातम्या :

‘तोडपाणी करण्यासाठी सगळं सुरु’, तपास यंत्रणांच्या धाडीवरुन पृथ्वीराज चव्हाणांचा गंभीर आरोप

समीर वानखेडेसह एनसीबीवर पंचाचाच बाँब, शाहरुख खानकडे 25 कोटी मागितल्याचा दावा, वानखेडेला 8 कोटी द्या!

Sharad Pawar’s victory in Mumbai Marathi Granth Sangrahalaya election

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.