अनिल देशमुख ईडीसमोर हजर का झाले? सुधीर मुनगंटीवारांनी सांगितली तीन कारणं

| Updated on: Nov 01, 2021 | 4:53 PM

भाजप नेते आणि माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या ईडी समोर हजर होण्याच्या टायमिंगवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. अनिल देशमुख ईडीसमोर हजर होण्यासाठी दोन ते तीन बाबी कारणीभूत असल्याचं मुनंगटीवार म्हणाले.

अनिल देशमुख ईडीसमोर हजर का झाले? सुधीर मुनगंटीवारांनी सांगितली तीन कारणं
सुधीर मुनगंटीवार
Follow us on

चंद्रपूर: भाजप नेते आणि माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या ईडी समोर हजर होण्याच्या टायमिंगवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. अनिल देशमुख ईडीसमोर हजर होण्यासाठी दोन ते तीन बाबी कारणीभूत असल्याचं मुनंगटीवार म्हणाले. संपत्तीवर टाच येणं, अटकपूर्व जामिनाच्या शक्यता संपल्या आणि सचिन वाझे महाराष्ट्र पोलिसांच्या ताब्यात येणं ही कारणं लक्षात आल्यानं अनिल देशमुख ईडीसमोर हजर झाले, असावेत अशी शक्यता सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.

ईडीसमोर जाण्याचा हाच मुहूर्त का?

सचिन वाझे महाराष्ट्र पोलिसांच्या एसआयटीच्या ताब्यात आल्यावरच माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ईडीसमोर येण्याचा मुहूर्त का साधला , असा प्रश्न सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केलाय. आपण सांगू ते एसआयटी सचिन वाझे कडून वदवून घेतील आणि त्यामुळे मी आता ईडी समोर गेलो तर धोका नाही असं देशमुख यांना वाटलं असावं, असा आरोप मुनगंटीवार यांनी केला आहे.

अटकपूर्व जामीन मिळण्याची शक्यता संपली

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आदर्श प्रस्थापित करायला हवा होता. अनिल देशमुख गृहमंत्री असताना पोलीस अधिकाऱ्यांशी आणि जनतेशी संवाद साधताना सांगायचे की पोलिसांनी खोटा गुन्हा दाखल केला तर त्यासंदर्भात आपली बाजू मांडली पाहिजे, असं अनिल देशमुख सांगायचे. मात्र, स्वत: वर वेळ आली त्यावेळी काय झालं?, असा सवास सुधीर मुनंगटीवार यांनी केला. अनिल देशमुखांच्या हे लक्षात आलं असावं की कोर्टातून आपल्याला अटकपूर्व जामीन मिळू शकत नाही त्यामुळं ते ईडीसमोर हजर झाले असावेत.

संपत्तीवर टाच?

अनिल देशमुख यांच्या संपत्तीवर टाच येत असल्याचं लक्षात आल्यानं ते ईडीसमोर हजर झाले. याशिवाय तिसरा मुद्दा म्हणजे सचिन वाझे महाराष्ट्र पोलिसांच्या एसआयटीच्या ताब्यात आल्यानंतर ते ईडीसमोर आले आहेत. सचिन वाझे महाराष्ट्र पोलिसांच्या ताब्यात असल्यानं आपल्याला हवं ते वदवून घेता येईल हे लक्षात आल्यानं अनिल देशमुख ईडीसमोर आले असतील, असा दावा सुधीर मुनंगटीवार यांनी केला.

इतर बातम्या:

सहकारमंत्री आणि त्यांचा पीए तीन टप्प्यात पगार घेणार का? एकरकमी FRP वरुन सदाभाऊ खोतांचा सवाल

समीर वानखेडे दिल्लीत मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांच्या भेटीला, राज्य सरकारकडून कागदपत्रं मागवली जाणार

Sudhir Mungantiwar raise question timing of Anil Deshmukh Appear before ED