AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सहकारमंत्री आणि त्यांचा पीए तीन टप्प्यात पगार घेणार का? एकरकमी FRP वरुन सदाभाऊ खोतांचा सवाल

सदाभाऊ खोत यांनी उसाला एक रक्कमी FRP देण्यास विरोध करणाऱ्या सहकार मंत्र्यांनी त्यांचा आणि त्यांच्या PA चा ही पगार तीन टप्यात घ्यावा, असा टोला  लगावला आहे.

सहकारमंत्री आणि त्यांचा पीए तीन टप्प्यात पगार घेणार का? एकरकमी  FRP वरुन सदाभाऊ खोतांचा सवाल
सदाभाऊ खोत
| Edited By: | Updated on: Nov 01, 2021 | 3:32 PM
Share

सातारा (कराड) : रयत क्रांती संघटनेने सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली कराड तहसील कार्यालयावर एकरकमी एफआरपीसाठी ट्रॅक्टर मोर्चा काढला होता. सदाभाऊ खोत यांनी उसाला एक रक्कमी FRP देण्यास विरोध करणाऱ्या सहकार मंत्र्यांनी त्यांचा आणि त्यांच्या PA चा ही पगार तीन टप्यात घ्यावा, असा टोला  लगावला आहे. साखर कारखाने जर एक रक्कमी FRP देण्यास टाळाटाळ करून जर शेतकऱ्यांची काळी दिवाळी करणार असतील तर आम्ही सहकार मंत्र्यांच्या दारात जाऊन शिमगा केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा सदाभाऊ खोत यांनी दिला आहे.

बाळासाहेब पाटील यांच्यावर टीकास्त्र

सहकार मंत्री हा स्वयंभू मंत्री नाही कारण त्याचं दावं एकाच्या हातात, त्याला पाणी एकजण पाजत असतो, वैरण एक जण टाकत असतो आणि त्याला पाटीवर गिरवून दिल्यावर वाचून दाखवण्याच काम तो सहकार मंत्री करत असतो, असा टोलाही सहकार मंत्र्यांना सदाभाऊ खोत यांनी लगावला.

सहकार मंत्र्यांच्या दारात शिमगा करणार

सातारा जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्याला एफआरपीप्रमाणं दर मिळावं, म्हणून ट्रॅक्टर मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. सातारा जिल्ह्यातील एकाही साखर कारखान्यानं एफआरपीप्रमाणं दर देऊ, असं जाहीर केलेलं नाही. कोल्हापूर जिल्ह्यातील आणि सांगली जिल्ह्यातील काही साखर कारखान्यांनी एफआरपी जाहीर केलीय. मात्र, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या जिल्ह्यातील एकही साखऱ कारखाना दर देत नसेल तरी ही गंभीर बाब आहे. शुगरकेन कंट्रोल अ‌ॅक्टनुसार 14 दिवसांमध्ये साखर कारखान्यांनी एफआरपी द्यावी, असा नियम आहे. सहकार मंत्री नियम पाळणार नसतील तर आम्ही त्यांच्या दारात जाऊन शिमगा साजरा करु, असा इशारा सदाभाऊ खोत यांनी दिला आहे.

महाविकास आघाडी हे लुटारुंचं सरकार

पैसे कुणाला नको आहेत हे सहकार मंत्र्यांनी जाहीर करावं. तुम्ही आणि तुमचे पीए आहेत त्यांनी तीन टप्प्यात पगार घ्यावा, असा खोचक सल्ला सदाभाऊ खोत यांनी बाळासाहेब पाटील यांना दिला आहे. महाविकास आघाडी सरकार हे लुटारूंचं सरकार आहे. देवेंद्र फडणवीसांचं सरकार असताना त्यांनी लुटारुंची मुसकी आवळली होती. सहकारमंत्री हा स्वंयभू मंत्री नाही, त्यांचं दावं एकाच्या हातात आहे, चारा एकजण टाकत असतो, पाणी एक जण देत असतो, त्याला पाटीवर गिरवून दिल्यावर वाचून दाखवण्याच काम तो सहकार मंत्री करत असतो, असा टोलाही सहकार मंत्र्यांना सदाभाऊ खोत यांनी लगावला.

वीज बील वसुलीवरुन टोला

सरकार ऊस बिलातून वीज बील वसुलीचे आदेश काढतंय. उद्या दारुवाले, पानपट्टी वाले यांनी मागणी केल्यास त्यांचीही वसुली उसबिलातून करुन देणार का असा सवालही सदाभाऊ खोत यांनी केला

इतर बातम्या:

Special Story ! अतिवृष्टीतील नुकसानीच्या खुना, एकाच जिल्ह्यात 30 दिवसांमध्ये 25 शेतकऱ्यांच्या आत्महत्या

Maharashtra By-Election Results 2021 Date: देगलूरचा आमदार कोण? मतदारांचा कौल काँग्रेस की भाजपला, उद्या मतमोजणी

Sadabhau Khot slam said can Balasabeh Patil will take salary in three installments over sugarcane FRP issue

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.