Ahmednagar Green Corridor : अहमदनगर ते पुणे पहिल्यांदाच ग्रीन कॉरिडॉर, पुण्यातील चार रुग्णांसाठी अवयव नेण्यात आले

| Updated on: Jul 11, 2022 | 1:18 AM

तरुणाचे लिव्हर सह्याद्री हॉस्पिटल पुणे येथील हॉस्पिटलला घेऊन जाणार असून एक किडनी पुणे येथील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये तर दुसरी किडनी नाशिक येथील अपोलो हॉस्पिटल येथील पेशंटवर ट्रान्सप्लान्ट करण्यात येणार आहे.

Ahmednagar Green Corridor : अहमदनगर ते पुणे पहिल्यांदाच ग्रीन कॉरिडॉर, पुण्यातील चार रुग्णांसाठी अवयव नेण्यात आले
अहमदनगर ते पुणे पहिल्यांदाच ग्रीन कॉरिडॉर
Image Credit source: TV9
Follow us on

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील अपघातात ब्रेन डेड (Brain dead) झालेल्या तरुणाचे अवयव दान (Organ Donate) करण्यात आले आहेत. पोलीस बंदोबस्तात ग्रीन कॉरिडॉर (Green Corridor)ने हे अवयव पुण्याला पाठवण्यात आले. अहमदनगर ते पुणे पहिल्यांदाच ग्रीन कॉरिडोरने अवयव नेण्यात आले आहेत. डॉ. पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील हॉस्पिटलमधून पुण्यातील चार रुग्णांसाठी अवयव घेऊन अॅम्बुलन्स रात्री रवाना झाली. दोन किडनी, लिव्हर, पॅनक्राय हे अवयव पुण्यात पाठवण्यात आले. यामुळे चार रुग्णांचे प्राण वाचणार आहेत. तरुणाचे लिव्हर सह्याद्री हॉस्पिटल पुणे येथील हॉस्पिटलला घेऊन जाणार असून एक किडनी पुणे येथील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये तर दुसरी किडनी नाशिक येथील अपोलो हॉस्पिटल येथील पेशंटवर ट्रान्सप्लान्ट करण्यात येणार आहे. तर पॅनक्रिया ज्युपिटर हॉस्पिटल पुणे येथे करण्यात येणार असल्याची माहिती खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली.

एका अपघातानंतर तरुण ब्रेनडेड झाला

अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील एका 25 वर्षीय तरुणाचा अपघात झाला होता. त्याला उपचारासाठी संगमनेर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र अपघातात तरुण ब्रेनडेड झाल्याचे डॉक्टरांच्या निदर्शनास आले. डॉक्टरांनी तसे तरुणाच्या नातेवाईकांना कळवले. यानंतर तरुणाच्या कुटुंबीयांनी त्याचे अवयव दान करुन गरजू रुग्णांना जीवनदान देण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे त्यांनी खासदार सुजय विखे पाटील यांच्याशी संपर्क साधला आणि तरुणाचे अवयव दान करण्याबाबत इच्छा व्यक्त केली. त्यानुसार तरुणाला डॉ. पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील मेमोरियल रुग्णालयात आणण्यात आले. तेथे त्याची अवयवदानाची प्रक्रिया करण्यात आली. (The organs of a brain dead youth from Ahmednagar were sent to Pune by the Green Corridor)

हे सुद्धा वाचा