Palghar School Holiday : वसई-विरार, पालघर जिल्ह्यातील सर्व शाळांना उद्या सुट्टी जाहीर, अति मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर निर्णय

| Updated on: Jul 13, 2022 | 8:20 PM

गुरसल यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे 13 व 14 जुलै रोजी पालघर जिल्ह्यातील तसेच वसई विरार महानगरपालिका क्षेत्रातील सर्व शाळांना सुट्टी जाहिर केली आहे.

Palghar School Holiday : वसई-विरार, पालघर जिल्ह्यातील सर्व शाळांना उद्या सुट्टी जाहीर, अति मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर निर्णय
वसई-विरार, पालघर जिल्ह्यातील सर्व शाळांना उद्या सुट्टी जाहीर
Follow us on

पालघर : मुंबई, वसई, पालघरसह संपूर्ण राज्यात पावसाने थैमान घातले आहे. राज्यात पूरस्थिती आहे. मुसळधार पावसामुळे अनेक दुर्घटना घडत आहेत. पालघर जिल्ह्यात 14 जुलैपर्यंत अति मुसळधार पावसा (Extreme Heavy Rain)चा इशारा हवामान विभागा (IMD)ने दिला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. माणिकराव गुरसळ यांनी शाळांना दोन दिवस सुट्टी (Holiday) जाहीर केली आहे. गुरसळ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे 13 व 14 जुलै रोजी पालघर जिल्ह्यातील तसेच वसई विरार महानगरपालिका क्षेत्रातील सर्व शाळांना सुट्टी जाहिर केली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी प्रसिद्धी पत्रक काढून जाहीर केली सुट्टी

भारतीय हवामान खात्याने 14 जुलैपर्यंत पालघर जिल्ह्याला अति मुसळधार पावसाचा इशारा दिल्यानंतर पालघर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. माणिकराव गुरसळ यांनी प्रसिद्धी पत्रक काढले आहे. पालघर जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी, सर्व सरकारी व खाजगी शाळा, जिल्हा परिषद शाळा, नगरपालिका व महानगरपालिका शाळा, अनुदानित व विनाअनुदानित शाळा, सर्व आश्रमशाळा, निवासी आश्रमशाळा, सर्व महाविद्यालये, आयुक्त व्यवसाय आणि प्रशिक्षण केंद्रे यांच्या आस्थापनेवरील शैक्षणिक संस्था यांना 13 व 14 जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. उक्त आदेशाची अंमलबजावणी तात्काळ करण्यात यावी, असा आदेश देण्यात आला आहे.

वाडा तालुक्यातील काही गावांचा संपर्क तुटला

पालघर जिल्ह्यात वाडा तालुक्यात मुसळधार ढगफुटी सदृश्य पाऊस सुरू आहे. तानसा नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे पूर परस्थिती निर्माण झाली आहे. वज्रेश्वरी केलठण ब्रिज पाण्याखाली गेल्यामुळे पर्यटनस्थळ असलेल्या वज्रेश्ववरी, गणेशपुरी, अकलोली गावात 60 घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे अनेकांचे सामान भिजले आहे. या ठिकाणी बाजारात येणाऱ्या गावांचा संपर्क तुटला आहे. (Two days school holidays in vasai virar palghar on the backdrop of heavy rains)

हे सुद्धा वाचा