Uddhav Thackeray: तेव्हाच भाजपला मूठमाती द्यायला हवी होती… उद्धव ठाकरे यांचं जाहीर विधान; भाजपवर सडकून हल्लाबोल

Uddhav Thackeray on BJP: खासदार फुटीनंतर परभणीतील कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजपवर सडकून टीका केली. त्यांनी भाजपसोबतच्या युतीवर मोठे भाष्य केले. भाजप मित्रपक्षाला कशी वागणूक देतो. पक्षातील नेत्यांना कसा संपवतो हे सांगत त्यांनी बोचरी टीका केली.

Uddhav Thackeray: तेव्हाच भाजपला मूठमाती द्यायला हवी होती... उद्धव ठाकरे यांचं जाहीर विधान; भाजपवर सडकून हल्लाबोल
उद्धव ठाकरे, परभणी कार्यकर्ता मेळावा
Image Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Jun 28, 2026 | 1:18 PM

Uddhav Thackeray on BJP: खासदार फुटीनंतर पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी विदर्भ आणि मराठवाड्याचा दौरा सुरू केला आहे. आज त्यांच्या दौऱ्याचा दुसरा दिवस आहे. त्यांनी परभणी कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला संबोधित केले. अक्षदा मंगल कार्यालयात आयोजित शिवसैनिकांच्या मेळाव्यात त्यांची भाजवविरोधात भाजप तोफ धडाडली. त्यांनी भाजपच्या दुटप्पी धोरणावर सडकून टीका केली. तर भाजपसोबतच्या युतीची आठवण काढत त्यांनी बोचरी टीका केली. तेव्हाच भाजपला मुठमाती द्यायला हवी होती असे जाहीर विधान त्यांनी केले.

वाजपेयी हरले, तेव्हाच… ठाकरेंचा घणाघात

भाजप जगातील सर्वात मोठा पक्ष होता. त्यावरून कॉक्रोच जनता पार्टी मोठी झाली आहे. तेव्हा वाजपेयी हरले होते. तेव्हा भाजपला मूठमाती देऊन मोकळे झालो असतो तर बरं झालं असतं, असा वज्रप्रहार उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केला. आपण वेगळी माणसं. हिंदुत्वाला मानणारे आहोत. आपलं हिंदुत्व कसं आहे. आपण जय शिवराय आधी बोलतो. हर हर महादेव म्हणतो आणि जय श्रीराम म्हणतो. आमचं हिंदुत्व हृदयात काम आणि हाताला काम देणारे आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

ते शिवसैनिक असतील तर मला त्यांचा गर्व आहे

पार्ल्याची पोटनिवडणूक हिंदुत्वाच्या मुद्द्यावर जिंकलेली पहिली निवडणूक होती. त्यानंतर शिवसेनाप्रमुखांचा मतदानाचा अधिकार काढला. त्यावेळी त्यांनी गांधीवादी समाजवाद घेतला होता. आता गांधींपेक्षा मोठे व्हायला निघाले आहे. पण हिंदू मतदान करू शकतात लक्षात आल्यावर रथयात्रा काढली, मंदिर वही बनायेंगे. आम्ही त्यात होतो. खैरे, सावे, तसतीश प्रधान गेले. बाबरी पाडली. कारसेवा करायचे. तेव्हा भाजपचे सुंदर सिंह भंडारी होती. ते म्हणाले, आमचं काम नाही. बाबरी आम्ही पाडली नाही. हे शिवसैनिकांचं काम असेल असं ते म्हणाले. बाळासाहेब म्हणाले, शिवसैनिकांनी पाडलं असेल तर मला त्याचा गर्व आहे, ही आठवण उद्धव ठाकरे यांनी करून दिली.

ही बाबरची औलाद

हे पळपुटे लोकं आणि त्यांचे बूट चाटणारे हे बॉस. कशासाठी राम मंदिर उभारलं. अनेकांचे प्राण गेले. दंगली झाल्या. बाळासाहेबांमुळे मुंबई शाबित राहिली. शिवसेना भवन उडवण्याचा प्रयत्न केला. श्रीकृष्ण अहवाल आपण केचऱ्याच्या टोपलीतून बाहेर काढला. अटलजीं म्हणाले, हे बरोबर नाही. तुम्हाला मंदिर नव्हतं बांधायचं. तुम्हाला लूट करायची होती रामाच्या नावाने. हिंदूंना जय श्रीराम म्हटलं तर असाच भूलून जातो. जगातील तमाम हिंदूंशी केलेली गद्दारी आहे. कॉकरोच जनता पार्टी जन्माला आली आहे. तशी नवीन भाजप जन्माला आलीय. बाबर जनता पार्टी. ही बाबरांची औलाद आहे, अशी विखारी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. त्याने ते मंदिर लुटलं. हे हे मंदिर लुटत आहे. हे बाबर जनता पार्टीचे आहेत का. त्यांना पाठिंबा द्यायला हे गद्दार गेले का, असा सवाल ठाकरेंनी केला.

हा राग असाच ठेवला पाहिजे. हा चाबूक गुंडाळून ठेवायला दिला नाही. ही गद्दारीची कीड हा इतिहास झाला आहे. त्यांना तुम्ही निवडून देता. माझीही चूक झाली. मी माफी मागतो. एवढे वर्ष सोबत राहिल्यावर विश्वास ठेवायचा नाही का, असा सवाल त्यांनी कार्यकर्त्यांना केला.

Follow Us