आई-वडिलांच्या कष्टाचं पांग फेडलं, UPSC च्या यशाचा ‘नगरी पॅटर्न’, 4 पोरांचं भव्यदिव्य यश!

| Updated on: Sep 25, 2021 | 11:15 AM

यूपीएससी नागरी सेवा 2020 चा अंतिम निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेत अहमदनगर जिल्ह्यातील चार मुलांना यश मिळालं आहे. विनायक नरवडे, सुरज गुंजाळ, विकास पालवे आणि अभिषेक दुधाळ या चार मुलांनी यूपीएससी परीक्षेत दैदिप्यमान यश मिळवलं आहे.

आई-वडिलांच्या कष्टाचं पांग फेडलं,  UPSC च्या यशाचा नगरी पॅटर्न, 4 पोरांचं भव्यदिव्य यश!
नगर जिल्ह्यातल्या पोरांचा यूपीएससी परीक्षेत डंका
Follow us on

अहमदनगर : यूपीएससी नागरी सेवा 2020 चा अंतिम निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेत अहमदनगर जिल्ह्यातील चार मुलांना यश मिळालं आहे. विनायक नरवडे, सुरज गुंजाळ, विकास पालवे आणि अभिषेक दुधाळ या चार मुलांनी यूपीएससी परीक्षेत दैदिप्यमान यश मिळवलं आहे.

UPSC च्या यशाचा ‘नगरी पॅटर्न’, 4 पोरांचं भव्यदिव्य यश!

अहमदनगरच्या विनायक नरवडे याने या परीक्षेत 37 वी रँक मिळवली आहे. विनायक हा दुसऱ्या प्रयत्नात युपीएससी उत्तीर्ण झाला. विनायक याने पुणे येथे इंजिनीअरिंगची पदवी घेतल्यानंतर अमेरिका येथे जाऊन पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. तेथेच त्याने एक वर्ष जॉब देखील केला होता.

नगर शहराजवळ असलेल्या नवनागापूर येथील सुरज गुंजाळ याने पहिल्याच प्रयत्नात यश मिळविले आहे. सुरजला 353 वी रॅंक मिळाली आहे. सूरजने सिंहगड कॉलेज पुणे येथून इंजिनिअरिंग पूर्ण केले. त्यानंतर तो युपीएससीची तयारी करीत होता.

श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथील अभिषेक दिलीप दुधाळ याने युपीएससी परीक्षेत सलग दुसऱ्यांदा यश मिळविले आहे. त्याला 469 वी रॅंक मिळाली आहे. मुंबई येथील व्हीजेटीआय कॉलेजमधून त्याने बी. टेक केले आहे. अभिषेक हा 2018 पासून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होता. त्याने पहिल्याच प्रयत्नात म्हणजेच, 2019 मध्ये उत्तीर्ण झाला. इंडियन रेल्वे ट्रॉफिक सर्व्हिसेसमध्ये कार्यरत झाला. त्यानंतर अभ्यासात सातत्य ठेवून पुन्हा परीक्षा देऊन त्याने यश संपादन केलं आहे.

नेवासे तालुक्यातील सोनई येथील विकास पालवे चार वर्षांपासून युपीएसची परीक्षेची तयारी करीत होता. चौथ्या प्रयत्नात त्याला या परीक्षेत यश मिळाले असून त्याने 587 वी रँक मिळवली आहे. पुण्यातील व्हीआयटी येथून विकास याने 2016 मध्ये इंजिनीअरिंग पूर्ण केलं. त्यानंतर यूपीएससी परीक्षेची तयारी केली. काल जाहीर झालेल्या निकालात त्याने घवघवीत यश मिळवलंय.

शुभम कुमार देशात पहिला

नागरी लोकसेवा आयोगाच्या यूपीएससी 2020 चा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेत एकूण 761 उमेदवारांनी यश प्राप्त केले असून ते उत्तीर्ण झाले आहेत. तर सुभम कुमार यांनी देशात पहिला क्रमांक पटकावला आहे.

खुल्या प्रवर्गातून 263 उमेदवार उत्तीर्ण

नागरी लोकसेवा आयोग 2020 च्या मुख्य परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये एकूण 761 उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये खुल्या प्रवर्गातून 263 तर आर्थिक मागास प्रवर्गातून 86, अन्य मागास प्रवर्गातून 229 तर अनुसूचित जाती 122, अनुसूचित जमाती 61 उमेदवारांनी परीक्षा उत्तीर्ण केली आहे.

हे ही वाचा :

UPSC Civil Services Main 2020 Result : यूपीएससी मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर, एकूण 761 परीक्षार्थी उत्तीर्ण

UPSC Result 2021 | युपीएससीत लातूरच्या सेव्हनस्टार्सचे अभूतपूर्व यश, जिल्ह्याच्या शिरपेचात रोवला मानाचा तुरा

दुसऱ्यांदा UPSC परीक्षेत यश, यंदा रँकमध्येही सरशी, उस्मानाबादच्या निलेशची गगनभरारी!