UPSC Result 2021 | युपीएससीत लातूरच्या सेव्हनस्टार्सचे अभूतपूर्व यश, जिल्ह्याच्या शिरपेचात रोवला मानाचा तुरा

औसा तालुक्यातील टाका या छोट्याशा गावातून आलेल्या पूजा अशोक कदम हिने 75 टक्के दृष्टीदोष असताना 577 ही रँक मिळवत डोळे दिपवणारे यश संपादन केले आहे. तर निलेश श्रीकांत गायकवाड याने सलग दुसऱ्या वर्षी यश संपादन करताना देशात 629 वा रँक मिळवला आहे.

UPSC Result 2021 | युपीएससीत लातूरच्या सेव्हनस्टार्सचे अभूतपूर्व यश, जिल्ह्याच्या शिरपेचात रोवला मानाचा तुरा
युपीएससीत लातूरच्या सेव्हनस्टार्सचे अभूतपूर्व यश

लातूर : युपीएससीचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. यात लातूर जिल्ह्यातील सात युवकांनी यश संपादन केले आहे. विनायक प्रकाशराव महामुनी याने देशात 95वा रँक मिळवला आहे. तो येथील केशवराज विद्यालयाचा माजी विद्यार्थी आहे. त्यापाठोपाठ कमलकिशोर कांदरकरने देशात 137 वा रँक मिळवला. तर नितिषा संजय जगताप या अवघ्या 21 वर्षांच्या तरुणीने पहिल्याच प्रयत्नात हे दैदिप्यमान यश संपादन करत 199 वा रँक मिळवला. अभिजित वेकोसेने 501वा रँक मिळवला. शुभम स्वामीने 523वा रँक मिळवला. (Unprecedented success of Sevenstars of Latur with UPSC)

औसा तालुक्यातील टाका या छोट्याशा गावातून आलेल्या पूजा अशोक कदम हिने 75 टक्के दृष्टीदोष असताना 577 ही रँक मिळवत डोळे दिपवणारे यश संपादन केले आहे. तर निलेश श्रीकांत गायकवाड याने सलग दुसऱ्या वर्षी यश संपादन करताना देशात 629 वा रँक मिळवला आहे. निलेशला मागच्या वर्षी 752वा रँक मिळाला होता. त्याला संरक्षण सहाय्यक म्हणून नियुक्ती मिळाली होती आणि पुणे येथे त्याचे प्रशिक्षणही सुरु होते.

चंद्रपूरच्या आदित्य जीवनेने मिळवला 399 वा रँक

चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथील युवकाने युपीएससी परीक्षा उत्तीर्ण करत उज्ज्वल कामगिरी केली आहे. आपल्या यशाने आदित्य चंद्रभान जीवने या 25 वर्षीय युवकाने जिल्हावासियांची मान उंचावली आहे. मेकॅनिकल इंजिनियर असलेल्या आदित्यने 399 अखिल भारतीय रँकिंग मिळविले आहे. आदित्यचे वडील आनंदवन संचालित आनंद निकेतन महाविद्यालयात प्राध्यापक तर आई शिक्षिका आहे. गुरुजन आणि कुटुंबियांमुळेच आपल्याला युपीएससीमध्ये हे यश मिळाल्याचे सांगत समाजासाठी उत्तम काम करण्याची इच्छा आदित्यने दर्शविली आहे. वरोरा शहरातील प्रथम युपीएससी उत्तीर्ण विद्यार्थी असा बहुमान देखील त्याने मिळविला असून त्याचे जिल्हाभरातून अभिनंदन केले जात आहे.

निकाल कसा पाहावा ?

♦ सर्वात अगोदर upsc.gov.in या वेबसाईटवर जा

♦ वेबसाईटवर जाऊन निकालाच्या लिंकवर क्लिक करा

♦ तुमच्यासमोर एक पीडीएफ येईल

♦ यामध्ये तुमचा रोल नंबर तसेच नाव सर्च करा

♦ जर तुमचे नाव आणि रोल नंबर यामध्ये असेल तर तुम्ही उत्तीर्ण आहात.

♦ हे पीडीएफ डाऊनलोड करुन सेव्ह करा (Unprecedented success of Sevenstars of Latur with UPSC)

इतर बातम्या

तुळजापुरात कोरोना नियमांचे सर्रास उल्लंघन, मास्क गायब! नवरात्रोत्सवाच्या तोंडावर प्रशासन सुस्त

PHOTO | गूगल आणत आहे आश्चर्यकारक वैशिष्ट्य, आता सर्व अँड्रॉईड वापरकर्ते फोनचे फोल्डर लॉक करू शकणार

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI