स्वातंत्र्यदिनाच्या वर्धापनदिनी वाशिमचा 19 वर्षीय यश आफ्रिकेतील किलीमांजारोवर तिरंगा फडकवणार!

वाशिमच्या युवा गिर्यारोहकाने गगनभरारी घेतली आहे. भारताच्या स्वातंत्र्यदिनी आफ्रिकेतील किलीमांजारो शिखर सर करुन तो तिथे तिरंगा फडकवणार आहे. | yash Ingole will climb Mount Kilimanjaro on Independence Day

स्वातंत्र्यदिनाच्या वर्धापनदिनी वाशिमचा 19 वर्षीय यश आफ्रिकेतील किलीमांजारोवर तिरंगा फडकवणार!
स्वातंत्र्यदिनाच्या वर्धापनदिनी वाशिमचा 19 वर्षीय यश आफ्रिकेतील किलीमांजारोवर तिरंगा फडकवणार

वाशिम : वाशिमच्या युवा गिर्यारोहकाने गगनभरारी घेतली आहे. भारताच्या स्वातंत्र्यदिनी आफ्रिकेतील किलीमांजारो शिखर सर करुन तो तिथे तिरंगा फडकवणार आहे. वाशिम येथील 19 वर्षीय यश मारुती इंगोले या युवा गिर्यारोहकाची निवड आफ्रिका खंडातील ‘किलीमांजारो’ (उंची : सुमारे 5892 मीटर) शिखरावर चढाई करण्यासाठी निवडलेल्या चमूमध्ये झाली आहे.

स्वातंत्र्यदिनी किलीमांजरोच्या शिखरावर चढाई करणार!

आफ्रिका खंडातील किलीमांजरो हे सर्वोच्च शिखर सर करण्यासाठी यश प्रयत्न करणार आहे. हे शिखर जगातील सर्वात उंच शिखरांपैकी चौथ्या क्रमांकाचं शिखर आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या वर्धापन दिनी म्हणजे 15 ऑगस्ट रोजी किलीमांजरोच्या शिखरावर भारतीय तिरंगा फडकवण्याचा त्याचा मानस आहे.

शिखरावर चढाई करताना तापमान उणे 29 डिग्री सेल्सिअस

शिखरावर चढाई करताना तेथील तापमान उणे 29 डिग्री सेल्सिअस असेल. तेथे जाण्यासाठी चार लाख रुपये खर्च लागणार आहे. यशची परिस्थिती तशी जेमतेम असल्याने त्याने वाशिम जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांच्याकडे मदतीची मागणी केल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी पुढाकार घेऊन शासकीय अधिकाऱ्यांच्या मदतीने 1लाख 70 हजार निधी यशला दिला. बाकीचे पैशांची जमाजमव त्याचा संपूर्ण परिवार करीत असल्याचं यशने सांगितलं.

वडिलांपासून ट्रेकिंगची प्रेरणा

यश इंगोले याला त्याच्या वडिलांच्या ट्रेकिंगच्या आवडीतून गिर्यारोहणाची प्रेरणा मिळाली. त्याने आतापर्यंत हिमाचल प्रदेशातील मनाली येथील अटल बिहारी वाजपेयी इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनरिंग अँड अलाइड स्पोर्ट्स या संस्थेतून गिर्यारोहणाचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे. तसेच प्रशिक्षणादरम्यान त्याने बालाचंद्र शिखरावर 15 हजार फुट यशस्वी चढाई केली असून अशा प्रकारची चढाई करणारा तो जिल्ह्यातील पहिलाच गिर्यारोहक आहे.

‘कळसुबाई’वर 2 वेळा चढाई

अहमदनगर जिल्ह्यातील सुमारे 5 हजार 400 फुट उंचीच्या ‘कळसुबाई’ या महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखरावर त्याने दोन वेळा यशस्वी चढाई केली आहे. त्याचबरोबर सह्याद्री पर्वतरांगामधील 18 किल्ले तसेच 3 समुद्री किल्ल्यांवर सुद्धा चढाई केली आहे. त्याचे पुढील ध्येय माउंट एव्हरेस्टवर चढाई करण्याचे आहे. तेच्या या ध्येयपूर्तीसाठी टीव्ही 9 मराठीकडून शुभेच्छा…..

(Washim 19-year old yash Ingole will climb Mount Kilimanjaro on Independence Day)

हे ही वाचा :

शेअर मार्केटमधून अधिक नफ्याचे आमिष, कोल्हापुरात व्यापाऱ्याची एक कोटी 40 लाखांना फसवणूक

‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लोकप्रिय ठरले, त्यांना पंतप्रधान करा’, पृथ्वीराज चव्हाण यांना राहुल गांधींचा विसर?

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI