AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Weather Alert : राज्यात हुडहुडी कायम, सांगलीत शेकोट्या पेटल्या, भंडाऱ्यात पारा 9 अंशांवर! 

गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये थंडीची लाट आली आहे. राज्यात कडाक्याची थंडी असेल अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली होती. उत्तरेकडील थंड वाऱ्यांच्या प्रवाहामुळे राज्यातील अनेक भागांत थंडी वाढली आहे.

Weather Alert : राज्यात हुडहुडी कायम, सांगलीत शेकोट्या पेटल्या, भंडाऱ्यात पारा 9 अंशांवर! 
सांकेतिक फोटो
| Edited By: | Updated on: Dec 21, 2021 | 8:24 AM
Share

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये थंडीची लाट (Weather Alert) आली आहे. राज्यात कडाक्याची थंडी असेल अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली होती. उत्तरेकडील थंड वाऱ्यांच्या प्रवाहामुळे राज्यातील अनेक भागांत थंडी वाढली आहे. यामुळे किमान तापमानात चांगलीच घट झाली आहे. यामुळे राज्यात चाैका-चाैकामध्ये शेकोट्या करून या गुलाबी थंडीचा नागरिक आस्वाद घेत आहेत.

सांगलीमध्ये गुलाबी थंडी चाैका-चाैकामध्ये शेकोट्या

सांगलीत गेल्या चार दिवसांपासून थंडी चांगलीच वाढली आहे. वातावरणातील पारा घसरत आहे. त्यामुळे सांगलीकर गारठले आहेत. वातावरणात कमालीची थंडी सुरू झाली आहे. रात्रीपासून ते सकाळपर्यंत थंडीचा जोर कायम रहात असल्याने सांगलीकर मात्र गारठून गेले आहेत. गेल्या चार दिवसापासून सांगलीत थंडीचा जोर वाढत आहे. अशा स्थितीत सुद्धा काही हौशी सांगलीकरांनी मात्र या गुलाबी थंडीचा पुरेपूर आस्वाद घेत असून या थंडीमध्ये सकाळी व्यायाम करत आहेत.

भंडाऱ्यामध्ये 9 डिग्री सेल्सियस तापमानाची नोंद 

राज्यात आलेल्या थंडीच्या लाटेने भंडारा जिल्ह्यात पारा घसरला असून 9 डिग्री सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे जिल्हात सर्वत्र धुक्याची चादर पसरली आहे. मागील तीन दिवसांपासून पारा सतत घसरत असून आज 9 डिग्री वर तापमान पोहचले आहे. पुढील तीन दिवस ही तापमनात घसरण होण्याच्या अंदाज व्यक्त केला जात आहे. यामध्ये राज्यामध्ये हुडहुडी मात्र कायम आहे.

संबंधित बातम्या : 

Best tourist destinations near Pune | पुण्यापासून 150 किमीच्याआता असलेल्या या आठ पर्यटनस्थळांना भेट द्या ; नवीन वर्षाचे जलोषात स्वागत करा

Pune | पुण्यातील रानगव्याच्या मृत्यूची दखल; उच्च न्यायालयाची वन आणि पोलीस खात्याला नोटीस

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.