Best tourist destinations near Pune | पुण्यापासून 150 किमीच्याआता असलेल्या या आठ पर्यटनस्थळांना भेट द्या ; नवीन वर्षाचे जलोषात स्वागत करा

पुण्यापासून अगदी काही तासांच्या अंतरावर असलेल्या ठिकाणांना भेट देत नवीन वर्षाची धमाल सुरुवात तुम्ही करू शकता.

Best tourist destinations near Pune | पुण्यापासून 150  किमीच्याआता असलेल्या या आठ पर्यटनस्थळांना भेट द्या ; नवीन वर्षाचे जलोषात स्वागत करा
Travel near Pune
Follow us
| Updated on: Dec 21, 2021 | 8:00 AM

पुणे – गेल्या दोन वर्षापासून असलेली कोरोनाचे (corona)सावट काहीसे धूसर झालं असलं तरी संपलेलं नाही. बघता -बघता 2021 चे वर्ष संपायला अवघे 10 दिवस उरले आहेत. नव्या वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज होत असताना नवीन वर्ष नेमकं कसे आणि कुठल्या ठिकाणी साजरे करायचे याचे नियोजन प्रत्येकाच्या डोक्यात सुरूच असेल. पण नेमकं कुठं हे ठरत नाही. त्यात कोरोनाची नियमावली काय पाठ सोडत नाही. महत्त्वाचे म्हणजे सजग नागरिक म्हणून कोरोनाच्या नियमावलीचे पालन जरूर केलं पाहिजे .  नवीन वर्षही तुम्ही अत्यंत चांगल्या प्रकारे साजरे करू शकता. पुण्यापासून अगदी काही तासांच्या अंतरावर असलेल्या पर्यटनस्थळांना (Best tourist destinations near Pune)भेट देत नवीन वर्षाची धमाल सुरुवात तुम्ही करू शकता.

तापोळा( Tapola पुण्यापासून  अगदी काही तासांच्या अंतरावर असलेल्या, वन डे पिकनिक व नवीन वर्षाच्या स्वागतासाठी तापोळा हे ठिकाण बेस्ट आहे. पुण्यापासून तापोळा अवघ्या 150 किमी अंतरावर आहे. येथील शिवसागर तलावालाही तुम्ही भेट देऊ शकता. मनमोहन नजरे, निसर्गाचा भरपूर आनंद येथे घेता येईल.  कोयना आणि सोळशी नद्यांवर बांधलेली धरणे पाहता येतील. तपोळाच्या शिवसागर तलावामध्ये बोटिंगचा देखील आनंद देखील लुटू शकता.

भीमाशंकर ( bhimashankar ) पुण्यापासून127 किमी अंतरावर भीमाशंकर वसलेले आहे. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असणारे एक ज्योतिर्लिंग म्हणून भीमा शंकर ओळखले जाते. धार्मिक तीर्थस्थान असले तरी इथला निर्सग डोळ्याचे पारणे फेडणारा आहे. या ठिकाणी शिडी घाटापासून ते गणेश घाटापर्यंत ट्रेकिंगचा आनंद लुटता येणे शक्य आहे. भीमाशंकर अभया आरण्यालाही तुम्हालाभेट देता येईल तसेच राज्य प्राणी शेकरू इथे पाहण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे.

कर्नाळा (karnala ) सह्याद्रीच्या कुशीतील पक्षांचा मंजुळा आवाज, निसर्गाच्या सानिध्यात स्वतःला ताजेतवाने करून घ्याचे असले तरा नवीन वर्षाचे स्वागत कर्नाळा येथे करा. पु पुण्यात पासून 124 किमी अंतरावर कर्नाळा हे ठिकाण आहे. कर्नाळ्याचं अभयारण्यही येथे आहे. याठिकाणी गरुड, गिधाड आणि अशाच प्रकारच्या पक्षांच्या दुर्मिळ प्रजातींसाठी हे अभयारण्य प्रसिद्ध आहे. कर्नाळा गडाचे अवशेषही पाहता येणार आहेत.

कामशेत (kamshet)

निसर्गाच्या सानिध्यात पक्षांचे मधुर आवाज ऐकण्यास उत्सुक असाल तर कामशेतला नक्की भेट द्या . पुण्यापासून हे ठिकाणं अवघं 48किमी अंतरावर आहे. वन डे ट्रीपसाठी हे बेस्ट ठिकाणं आहे. या ठिकाणी वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना असलेली हेमाडपंथी मंदिरेही पाहायला मिळतात. एवढंच नव्हे तर . बौद्ध संस्कृतीच्या खुणा दर्शवणार्या भैरी, कारला, भाजा आणि भेडसा यासारखी लेणी इथल्या परिसरात पाहायला मिळतात.

सिंहगड (Sinhagad) पुण्यापासून अवघ्या 37.4 किमी अंतरावर सिंहगड हे ठिकाण आहे. सह्याद्री डोंगर रंगाच्या कुशीत असलेला सिंहगड किल्ला तुम्ही भे देऊ शकता. नवीन वर्षाच्या स्वागत व मनावरील मरगळ झटकून टाकण्यासाठी हे ठिकाण बेस्ट आहे. कात्रज ते सिंहगड असा ट्रेकिंगचा आनंद तुम्ही येथे घेऊ शकता. जवळच असलेल्या पानशेत धरणावरही निवांत वेळा तुम्ही घालवू शकता.

मुळशी (Mulashi) पर्यावरण वैविध्यांनी नटलेले , पुण्यापासून अवघ्या एक-दोन तासाच्या अंतरावर मुळशी हे धरण आहे. इथल्या शांत वातावरणाच्या आणि अद्भुत सौंदर्याच्या सान्निध्यात तासानतास बसणे, मनाला ताजेतवाने करून जातो. या ठिकाणी धनगड आणि कोरेगड सारखे किल्ले आहेत. शतकापूर्वीचे वांजाइ मातेचं ठिकाण देखील आहे. दर्याखोर्यातून ड्रायव्हिंगचा आनंद देखील घेऊ शकता. या पावसाळ्यामध्ये कोसळणारे धबधबे हे मुळशीचे खास आकर्षण आहे.

लोणावळा-खंडाळा( Lonavla-Khandala) पुण्यापासून हे ठिकाण फक्त 70.1  किमी अंतरावर आहे. निसर्गानी सजलेल्या डोंगर रांगा, नितळ झरे आणि ऐतिहासिक महत्व असणारी लेणी आणि किल्ले असे चतुरंगी सौंदर्य पाहायचे असेल तर लोणावळा-खंडाळ्याल नक्की भेट द्या. सह्याद्रीच्या अगदी मध्यवर्ती ठिकाणी वसलेली ही ठिकाणे म्हणजे निसर्ग सौंदर्याचा खजानाच आहे. अनेक दुर्मिळ पक्षी इथे पाहायला मिळतात. तुंग आणि तिकोना यासारख्या किल्ल्यांना देखील भेटी देणे येथून शक्य आहे.

माळशेज घाट(Malshej Ghat) नवीन वर्षाची सुरुवात कॅम्पिंग, ट्रेकिंगने करनार असाल तर माळशेज घाट बेस्ट ठिकाण आहे. पुण्यापासून हे ठिकाण 119  किमी अंतरावर आहे. परदेशी पाहुणे म्हणून लाखो मैलांचा प्रवास करून येणारे फ्लेमिंगोज इथे खास आकर्षण आहे. या परिसरातील धबधब्यांचे विलोभनीय दृश्य मनाला मोहवून टाकते. माळशेज उत्तम पर्यटनक्षेत्र आहे.

रेल्वेची ‘कमाई’ एक्स्प्रेस : 4000 रुपयांची गुंतवणूक करुन दरमहिना 80 हजार कमवा

Special Report | ड्रग्ज प्रकरणानंतर नवाब मलिक आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात तपासयंत्रणेवरुन वाद

MHADA Examination : पेपर फुटीनंतर आता म्हाडा परीक्षेची नवी तारीख जाहीर, कधी होणार परीक्षा?

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.