Karad accident : फुले तोडण्यासाठी विहिरीवर गेले, एकाच कुटुंबातील तिघांना विजेचा धक्का, विहिरीत पडून मृत्यू

शिंदे कुटुंबातील हे तिघेजण फुले तोडण्यासाठी विहिरीवर गेले होते. विहिरीवरील विजेचा शॉक लागल्याने तिघेजण विहिरीत फेकले गेले. विहिरीतच त्यांचा मृत्यू झाला.

Karad accident : फुले तोडण्यासाठी विहिरीवर गेले, एकाच कुटुंबातील तिघांना विजेचा धक्का, विहिरीत पडून मृत्यू
उत्तर प्रदेशात पतीकडून पत्नीची हत्या
दिनकर थोरात

| Edited By: गोविंद हटवार, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Sep 02, 2022 | 10:56 PM

कराड : तासवडे येथे मोठी दुर्घटना घडली. यात तिघांचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे तिघेही एकाच कुटुंबातील आहेत. त्यामुळं हळहळ व्यक्त केली जात आहे. सणासुदीचे दिवस आहेत. देवाला वाहन्यासाठी फुलं लागतात. म्हणून तासवडे येथील शिंदे कुटुंबीय फुलं तोडायला गेले. फुलांचे झाड (flower tree) हे विहिरीच्या जवळ होते. विहिरीवर फुलं तोडायला गेले असता त्यांना विजेचा धक्का (electric shock) लागला. एकापाठोपाठ एक तिघांनाही जोरदार धक्का लागला. हा धक्का येवढा मोठा होता की, तिघेही विहिरीत फेकले गेले. त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

शिंदे कुटुंबातील या तिघांचा झाला मृ्त्य

विजेचा शॉक लागून एकाच घरातील तिघांचा मृत्यू झाला. कराडमधील तासवडे येथील शिंदे वस्तीमध्ये ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत हिंदुराव मारुती शिंदे (वय 58), सीमा सदाशिव शिंदे (वय 48) व शुभम सदाशिव शिंदे (वय 23) या तिघांचा मृ्त्यू झाला. शिंदे कुटुंबातील हे तिघेजण फुले तोडण्यासाठी विहिरीवर गेले होते. विहिरीवरील विजेचा शॉक लागल्याने तिघेजण विहिरीत फेकले गेले. विहिरीतच त्यांचा मृत्यू झाला. तळबीड पोलीस अधिक तपास करत आहेत.

एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

या घटनेतील मृतक हे शिंदे कुटुंबातील आहेत. हिंदुराव शिंदे यांच्यासह सीमा शिंदे व शुभम शिंदे यांचा यात जीव गेला. एकाच कुटुंबातील तिघेही अचानक गेल्यानं शिंदे कुटुंबात दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घटनेची माहिती तळबीड पोलिसांना देण्यात आली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह विहिरीबाहेर काढण्यात आले. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले. विहिरीवरील विजेच्या धक्काने या तिघांचाही मृत्यू झाल्याचं सांगण्यात येतंय. पोलीस तपासानंतर तसेच शवविच्छेदन अहवालानंतर या तिघांच्या मृत्यूचे नेमकं कारण समोर येईल.

हे सुद्धा वाचा


Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें