पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणात ओमराजे निंबाळकरांना झटका, पद्ममसिंह पाटील निर्दोष सुटले
Pawanraje Nimbalkar Case : सगळ्या महाराष्ट्राच लक्ष लागून राहिलेल्या पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणात कोर्टाने निकाल दिला आहे. हा निकाल ओमराजे निंबाळकर यांच्या कुटुंबासाठी धक्का आहे. कारण मुख्य आरोपी पद्मसिंह पाटील यांची सुटका झाली आहे.

तब्बल दोन दशकानंतर अखेर पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा निकाल लागला आहे. ओमराजे निंबाळकर यांच्या कुटुंबाला या निकालामुळे मोठा धक्क बसला आहे. आरोपी पद्मसिंह पाटील आणि अन्य आठ आरोपींची कोर्टाने निर्दोष मुक्तता केली आहे. सबळ पुराव्या अभावी या आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली. माफीचा साक्षीदार विश्वासू नसल्याने त्याच्या जबाबाच्या आधारावर आम्हाला आरोपींना शिक्षा देता येत नाही असं कोर्टाने म्हटलं. सगळ्या महाराष्ट्राचं या निकालाकडे लक्ष लागलं होतं. या हत्या प्रकरणात पद्सिंह पाटील आणि इतर 8 जण आरोपी होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार पद्सिंह पाटील यांच्यावर भाडोत्री गुंडांमार्फत हत्या घडवल्याचा आरोप होता. 3 जून 2006 रोजी पवनराजे मुंबईवरुन धाराशिवला निघालेले असताना दोन मारेकऱ्यांची कळंबोली येथे त्यांची गाडी अडवून धडाधड गोळ्या झाडल्या, त्यात पवनराजे आणि त्यांचा ड्रायव्हर समद काझी या दोघांचा मृत्यू झाला.
“कायद्याच्या चौकटीत राहून कोणतही कोर्ट निकाल देतं. रायगड कोर्टातही काहीवेळ केस चालली. एकूण 127 साक्षीदार तपासण्यात आले” अशी माहिती विशेष सीबीआय कोर्टाने दिली. पद्सिंह पाटील, लातूर येथील बिझनेसमन सतीश मंदादे, निवृत्त राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक मोहन शुक्ला आणि हल्लेखोर हे या प्रकरणात आरोपी होते. केस रेकॉर्डनुसार,मंदादे आणि शुक्ला यांनी पवनराजे निंबाळकर यांना मारण्यासाठी पारसमल जैनला 30 लाखाची सुपारी दिली. पारसमल जैन नंतर माफीचा साक्षीदार बनला.
पद्मसिंह पाटील हे पवनराजे निंबाळकर यांचे चुलत बंधु
पद्मसिंह पाटील हे पवनराजे निंबाळकर यांचे चुलत बंधु आहेत. पद्मसिंह पाटील यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीत अनेक मंत्रालयं संभाळली. पद्सिंह पाटील हे महाराष्ट्राचे माजी मंत्री असून ते धाराशिवचे माजी खासदार आहेत.राजकीय आणि व्यावसायिक स्पर्धेमुळे पद्सिंह पाटील यांनी पवनराजे निंबाळकर यांना मार्गातून हटवल्याचा आरोप होता.
तपासात काय त्रुटी राहिल्या?
निकाल वाचन करताना कोर्टाने तपासातील अनेक गंभीर त्रुटी दाखवून दिल्या. माफीचा साक्षीदाराच्या जबाबात बऱ्याच तफावती आहेत.दोन कबुलीजबाबात बरेच बदल आहेत. दोन वेगवेगळे जबाब हे बारकाईने पाहणे कोर्टासाठी महत्वाचे आहे असं कोर्टाने निकाल वाचन करताना म्हटलं. यात धक्कादायक बाब म्हणजे, चार्जशीट दाखल होण्याच्या काही दिवस आधी पुन्हा माफीच्या साक्षीदाराचा जबाब नोंदवण्यात आला. पण जबाब नोंदवून न्यायाधीशानी त्यावर स्वाक्षरीच केली नाही असं कोर्टाने म्हटलं. कोर्टाने निकाल देताना सीबीआयला फटकारलं.
हे आरोपी निर्दोष सुटले
पद्ममसिंह पाटील, सतीश मंदाडे, मोहन शुक्ल, शशिकांत कुलकर्णी, कैलाश यादव, दिनेश तिवारी, पिंटू सिंग, छोटे पांडे,