दूरदर्शी शिक्षणतज्ज्ञ, पद्मश्री डॉ. डी.वाय. पाटील यांचं निधन; राजकीय वर्तुळात शोककळा

पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन झालं आहे. त्यांनी कोल्हापुरात निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला.

दूरदर्शी शिक्षणतज्ज्ञ, पद्मश्री डॉ. डी.वाय. पाटील यांचं निधन; राजकीय वर्तुळात शोककळा
| Updated on: Aug 04, 2026 | 12:16 PM

राज्याच्या राजकारणातून दु:खद बातमी हाती आली आहे. दूरदर्शी शिक्षणतज्ज्ञ, पद्मश्री डॉ. डी.वाय. पाटील यांचं निधन झालं आहे. त्यांनी वयाच्या 90 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. शेतकरी कुटुंबातून जन्माला आलेल्या डी. वाय पाटील यांनी राजकीय क्षेत्रात मोठ्या पदावर पोहोचले होते. त्यांच्या जाण्याने राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. पद्मश्री डॉ. डी वाय पाटील यांचं मंगळवारी सकाळी कोल्हापुरात निधन झालं. त्यांच्या निधनाने राजकीय आणि शिक्षण क्षेत्रातील दूरदर्शी तज्ज्ञ गमावल्याची भावना व्यक्त केली जात आहे. ते काही काळ काँग्रेस लांब राहिले होते. तरी त्यांची काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशी ओळख लोकांमध्ये होती. त्यांनी त्रिपुरा, बिहार, पश्चिम बंगालचं राज्यपालपदही भुषवलं होतं.

डॉ. डी. वाय पाटील यांचा जन्म कोल्हापुरात 22 ऑक्टोबर 1935 रोजी झाला. त्यांनी राजकारणात अनेक मोठंमोठे पदे भुषवली. कार्यकर्ता, महापौर ते राज्यपाल असे अनेक पदे त्यांनी भुषवली. डॉ. डी. वाय. पाटील हे काँग्रेसकडून कोल्हापूरचे महापौर होते. ते 1972 साली पन्हाळा विधानसभा मतदारसंघातही विधानसभा मतदारसंघात आमदार म्हणून निवडून गेले होते. डॉ. डी. वाय. पाटील हे 2009 ते 2013 या काळात त्रिपुराचे राज्यपाल होते. तर 2013 ते 2014 या काळात बिहारचं राज्यपालपद भुषवलं. त्यांच्याकडे पश्चिम बंगालच्या राज्यपालपदाचा कार्यभार काही वर्ष सोपवण्यात आला होता. त्यांना भारत सरकारने ‘पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवले होते.

डॉ. डी. वाय. पाटील यांचे अनेक शैक्षणिक क्षेत्रात मोठं काम केलं आहे. त्यांचे अनेक शैक्षणिक संकुल आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती नाजूक होती. त्यांच्यावर उपचार सुरू होते. ते वृद्धापकाळामुळे घरातच असायचे. परंतु आज त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. त्यांनी मंगळवारी कोल्हापुरातील निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने राज्यभरात शोकाकुल वातावरण निर्माण झाले आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही त्यांना सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिली आहे. शिंदेंनी म्हटलं की, ‘ त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राने एक द्रष्टा नेता, महान शिक्षणमहर्षी आणि दिलदार मार्गदर्शक गमावलाय. ईश्वर डॉ. डी. वाय. पाटील साहेबांच्या आत्म्यास सद्गती प्रदान करो व पाटील परिवाराला या दुःखातून सावरण्याची ताकद देवो, हीच प्रार्थना. डॉ. डी. वाय. पाटील साहेबांच्या पावन स्मृतीस भावपूर्ण श्रद्धांजली’.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us