AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अरे 30 वर्षाच्या मुलाला इतके घाबरण्याची गरज नाही, संजय शिरसाटांच्या भेटीवर अभिजीत दिपके यांनी सोडले माैन..

कॉकरोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी नुकताच मोठे विधान केले. संजय शिरसाट यांनी अभिजीत दिपकेची भेट घेतल्यानंतर भाजपा आणि शिवसेना शिंदे गटात वाद वाढला. यावरच आता अभिजीत दिपकेंनी प्रतिक्रिया दिली.

अरे 30 वर्षाच्या मुलाला इतके घाबरण्याची गरज नाही, संजय शिरसाटांच्या भेटीवर अभिजीत दिपके यांनी सोडले माैन..
Abhijeet Dipke and Sanjay Shirsat
| Updated on: Aug 04, 2026 | 12:08 PM
Share

अभिजीत दिपके यांच्या कॉकरोच जनता पार्टीला मोठे यश मिळाले. जंतर मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला. त्यानंतर कॉकरोच जनता पार्टी तूफान चर्चेत आली. अभिजीत दिपके यांनी सरकारवर गंभीर आरोप केले. नेपाळ, बांगलादेश आणि श्रीलंकेत जे घडले तेच भारतात घडवण्याचा डाव होता, असे सांगितले जातंय. त्यावर आता अभिजीत दिपके यांनी प्रतिक्रिया दिली. यादरम्यान मोहन भागवत यांच्याबद्दलही बोलताना अभिजीत दिपके दिसले. शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट आणि बच्चू कडू हे अभिजीत दिपके यांच्या भेटीला गेल्याने राजकारणात मोठा गोंधळ उडाला. भाजपाला हे अजिबात पटले नसून त्यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार केल्याचे कळतंय.

संजय शिरसाट यांच्या भेटीबद्दल आता अभिजीत दिपके यांनी मोठे विधान केले. अभिजीत दिपके यांनी म्हटले की, आता 30 वर्षाच्या मुलापासून तुम्हाला एवढी भीती वाटते, याच्यावर मी काय बोलू. ते मला फक्त पर्सनली भेटायला आले होते आणि शुभेच्छा देण्यासाठी आले होते. दुसरे काहीही नाही. त्यांचे आणि आमचे काहीही बोलणे झाले नाही.

त्यांनी मला फक्त म्हटले की, युवकांचा मुद्दा उचलला, देशाचा मुद्दा उचलला चांगला, असे म्हणून त्यांनी मला शुभेच्छा दिल्या. मी भाजपाला सांगू इच्छितो की, एवढी घाबरण्याची गरज नाही. ईडी, सीबीआय सगळे तुमच्याकडेच आहे, आमच्याकडे काहीच नाही. आम्हाला लोकं पर्सनली भेटायला येतात आणि शुभेच्छा देतात.

संजय शिरसाट आणि बच्चू कडू यांनी अभिजीत दिपके यांची भेट घेतल्याने शिवसेना शिंदे गट आणि भाजपा यांच्यात तणाव वाढला आहे. यासोबतच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही आपली नाराजी व्यक्त केली. महायुतीमध्ये अभिजीत दिपकेंच्या भेटीबद्दल निर्णय झाला नसताना तुम्ही कधी भेट घेतली अशी विचारणाही त्यांच्याकडून करण्यात आली. आता त्यावरच अभिजीत दिपके यांनी भाष्य केले. संजय शिरसाट दाखल झाल्यानंतर नक्की काय घडले हे सांगताना दिपके दिसले.

Follow Us
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
आदित्य ठाकरेंना अटक करा, दिशा सालियन प्रकरणावर राणेंची थेट मागणी
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना अटक करा, चौकशी करा...दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंची थेट मागणी; उद्धव ठाकरेंच्या आरोपांनाही  दिलं प्रत्युत्तर
ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा...
TMC | ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा! तृणमूल काँग्रेसच्या दोन गटांना निवडणूक आयोगाकडून नवी नावं-नवी चिन्हं जाहीर
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम्पस फडणवीस म्हणाले...
ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक
Sunil Prabhu | ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक; 1 जण जखमी
सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन
Ravindra Chavan | सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन; मराठवाडा-विदर्भातील पावसाच्या स्थितीवर दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्...
Yavatmal | खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्..; 4 वर्षाच्या चिमुकल्याचं आयुष्य संपलं
तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव अन्...
TMC : तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव चिन्हच गोठवलं