AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ललित मोदीच्या आयुष्यावर बनणार सिनेमा, साजिद नाडियाडवालांची मोठी घोषणा; कोण साकारणार मुख्य भूमिका ?

ललित मोदी हे एक असं नाव आहे, जे सदैव चर्चेत असतं. आता याच ललित मोदीचं आयुष्य मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. साजिद नाडियावालाने ललित मोदीच्या आयुष्यावर चित्रपट बनवण्याची घोषणा केली आहे.

ललित मोदीच्या आयुष्यावर बनणार सिनेमा, साजिद नाडियाडवालांची मोठी घोषणा; कोण साकारणार मुख्य भूमिका  ?
lalid modi movie
| Updated on: Sep 18, 2026 | 9:47 PM
Share

ललित मोदी (Lalit Modi) हे एक असं नाव आहे, ज्याची जगभरात भरपूर चर्चा झाली. बिझनेसमन असलेल्या ललित मोदीने IPL निर्मितीत महत्वाची भूमिका निभावली, क्रिकेटच्या व्यवसायाला एक नवी दिशा दिली आणि त्यानंतर जगभरातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या व्यक्तींमध्ये त्याच्या नावाचा समावेश झाला. कोणत्या ना कोणत्या कारणामुळे ललित मोदीचं नाव नेहमीच चर्चेत असतं. आता त्याबद्दलच एक मोठी अपडेट समोर आली आहे. वृत्तांनुसार, भारतीय क्रीडा आणि व्यवसायविश्वातील या रंजक कथेचा एक महत्त्वाचा अध्याय प्रेक्षकांनी लवकरच मोठ्या पडद्यावर पाहायला मिळू शकतो. फिल्ममेकर साजिद नाडियाडवाला यांनी ललित मोदीच्या आयुष्यावर चित्रपट बनवण्याची घोषणा केली आहे.

हो, हे खरं आहे. साजिद नाडियाडवाला यांच्या ‘नाडियाडवाला ग्रँडसन एंटरटेनमेंट’ या प्रॉडक्शन हाऊसच्या बॅनरखाली ललित मोदीच्या जीवनावर चित्रपट बनवण्यात येणार आहे. हा प्रोजेक्ट मोठ्या स्तरावर साकारण्याची तयारी सुरू आहे, कारण ललित मोदी याच्या आयुष्यात असे अनेक पैलू आहेत, जे चित्रपटात दाखवले जाऊ शकतात. रिपोर्टसनुसार, स्नेहा राजानी देखील या प्रोजेक्टच्या प्रॉडक्शन टीमचा भाग आहेत. सध्या चित्रपटाची कहाणी आणि स्क्रिप्टवर काम सुरू आहे.

कोण साकारणार ललित मोदीची भूमिका ?

साजिड नाडियाडवालानने या चित्रपटाची घोषणा तर केली आगे. पण चित्रपटाबद्दल आणखी माहिती अजून समोर आलेली नाही. या पिक्चरमध्ये ललित मोदीची भूमिका कोणता अभिनेता साकारणार, हे जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता आहे, मात्र त्याच्या नावाची अजूनतरी घोषणा झालेली नाही. पण अभिनेता रणवीर सिंग याला मोठ्या पडद्यावर त्याची भूमिका साकारण्यात रस आहे, असं विधान ललित मोदीने काही काळापूर्वी केलं होतं. त्यामुळे ही भूमिका कोणाच्या पारड्यात जाते, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या चित्रपटासाठी कोणत्या कलाकाराची निवड केली जाते, हे येणारा काळच ठरवेल.

सध्या निर्मात्यांचा संपूर्ण भर हा या चित्रपटाची पटकथा आणखी प्रभावी आणि भक्कम करण्यावर आहे. कथा आणि स्क्रिप्ट तयार झाल्यानंतरच हा प्रोजेक्ट पुढे जाईल असं समजतं.

सुष्मिता सेन सोबत होतं रिलेशन

ललित मोदचं केवळ व्यावसायिक आयुष्यच नाही, तर त्याचं वैयक्तिक आयुष्यही बऱ्याच काळापासून चर्चेचा विषय राहिले आहे. खरं तर, 2022 मध्ये ललित मोदी याने अभिनेत्री सुष्मिता सेनसोबतचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते आणि दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याचे जाहीर केलं होते. मात्र, काही काळानंतर दोघांचे ब्रेकअप झाले. लाँग डिस्टन्स रिलेशनशिप हे त्यामागचं कारण असल्याचं ललित मोदीने नंतर नमूद केलं होतं.

Follow Us
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
आदित्य ठाकरेंना अटक करा, दिशा सालियन प्रकरणावर राणेंची थेट मागणी
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना अटक करा, चौकशी करा...दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंची थेट मागणी; उद्धव ठाकरेंच्या आरोपांनाही  दिलं प्रत्युत्तर
ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा...
TMC | ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा! तृणमूल काँग्रेसच्या दोन गटांना निवडणूक आयोगाकडून नवी नावं-नवी चिन्हं जाहीर
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम्पस फडणवीस म्हणाले...
ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक
Sunil Prabhu | ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक; 1 जण जखमी
सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन
Ravindra Chavan | सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन; मराठवाडा-विदर्भातील पावसाच्या स्थितीवर दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्...
Yavatmal | खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्..; 4 वर्षाच्या चिमुकल्याचं आयुष्य संपलं
तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव अन्...
TMC : तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव चिन्हच गोठवलं