
गेल्या आठवड्यात 22 एप्रिल रोजी पहलगाममध्ये पर्यटकांवरील भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर अख्खा देश हादरला असून जगभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. फक्त सामान्य नागरिकच नव्हे तर राजकारमी, नेते, सेलिब्रिटी, खेळाडू, कलाकार सर्वांनीच या क्रूर हल्ल्याचा निषेध करत कडक कारवाईची मागणी केली आहे. मनोरंजन सृष्टीतील अनेक कलाकारांनी देखील कधील सोशल मीडिया तर कधी व्हिडीओ किंवा बाईट्समधून या हल्ल्याबद्दल संताप व्यक्त केला, मृतांना श्रद्धांजली वाहत त्यांच्या कुटुंबियांना बळ मिळो अशी प्रार्थना केली. या हल्ल्यानंतर संपूर्ण देश एकवटला असून दहशतवाद्यांविरोधात आणि त्यांना मदत करणाऱ्या आपल्या शेजारील देश, पाकिस्तानविरोधातही कठोर पावलं उचलण्याची मागणी होत आहे.
ज्येष्ठ लेखक, कवी जावेद अख्तर हेही पहलगाम हल्ल्यानंतर भयानक संतापले असून बॉर्डरवर फक्त फुलझड्या लावू नका , कडक ॲक्शन घ्या, अशी मागणी त्यांनी केली आहे. लक्षात राहील असं उत्तर द्या, असंही ते म्हणाले. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर जावेद अख्तर यांनी सरकारकडे ही मागणी केली आहे. आरपार करून पाकिस्तानला अद्दल घडवा,अशी थेट मागणी त्यांनी केली.
काय म्हणाले जावेद अख्तर ?
पाकिस्तानचा प्रपोगंडा, पाकिस्तानची एस्टॅब्लिशमेंट,पाकिस्तानचा मुल्ला, पाकिस्तानचं सैन्य काश्मीरबद्दल काय म्हणतात – हे सगळे काश्मीरी आहेत ते मनापासून पाकिस्तानी आहेत. भारताने त्यांच्यावर कब्जा केलाय. पण हे खोटं आहे. काश्मीरी हे भारतीय आहेत, काही पागल आहेत, पण त्यांना सोडून द्या, असे सगळीकडेच असतात. 95 ते 99 % काश्मीर हे भारताशी प्रामाणिक आहेत. मी दिल्लीतील सरकारला विनंती करतो की हे ( दहशवादी कृत्य) खूप वेळा झाली आहेत, एकदा नाही, गेल्या 75 वर्षांत दर 2-3 वर्षांनी हे (हल्ले) होतच असतात, असा गोंधळ माजवत असतात,असं जावेद अख्तर म्हणाले.
अशी कडक ॲक्शन घ्या की…
सीमेवर फक्त काही फुलझड्या ( गोळीबार, प्रत्युत्तर) सोडून काम होणार नाही. आता एक सॉलिड, कडक स्टेप घ्या. अशी कडक ॲक्शन घ्या की, तिथला तो पागल आर्मी चीफ आहे, ( त्याचं भाषण ऐका, शहाणा माणूस असं बोलू शकत नाही) , अशा लोकांना असं चोख प्रत्युत्तर द्या की त्यांना कायमचं लक्षात राहील असं उत्तर द्या.अजून त्यांना समज आलेली नाही, आता त्यांना समजेल असं कडक उत्तर द्या , अशी मागणी जावेद अख्तर यांनी केली.
काय इटली वरून आले का ?
यावेळी त्यांनी आणखी एक प्रसंग सांगितला. ते म्हणाले, पहलगाम घटना दुर्दैवी आहे, आपण ती विसरली नाही पाहिजे. मी लाहोरला गेलो होतो एका साहित्यिक कार्यक्रमाला.तिथे एक महिला मला म्हणाली की आम्ही तुमच चांगलं स्वागत केलं. आम्ही काय तुमच्यावर गोळ्या झाडतो का? त्यावेळी मी महिलेला उत्तर दिलं की मी मुंबई जळताना पाहिली आहे. ज्यांनी ते (हल्ला) केलं ते या देशात फिरत आहेत. ते काय इटली वरून नव्हते आले. तुमच्या देशातून जे जे कलाकार आले त्यांना आम्ही डोक्यावर घेतलं. मात्र तुमच्याकडून तसं होतं नाही. मी हे बोलल्यानंतर वातावरण तंग झालं होतं. या प्रकरणाची प्रतिक्रिया येई पर्यंत मी भारतात आलो होतो,असं जावेद अख्तर म्हणाले.
आता आर नाहीतर पार
आज जो हल्ला केला ते पाकिस्तानी नसतील जर्मनी वरून आले असतील असं आहे का? जे आपल्या लोकांना आपलं म्हणत नाहीत त्यांच्या बाबत आपण काय बोलणार? असाही सवाल त्यांनी विचारला.
काश्मिरी हिंदुस्तानी आहेत. ९९ टक्के काश्मिरी हिंदुस्थान सोबत प्रामाणिक आहेत. आत्ता मसूरी मधे ज्या काश्मिरी मुलाना मारलं ते पाकिस्तानी आहेत का? ते हिंदुस्तानी आहेत. काश्मिरी आहेत. आपण त्यांना का वेगळं समजायचं? आता वेळ आली आहे आर नाही तर पारची लढाई लढण्याची, असा इशारा त्यांनी दिला.