AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जालन्याचं दाम्पत्य, ठाण्यातले 37 जण, पहलगाममध्ये अडकलेल्यांची सध्याची स्थिती काय?

Pahalgam Terror Attack : हल्ल्यात अनेकजण जखमी झाले असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचा मृत्यू झाला आहे.

जालन्याचं दाम्पत्य, ठाण्यातले 37 जण, पहलगाममध्ये अडकलेल्यांची सध्याची स्थिती काय?
pahalgam terror attack
| Updated on: Apr 23, 2025 | 5:02 PM
Share

Pahalgam Terror Attack : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला आहे. या हल्ल्यात एकूण 26 पर्यटकांचा दुदैवी मृत्यू झाला आहे. दहतवाद्यांनी नावं विचारून पर्यटकांना गोळ्या घातल्या आहेत. या हल्ल्यात अनेकजण जखमी झाले असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. असे असतानाच आता जम्मू-काश्मीरला फिरायला गेलेल्या महाराष्ट्रातील इतर पर्यटकांची काय स्थिती आहे, असे विचारले जात आहे. सर्व पर्यटकांना सुखरुप आणण्यासाठी सरकारने आपले प्रयत्न चालू केले आहेत. सरकारने हेल्पलाईन नंबरही जारी केले आहेत.

जालना जिल्ह्यातील साबळे कुटुंब सुरक्षित

मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्यातल्या भोकरदन तालुक्यातील राजूर गणपती येथील मनोज साबळे, पत्नी आणि छोटा मुलगा हे 3 जण सध्या जम्मू काश्मीर अडकले आहेत. ते सुखरूप असल्याची माहिती आहे. काल ज्या ठिकाणी दहशतवादी हल्ला झाला होता, त्या ठिकाणावरून अगदी काही अंतरावरच हे दाम्पत्य होतं. त्यामुळे या घटनेचा सर्व प्रसंग त्यांनी काल आपल्या आई-वडिलांना सांगितला. जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या हल्ल्यामुळे त्यांचं कुटुंब सध्या चिंताग्रस्त अवस्थेत आहे. या घटनेचा प्रसंग सांगत असताना साबळे यांच्या परिवाराला अश्रू अनावर झाले. साबळे दाम्पत्य सध्या सुखरूप असल्याची माहिती मिळाली आहे.

ठाण्यातील 37 पर्यटक सुरक्षित

दुसरीकडे ठाणे जिल्ह्यातील काही पर्यटक जम्मू-काश्मीरमध्ये अडकले आहेत. जिल्ह्यतील 40 पर्यटक पहलगाम येथे होते. या हल्ल्यात डोंबिवली शहरातील नवापाडा, पांडुरंग वाडी आणि नांदिवली परिसरात राहणाऱ्या हेमंत जोशी, संजय लेले आणि अतुल मोने या तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. इतर 37 पर्यटक सुरक्षित आहेत. मृतांच्या नातेवाईकांना सर्व प्रकारची मदत केली जात आहे.

कोण कोण सुरक्षित

या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मिर येथे सुरक्षित असणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील पर्यटकांची यादी मिळाली आहे. 23 एप्रिल 2025 दुपारी 2 वाजेपर्यंत मिळालेली ही माहिती आहे. अनुष्का मोने (35 वर्षे), ऋचा मोने (18 वर्षे), मोनिका जोशी (45 वर्षे), ध्रुव जोशी (16 वर्षे), कविता लेले (46 वर्षे), हर्षल लेले (20 वर्षे), भुषण अशोक गोळे (39 वर्षे), ज्योती अशोक गोळे (36 वर्षे), आरव भुषण गोळे (8 वर्षे), विनोद विश्वास गोळे (41 वर्षे), माधुरी विनोद गोळे (41 वर्षे), विहान विनोद गोळे (11 वर्षे), स्वाती विश्वास गोळे (36 वर्षे), अतुल प्रकाश सोनवणे (42 वर्षे), प्रियंका अतुल सोनवणे (34 वर्षे), अनन्या अतुल सोनवणे (12 वर्षे), अर्णव अतुल सोनवणे (8 वर्षे), नंदकुमार म्हात्रे (65 वर्षे), निलिमा म्हात्रे (65 वर्षे), निशांक म्हात्रे (31 वर्षे), प्रमदा पाटील (30 वर्षे), सुजन पाटील (63 वर्षे), आशा पाटील (60 वर्षे), नेहा ठाकूर (35 वर्षे), मनोज ठाकूर (39 वर्षे), विहान ठाकुर (07 वर्षे), संजय म्हात्रे (58 वर्षे), स्वाती म्हात्रे (49 वर्षे), नेत्रा भूषण पांगेरकर (37 वर्षे), भूषण इंद्रनाथ पांगेरकर (40 वर्षे), इंद्रायणी इंद्रनाथ पांगेरकर (65 वर्षे), श्लोक भूषण पांगेरकर (12 वर्षे), विहान देवेन ढोलम (05 वर्षे), गौरव सांगळे (37 वर्षे), दिपाली सांगळे (35 वर्षे), स्वाती सांगळे (40 वर्षे), वेद सांगळे (07 वर्षे), शुभ क्षीरसागर (10 वर्षे), मनाली प्रणय ठाकूर (28 वर्षे), प्रणय ठाकूर (29 वर्षे).

हेल्पलाईन क्रमांक जारी

या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने नागरिकांना आवाहन केले आहे की, पहलगाम येथे आपल्या जिल्ह्यातील कोणी व्यक्ती असल्यास किंवा आपल्या ओळखीतील कोणी नातेवाईक किंवा व्यक्ती असल्यास त्याची माहिती तत्काळ 9372338827 आणि 7304673105 या क्रमांकांवर जिल्हा प्रशासनास कळवावी.

त्याचप्रमाणे श्रीनगरमध्ये पर्यटकांसाठी चोवीस तास मदत कक्ष सुरू करण्यात आला असून जिल्हा मुख्यालयात जिल्हाधिकारी कार्यालयात 24 तास कार्यरत असलेला आपत्कालीन नियंत्रण कक्ष आणि मदत डेस्क स्थापित करण्यात आला आहे. या कक्षाच्या माध्यमातून पर्यटकांना कोणत्याही वेळी मदत मिळू शकेल. त्यांना काही अडचण आल्यास किंवा आपत्कालीन परिस्थितीत ते खालील क्रमांकावर संपर्क साधू शकतात.

दूरध्वनी क्रमांक: 0194-2483651, 0194-2457543, व्हॉट्सॲप क्रमांक: 7780805144, 7780938397 अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.