पंकजा मुंडेंना फोन करण्याचा प्रयत्न करत असाल तर ही बातमी आधी वाचा, ‘अनवेल’चं ट्विट

| Updated on: Oct 01, 2021 | 5:37 PM

भाजप नेत्या तसेच माजी मंत्री पंकजा मुंडे यांची प्रकृती बिघडली आहे. त्यांच्या घशात फोड आले असून त्यांना डॉक्टरांनी आगामी चार दिवस बोलणं टाळण्याचा सल्ला दिला आहे. मुंडे यांना घशामध्ये फोड तसेच  टॉन्सिल्सचाही त्रास सुरु झाला आहे.

पंकजा मुंडेंना फोन करण्याचा प्रयत्न करत असाल तर ही बातमी आधी वाचा, अनवेलचं ट्विट
PANKAJA MUNDE
Follow us on

मुंबई : भाजप नेत्या तसेच माजी मंत्री पंकजा मुंडे यांची प्रकृती बिघडली आहे. त्यांच्या घशात फोड आले असून त्यांना डॉक्टरांनी आगामी चार दिवस बोलणं टाळण्याचा सल्ला दिला आहे. मुंडे यांना घशामध्ये फोड तसेच  टॉन्सिल्सचाही त्रास सुरु झाला आहे. आगामी चार दिवसांत पंकजा मुंडे कोणालाही भेटणार नाहीत. तसेच त्या कोणाचेही कॉल स्वीकारणार नाहीत. ट्विट करत पंकजा मुंडे यांनी ही माहिती दिली आहे.

चार दिवस नो कॉल्स.. नो मिटिंग

पंकजा मुंडे यांना सध्या घशाचा त्रास सुरु झाला आहे. त्यांच्या घशात फोड आले आहेत. तसेच त्यांना टॉन्सिल्सचा टॉन्सिलायटीस हा आजार झाला आहे. त्यामुळे आगामी दोन ते चार दिवस बोलणं कटाक्षाने टाळण्यााचा सल्ला त्यांना डॉक्टरांनी दिलाय.  डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मुंडे आगामी चार दिवस कोणालाही भेटणार नाहीत. तसेच त्या कोणाचेही कॉल स्वीकारणार नाहीत. थोडक्यात काय तर मुंडे यांना कार्यकर्ते तसेच कोणत्याही व्यक्तीला भेटता येणार नाही.

राज्य सरकारने आई-वडिलांची भूमिका पार पाडावी

यापूर्वी मराठवाड, नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी केली होती. तसेच त्यांना राज्य सरकार आणि सामाजिक न्यायमंत्री धनंयज मुंडे यांच्यावर टीका केली होती. “मदतीच्या आश्वासनाचं काय हा माझा प्रश्न आहे. पालकमंत्री जिल्ह्याला वाऱ्यावर सोडून पुण्याला रवाना झाले. राज्य सरकार हे आई-वडील आहे. तर केंद्र सरकार ग्रँड प्यारेन्ट्स म्हणजे आजी-आजोबा असतात. त्यामुळे केंद्राची मदत येईलच, तो विषय वेगळा आहे. पण राज्य सरकारने आई-वडिलांची भूमिका पार पाडावी” असं पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या.

धनंजय मुंंडेंचा पंकजा यांच्यावर पलटवार

तर दुसरीकडे पंकजा मुंडे यांच्या याच टीकेला धनंजय मुंडे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “त्याच अनेक दिवस अमेरिकेत गायब होत्या. त्यांना माहित नाही या पावसाळ्यात बीड जिल्ह्यात 11 वेळा ढगफुटी झाली. त्या प्रत्येकवेळी आम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर होतो. आताच्या अतिवृष्टीतही मी मंत्रीमंडळ बैठकीला हजर न राहता बीडमध्ये रात्री लोकांच्या मदतीसाठी गेलो होतो. रात्री अनेक लोकांना पुरातून आम्ही बाहेर काढले” असा धनंजय मुंडे यांनी पलटवार केला.

इतर बातम्या :

नांगरे पाटील म्हणजे मविआचे माफिया, सोमय्यांच्या नव्या आरोपानं खळबळ, नेमकं काय म्हणाले?

VIDEO : प्रेयसीचं ऐकलं आणि काय झालं… आधी मारहाण, नंतर चपलेचा हार घालत गावात धींड, मुलीच्या कुटुंबियांनी पोलिसातही नेलं

जयंत पाटलांकडून फडणवीसांच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाची पाठराखण! तज्ज्ञांच्या मतावर बोलणं टाळलं

pankaja munde feeling unwell have tonsillitis and blisters in throat advised strict voice rest for four day