पंकजा म्हणाल्या, जिल्ह्याला वाऱ्यावर सोडून पालकमंत्री पुण्याला गेले, धनंजय मुंडे म्हणतात, तुम्ही तर अमेरिकेत गायब होता

जिल्ह्याला वाऱ्यावर सोडून पालकमंत्री पुण्याला गेले या भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या टीकेला राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी उत्तर दिलं आहे.

पंकजा म्हणाल्या, जिल्ह्याला वाऱ्यावर सोडून पालकमंत्री पुण्याला गेले, धनंजय मुंडे म्हणतात, तुम्ही तर अमेरिकेत गायब होता
Dhananjay-Munde_Pankaja-Munde


मुंबई : जिल्ह्याला वाऱ्यावर सोडून पालकमंत्री पुण्याला गेले या भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या टीकेला राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी उत्तर दिलं आहे. “त्याच अनेक दिवस अमेरिकेत गायब होत्या. त्यांना माहित नाही या पावसाळ्यात बीड जिल्ह्यात 11 वेळा ढगफुटी झाली. त्या प्रत्येकवेळी आम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर होतो. आताच्या अतिवृष्टीतही मी मंत्रीमंडळ बैठकीला हजर न राहता बीडमध्ये रात्री लोकांच्या मदतीसाठी गेलो होतो. रात्री अनेक लोकांना पुरातून आम्ही बाहेर काढले” असं धनंजय मुंडे म्हणाले. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

तुमची चांगली भावना असती तर मागच्या अतिवृष्टीत तुम्ही बांधावर दिसला असता. मी बीड जिल्ह्यात जे प्रचंड नुकसान झालंय त्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिली आहे. मी याबाबत मुख्यमंत्र्यांकडेही भेटीची वेळ मागितली आहे. सांगली, कोल्हापुरात पूर आला त्यापेक्षा वाईट परीस्थिती आहे. सरसकट तातडीने मदत मिळावी अशी मागणी आम्हीही केली आहे, असं धनंजय मुंडे यांनी सांगितलं.

आरोग्य योजना

दरम्यान, ज्येष्ठ नागरिकांसाठी राज्य सरकारने ही आरोग्य योजना आणली आहे. शरद पवार यांच्या नावानं राज्यात वृद्धांसाठी आरोग्य योजना आहे. जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडेंनी ही मोठी घोषणा केली. ‘शरद शतम’ असं या योजनेचं नाव आहे. या योजनेनुसार महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिकांना काही टेस्ट मोफत देण्यात येणार आहेत.

65 वर्षावरील सर्व वयोवृद्धांच्या आरोग्य चाचण्या मोफत केल्या जाणार आहेत. वर्षातून एकदा या सर्व चाचण्या मोफत केल्या जाणार आहेत. या चाचण्यांमुळे आजाराचे निदान वेळेवर होऊन उपचार करता येतील. लवकरच‌ प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत ठेवला जाईल, असं धनंजय मुंडे यांनी सांगितलं.

पंकजा मुंडे नेमकं काय म्हणाल्या होत्या? 

“मदतीच्या आश्वासनाचं काय हा माझा प्रश्न आहे. पालकमंत्री जिल्ह्याला वाऱ्यावर सोडून पुण्याला रवाना झाले. राज्य सरकार हे आई वडील आहे, तर केंद्र सरकार ग्रँड प्यारेन्ट्स म्हणजे आजी-आजोबा असतात. त्यामुळे केंद्राची मदत येईलच, तो विषय वेगळा आहे. पण राज्य सरकारने आई-वडिलांची भूमिका पार पाडावी” असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

VIDEO : धनंजय मुंडे नेमकं काय म्हणाले?

संबंधित बातम्या  

जिल्ह्याला वाऱ्यावर सोडून पालकमंत्री पुण्याला गेले, पंकजांचा धनंजय मुंडेंवर हल्ला

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI