AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

परळीत पंकजाताईंचाच दबदबा, बँकेच्या निवडणूकीत संपूर्ण पॅनलचा दणदणीत विजय

बीड जिल्ह्यातील परळी येथील वैद्यनाथ बँकेवर मंत्री पंकजा मुंडेंचे वर्चस्व कायम राहिले आहे. संचालक मंडळ निवडणुकीत दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे जनसेवा पॅनलचे सर्व 13 उमेदवार विजयी झाले आहेत.

परळीत पंकजाताईंचाच दबदबा, बँकेच्या निवडणूकीत संपूर्ण पॅनलचा दणदणीत विजय
Pankaja Munde
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Aug 12, 2025 | 9:36 PM
Share

बीड जिल्ह्यातील परळी येथील वैद्यनाथ बँकेवर मंत्री पंकजा मुंडेंचे वर्चस्व कायम राहिले आहे. संचालक मंडळ निवडणुकीत दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे जनसेवा पॅनलचे सर्व 13 उमेदवार विजयी झाले आहेत. या बँकेत 17 सदस्यीय संचालक मंडळ आहेत. मात्र यातील चार उमेदवार याआधीच बिनविरोध निवडून आले होते. त्यानंतर 13 जागांसाठी शनिवारी मतदान पार पडले होते. आज मतमोजणी होऊन निकाल जाहीर झाला आहे. यात सर्व 13 जागा पंकजा मुंडे-धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने जिंकल्या आहेत.

या विजयानंतर माजी खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांच्यासह संचालक मंडळ लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची समाधी असलेल्या गोपीनाथ गडावर नतमस्तक झाले. यावेळी बोलताना माजी खासदार प्रीतम मुंडे म्हणाल्या की, ‘बँकेचे पॅनल हे निश्चितच निवडून येणार होते हा आम्हाला विश्वास होता. जेव्हा वैद्यनाथ बँकेचा विषय येतो, सर्वसामान्य माणूस वैद्यनाथ बँकेचा खातेदार आहे. ही मुंडे साहेबांची बँक आहे हा एक विश्वास आहे. या विश्वासाच्या अनुषंगाने विजय निश्चित आमचा होणार असा विश्वास होता.

पुढे बोलताना प्रीतम मुंडे म्हणाल्या की, ‘या निवडणुकीकडे आम्ही पक्ष राजकारण म्हणून बघत नाही. विरोधात कोणत्या पक्षाचे लोक होते आणि काय अशा गोष्टीकडं न बघता वैद्यनाथ बँकेची निवडणूक सर्वसामान्य माणसाची निवडणूक होती. निवडणुकीची टर्म दुसरी असली तरी, अनुभव मात्र तीन टमचा आला असेल म्हणायला हरकत नाही. वैद्यनाथ बँकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून जिल्ह्यात पुन्हा एकदा नव्याने सुरुवात झाली आहे. पंकजाताईंच्या नेतृत्वाखाली हा जो चढता आलेख आहे असाच आम्ही ठेवू शकू मला विश्वास आहे.’

दरम्यान, पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखालील दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे जनसेवा पॅनलच्या सर्व उमेदवारांचा विजय झाला आहे. विजयी उमेदवारांमध्ये विनोद सामत, प्रकाश जोशी, डॉ. राजाराम मुंडे, संदीप लाहोटी, प्रवीण देशपांडे, महेश्वर निर्मळे, विजय वाककेर, अमोल डुबे, कुलभूषण जैन, राजेंद्र लोमटे, सुशांत लोमटे, मनमोहन कलंत्री, रमेश कराड यांचा समावेश आहे.

Follow Us
ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात...
Shivsena | उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात नीरज किशन कौलांचा मोठा युक्तिवाद
मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा
Amit Shah | अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा, राजकीय भेटीगाठींकडे लक्ष
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती...
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती चिंताजनक
महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण!
CM Fadnavis | महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण! मंत्रिमंडळात अर्धा तास सविस्तर चर्चा
मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद!
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद! फडणवीसांसमोर मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी...
Manoj Jarange | मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी प्राणाची आहुती देण्याची तयारी
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना...
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना भरावे लागणार शुल्क, व्हिडिओ बघाच
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था