AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ते कोसळले, हृदय बंद, डॉक्टरांनी केली कमाल थेट 10 मिनिटात पुन्हा हृदय सुरू, अंगावर शहारे आणणार पुण्यातील व्हिडीओ..

पुण्यातून एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओने अंगावर काटा येत आहे. काळ आला होता पण वेळ आली नव्हती, असे म्हणण्याची वेळ आली. एका डॉक्टराने काही सेकंदात रूग्णाला नवजीवन दिले.

ते कोसळले, हृदय बंद, डॉक्टरांनी केली कमाल थेट 10 मिनिटात पुन्हा हृदय सुरू, अंगावर शहारे आणणार पुण्यातील व्हिडीओ..
Pune
| Updated on: Jul 25, 2026 | 10:31 AM
Share

पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथील एका खासगी रुग्णालयात हृदयद्रावक प्रसंग घडला. ज्याचा सीसीटीव्ही व्हिडीओ तूफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येतोय. 60 वर्षीय रमेश जयसिंग मोरे हे तपासणीसाठी रुग्णालयात आले होते. अचानक रुग्णालयाच्या प्रवेशद्वारातच ते कोसळले. डॉ. अतुल सुराणा यांनी तात्काळ धाव घेत तपासणी केली. यादरम्यान त्यांच्या लक्षात आले की, रुग्णाचे हृदय बंद पडले आहे. त्यानंतर त्यांनी सुमारे 10 मिनिटे सातत्याने सीपीआर (CPR) देत रुग्णाचे बंद पडलेले हृदय पुन्हा सुरू करण्यात यश मिळवले. डॉक्टरांच्या प्रसंगावधानामुळे आणि तातडीच्या उपचारांमुळे रमेश मोरे यांचे प्राण वाचले असून या घटनेची परिसरात मोठी चर्चा होत आहे. ही पूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे.

रमेश जयसिंग मोरे तपासणीसाठी रुग्णालयात आले होते. यावेळी ते टेबलजवळ पोहोचले असता ते अचानक जमिनीवर कोसळत होते. तिथे उपस्थित महिलेने त्यांनी पडताना पाहिले आणि पकडले. त्यानंतर अजून काहीजण पुढे आले आणि त्यांनी जमिनीवर कोसळण्यापासून मोरे यांना वाचवले. लोकांचा गोंधळ ऐकून डॉ. सुराणा तात्काळ बाहेर आले.

त्यांच्या लक्षात आले की, मोरे यांचे हृदय बंद पडले. डॉक्टरांनी कोणताही विचार न करता तात्काळ आहे त्याच जागेवर सीपीआर मोरे यांना दिले. तब्बल दहा मिनिटे ते सीपीआर देत होते. यावेळी उपस्थित लोकांनीही मदत केली. दहा मिनिटांच्या सीपीआरने मोरे यांचे हृदय पुन्हा सुरू झाले. काळ आला होता पण वेळ चांगली होती, असे म्हटले जात आहे.

डॉक्टरांनी मोरे यांना वाचवण्यासाठी किती जास्त प्रयत्न केले, हे या व्हिडीओवरून स्पष्ट होतंय. सर्वत्र डॉक्टर सुराणा यांचे काैतुक केले जातंय. दारातच कोसळलेल्या रुग्णावर डॉक्टरांनी तातडीने उपचार केले आणि त्याला नवे जीनवदान दिले. डॉक्टरांनी केलेल्या सीपीआरनंतर मोरे उभे राहताना देखील दिसत आहेत. आता तोच व्हिडीओ सोशल मीडियावर चांगला व्हायरल झाला आहे.

Follow Us
जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी....
Manoj Jarange | जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी मिळणार की ब्रेक लागणार?
छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत
CM Devendra Fadnavis | छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत; मुख्यमंत्री फडणवीसांचा नेमका कोणाला टोला?
सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा सदावर्तेंवर पुन्हा घणाघात
Ambadas Danve vs Gunaratna Sadavarte | सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा गुणरत्न सदावर्तेंवर पुन्हा घणाघात; पुढे म्हणाले...
आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता...
Atul Bhatkhalkar On Aaditya | आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता संतापलाच
ब्रिक्स परिषदेसाठी इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेशकियान भारतात दाखल!
BRICS Summit 2026 | ब्रिक्स परिषदेसाठी इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेशकियान भारतात दाखल! आज पंतप्रधान मोदींसोबत काय होणार चर्चा?
KDMC शिवसेना नगरसेवकाकडून डॉक्टरांना मारहार प्रकरणी सुनावणीत काय घडलं?
KDMC Doctor Marhan Case | KDMC शिवसेना नगरसेवकाकडून डॉक्टरांना मारहार प्रकरणी सुनावणीत काय घडलं?
वाशिममध्ये पावसाअभावी खरीप पिकांची अवस्था बिकट
Washim Soyabean Farmer Issue | वाशिममध्ये पावसाअभावी खरीप पिकांची अवस्था बिकट
ओबीसींना ओपनमध्ये टाकण्याचा डाव सुरू! नाना पटोलेंचा गंभीर आरोप
Nana Patole On OBC | ओबीसींना ओपनमध्ये टाकण्याचा डाव सुरू! नाना पटोलेंचा गंभीर आरोप; राज्यपालांच्या भेटीनंतर राजकारण तापलं
दिशा सालियान प्रकरणी भाजप नेते अतुल भातखळकरांची मोठी प्रतिक्रिया
दिशा सालियान प्रकरणी भाजप नेते अतुल भातखळकरांची मोठी प्रतिक्रिया
गणेशोत्सवाआधीच तुकाराम मुंढेंच्या FDA ची मोठी कारवाई; तब्बल 4 कंटेनर..
गणेशोत्सवाआधीच तुकाराम मुंढेंच्या FDA ची मोठी कारवाई; तब्बल 4 कंटेनर भरुन...