मोठी बातमी! शिवसेनेच्या वर्धापनदिनीच बंडखोरांविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका, पिटिशन तडकाफडकी फेटाळली, कोर्टात नेमकं काय घडलं?
आज शिवसेनेचा वर्धापन दिन आहे. शिवसेना ठाकरे गटात मोठी फूट पडली आहे, या सर्व पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे, तर दुसरीकडे बंडखोरांविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे.

आज शिवसेनेचा वर्धापन दिन आहे. वर्धापन दिनानिमित्त शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गटाकडून मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. शिवसेना ठाकरे गटात मोठी फूट पडली आहे, शिवसेना ठाकरे गटाच्या 6 खासदारांनी बंडखोरी केली आहे. हा शिवसेना ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान या सर्व बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे. तर दुसरीकडे आज आणखी एक मोठी घडामोड घडली आहे, ती म्हणजे बंडखोर लोकप्रतिनिधिंच्या विरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र सुप्रीम कोर्टाने ही याचिका फेटाळून लावली आहे, समोर मोठं कारण आलं आहे.
न्यायालयात नेमकं काय घडलं?
समोर आलेल्या माहितीनुसार बंडखोर लोकप्रतिनिधींविरोधात सु्प्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती, परंतु या याचिकेवर सुनावणी घेण्यास भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी नकार दिला आहे. सोबतच याचिकाकर्त्यांना कोणत्या पक्षासंदर्भात ही याचिका दाखल केली आहे? असा सवालही न्यायालयाने केला आहे.
याचिकाकर्त्याने भ्रष्टाचार आणि पक्ष बदलणाऱ्या लोकप्रतिनिधींविरोधात याचिका दाखल केली होती. लोक प्रतिनिधींवर पक्ष बदलण्यासाठी दबाव टाकला जातो असंही याचिकाकर्त्याने आपल्या याचिकेमध्ये म्हटलं होत. परंतु याचिकाकर्ते वकील जया सुकिन यांनी आपल्या याचिकेमध्ये कोणत्याही पक्षाचा उल्लेख केला नव्हता. एक राज्य पूर्व भारतामध्ये आहे, तर दुसरं राज्य मध्य भारतामध्ये आहे. या राज्यातील नेते एका पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश करत आहेत.या बंडखोरीमुळे लोकशाही धोक्यात आली आहे, असं याचिकाकर्त्येंनी आपल्या याचिकेमध्ये म्हटलं होतं.
यावर प्रत्युत्त देताना सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी म्हटलं की तुम्ही मला एक मिनिट मागितला होता, मी तुम्हाला सात मिनिटं दिले. ही याचिका फेटाळून लावली जात आहे. ही याचिका अस्पष्ट आहे, तसेच तुम्ही जो दावा केला आहे, तो सामान्य आरोपांवर आधारीत आहे. तसेच हे आरोप सिद्ध करू शकेल असा एकही पुरावा तुम्ही सादर केलेला नाही, त्यामुळे या याचिकेची दखल घ्यावी असा एकही आधार आम्हाला दिसत नाही, त्यामुळे सुप्रीम कोर्टाने ही याचिका फेटाळून लावली आहे.