
साताऱ्याच्या उपजिल्हा रुग्णलयात काम करणारी एक कर्तव्यदक्ष डॉक्टर.. पण अत्याचार, शारीरिर व मानसिक छळ यामुळे तिने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली आणि मोठी खळबळ माजली. फलटणमीधल हॉटेलमध्ये तिचा मृतदेह सापडला आणि तिच्या हातावर एक सुसाईड नोटही लिहीली होती. तिच्या आत्महत्येनंतर अनेक नवे खुलासे होत आहेत. त्या महिलेने दोघआंवर आरोप केले होते, त्यातील एक आरोपी प्रशांत बनकर याला पोलिसांनी आज पहाटे अटक केली . तर पोलीस उपनिरीक्षक बदाने हा अद्याप फरार असून पोलिसांकडून त्याचा कसून शोध घेतला जात आहे. याप्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच राज्य महिला आयोगाने कठोर दखल घेतली असून
बदाने याला तत्काळ निलंबित करण्याचे आदेश फडणवीस यांनी दिले होते.
याप्रकरणातल तपासातून बरीच महत्वाची माहिती समोर आली आहे. तर दुसरीकडे मृत महिला डॉक्टरच्या आतेभावाने एक खळबळजनक आरोप केला. फलटण भागातले एक खासदार हे पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव टाकायचे असा आरोप त्यांनी केला आहे. राजकीय दबावाची शक्यताही त्यांनी बोलून दाखवली.
दरम्यान आता मृत महिला डॉक्टरच्या नातेवाईकांनी एक मोठी माहिती दिली आहे. त्यानुसार, त्या महिला डॉक्टरने मृत्यूच्या एक दिवस आधीच तिच्या वडिलांना कॉल केला होता. सुट्टी नसल्याने दिवाळीत येणं शक्य नाही, नंतर मी नक्की येईन असंही तिने तिच्या बाबांना सांगितलं, मात्र त्यानंतर होत्याचं नव्हतं झालं. मुलगी परतली नाही , गावातल्या घरात आला तो तिचा मृतदेहच… असं सांगताना नातेवाईकांच्या डोळ्या अश्रू तरळले.
पप्पा मला… वडिलांशी शेवटचं बोलणं काय झालं ?
मृत तरूणीच्या काकांच्या सांगण्यानुसार, ती घरच्यांशी , तिच्या वडिलांशी नियमितपमे बोलायची, कॉल करायची. मात्र तिला नेमका काय त्रास आहे, कोणत्या परिस्थितीमधून जावं लागतंय याबद्दल तिने ब्र ही उच्चारला नाही. 23 तारखेला तिने आत्महत्या केली, मात्र त्याच्या 1-2 दिवस आधीच तिचं वडिलांशी बोलणं झालं. 21 तारखेला आणि 22 तारखेलाही ती फोनवरून वडिलांशी बोलली. दिवाळीला घरी येण्याबद्दल त्यांचं बोलणं झालं, पण सध्या सुट्टी नाही, कामाचा प्रचंड ताण आहे, असं सांगत मला दिवाळीला आणायला येऊ नका, असं त्या तरूणीने वडिलांना सांगितलं. मी 8 दिवसांनी घरी येईन, असं आश्वासन तिने वडीलांना दिलं. पण दुसऱ्याच दिवशी तिच्या मृत्यूची दुर्दैवी बातमी कुटुंबाच्या कानावर आली आणि त्यांच्यावर दु:खाचा प्रचंड डोंगर कोसळला. जी मुलगी घरी यायची सगळे वाट पहात होते, गावात तिचा थेट मृतदेह आला.. ! तिच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.
मृत्यूच्या आधी काय घडलं ?
मिळालेल्या माहितीनुसार, ती महिला डॉक्टर फलटणमध्ये भाड्याच्या घरात रहात होती. पण मृत्यूच्या दिवशी तिने फलटणमधीलच एका हॉटेलमध्ये चेक -इन केलं, 2 दिवसांसाठी तिचं बुकिंग होतं. तिच्या रूमचा दरवाजा बराच वेळ उघडला नसल्याने हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना शंका आली आणि त्यांनी किल्लीने दरवाजा उघडला, तेव्हा महिला डॉक्टर मृतावस्थेत दिसली. तातडीने पोलिसांना पाचारण करण्यात आलं, तेव्हा पोलीस अधिकाऱ्यांना तिच्या हातावर लिहीलेला मजकूर, सुसाईड नोट आढळली. त्यामध्ये तिने पोलीस निरीक्षक गोपाल बदने व प्रशांत बनकर यांची नावे लिहीत तेच आपल्या मृत्यूसाठी जबाबदार असल्याचे नमूद केले होते.
Phaltan Doctor death case : महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात मोठी अपडेट, प्रशांत बनकरला अखेर अटक
त्यानंतर पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल करत शोधमोहिम सुरू केली. घटना उघडकीस आल्यापासून दोघेही फरार होते, त्यातील एक आरोपी प्रशांत बनकरला आज पहाटे त्याच्या मित्राच्या पुण्यातील फार्महाऊसमधून अटक करण्यात आली. तर पोलिस उपनिरीक्षक बदने हा अद्याप फरार असून त्याच कसून शोध घेण्यात येत आहे.