Phaltan Doctor death case : महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात मोठी अपडेट, प्रशांत बनकरला अखेर अटक
साताऱ्यामधील उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. आरोपी प्रशांत बनकर याला पोलिसांनी अटक केली आहे

साताऱ्यामधील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्या (Satara Doctor Suicide) प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. आरोपी प्रशांत बनकर याला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. त्याच्या शोधासाठी पोलिसांची चार पथकं रवाना झाली होती . अखेर प्रशांत बनकर याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तब्बल 24 तासांनी बनकर याला अटक केली आहे. मात्र या प्रकरणातील आणखी एक आरोपी PSI गोपाळ बदने हा 24 तासांनतरही फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.
डॉक्टर महिलेने मृत्यूपूर्वी एक सुसाईड नोट लिहीली होती. PSI गोपाळ बदने याने आपल्यावर 4 वेळा अत्याचार केल्याचं तिने नोटमध्ये लिहीलं होतं. तर प्रशांत बनकर याने आपला मानसिक व शारीरीक छळ केल्याचा आरोप करत त्या तरूणीने आयुष्य संपवलं होतं. या प्रकरणामुळे मोठी खळबळ माजली होती.
Phaltan Doctor death case : महिला डॉक्टरच्या मृत्यूने खळबळ, 10 तास आधी काय-काय घडलं?
कुठे लपला होता आरोपी ?
उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर महिलेने आत्महत्या केल्याचे काल उघडकीस आले. मृत्यूपूर्वी तिने हातावर एक नोट लिहीली होती. या सुसाईड नोटमध्ये तिने तिच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या दोन जणांची नावं स्पष्टपणे स्पष्टपणे नमूद केली होती. पोलीस निरीक्षक गोपाल बदने हा माझ्या मरणासाठी जबाबदार आहे, त्याने माझ्यावर 4 वेळा अत्याचार केला असं तिने लिहीलं होतं. तसंच प्रशांत बनकर यानेही गेल्या चार महिन्यांपासून माझा शारीरिक आणि मानसिक छळ केला असं तिने तिच्या नोटमध्ये लिहीलं होतं.
यानंतर दोन्ही आरोपी फरार झाले होते. पोलिसांकडून त्यांचा कसून शोध सुरू होता. अखेर या मृत्यूप्रकरणातील पहिला आरोप प्रशांत बनकर याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्या शोधासाठी पोलिसांची चार पथकं रवाना झाली होती. पुण्यातून पहाटेच्या सुमारास पोलिसांनी बनकरला अटक केली, अशी माहिती समोर आली आहे.
तर दुसरा आरोपी PSI गोपाळ बदने हा अद्यापही फरार असून त्याचाही कसून शोध घेण्यात येत आहे. दरम्यान ख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रकरणाची दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. हे प्रकरण आता चांगलंच तापलं असून शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी खळबळजनक आरोप केले आहेत. ‘ सर्व शासकीय कामात सत्ताधारी आमदार सचिन कांबळे आणि अभिजित निंबाळकर यांनी हस्तक्षेप केला’ असा दाव दानवे यांनी केला असून याप्रकरणातील दोषींना अटक करून कठोर शिक्षा देण्याची मागणीही त्यांनी केली.
