Phaltan Doctor Death case : डॉक्टर तरुणीचा शारीरिक आणि मानसिक छळ… पुण्याच्या फार्म हाऊसमध्ये लपला… प्रशांत बनकरला कसं पकडलं? वाचा A टू Z
सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरच्या आत्महत्येने खळबळ उडाली आहे. मृत्यूपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये तिने पोलीस निरीक्षक गोपाल बदाणे आणि प्रशांत बनकर यांच्यावर शारीरिक-मानसिक छळाचा गंभीर आरोप केला होता. या प्रकरणी आरोपी प्रशांत बनकरला अटक झाली असून, मुख्य आरोपी पोलीस निरीक्षक बदने अद्यापही फरार आहे. या घटनेमुळे पीडितेला न्याय मिळवण्याची मागणी तीव्र झाली आहे.

Phaltan Doctor Death case : साताऱ्यातील फलटणमधील उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर आत्महत्येमुळे अख्खा महाराष्ट्र हादरला आहे. मृत्यूपूर्वी त्या डॉक्टर तरूणीने हातावर सुसाई़ड नोट लिहीत त्यात दोघांचे नाव नमूद केले होते. पोलीस निरीक्षक गोपाल बदने याने माझ्यावर अत्याचार केला तसेच प्रशांत बनकर यानेही माझा शारीरिक आणि मानसिक छळ केला असे तिने सुसाईड नोटमध्ये नमूद केले होते. त्यानंतर बनकर आणि बदाने दोघेही फरार होते. त्या तरूणीच्या मृत्यूची घटना उघडकीस आल्यावर 24 तासांनी पोलिसांनी यातील एका आरोपीला अटक केली. तरूणीचा मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा आरोप असलेला प्रशांत बनकर याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या.
त्याच्या शोधासाठी पोलिसांची 4 पथकं रवाना झाली होती, बनकर याचा सर्वत्र कसून शोध घेण्यात येत होता. अखेर आरोपी प्रशांत बनकर याला पोलिसांनी अटक केली. सध्या त्याला फलटण पोलीस ठाण्यात ठेवण्यात आलं आहे. पुण्यातील मित्राच् तर या प्रकरणातील आणखी एक मुख्य आरोप पोलीस निरीक्षक गोपाल बदने हा मात्र अद्यापही फरार असून तो काही पोलिसांच्या ताब्यात सापडलेला नाही.
Phaltan Doctor death case : महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात मोठी अपडेट, प्रशांत बनकरला अखेर अटक
मानसिक-शारीरिक छळाचा आरोप
उपजिल्हा रुग्णालयात काम करणाऱ्या या डॉक्टरने दोन दिवसांपूर्वी फलटणमधील एका हॉटेलमध्ये चेकइन केलं. दिवसभर दरवाजा न उघडल्याने हॉटेल कर्मचाऱ्यांना संशय आला आणि त्यांनी तिच्या रुमचा दरवाजा उघडला असता ती खाली मृतावस्थेत आढळली. पोलिसांना तत्काळ या घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी त्या डॉक्टरचा मृतदेह ताब्यात घेतला असता तिच्या हातावर सुसाईड नोट लिहीलेली आढळली. त्यामध्ये तिने गापल बदने आणि प्रशांत बनकरवरआरोप केले होते.
Phaltan Doctor death case : महिला डॉक्टरच्या मृत्यूने खळबळ, 10 तास आधी काय-काय घडलं?
गोपल बदनेने माझ्यावर चार वेळा अत्याचार केला. तर प्रशांत बनकरने माझा मानसिक आणि शारीरिक छळ केला असा आरोप मृत डॉक्टरने लावला होता. हे दोन्ही आरोपी फरार होते, पोलिसांची अनेक पथके त्यांच्या शोधासाठी पाठवण्यात आली, मात्र त्यांचा काहीच पत्ता लागत नव्हता. मृत महिला फलटणमध्ये जिथे भाडेकरू म्हणून रहात होती, प्रशांत बनकर हा त्याच घरातील रहिवासी होता अशी माहिती समोर आली आहे. पीएसआय बदने याचा शोध अजूनही सुरू आहे, मात्र दुसरा आरोपी प्रशांत बनकर याला अटक करण्यात आली.
प्रशांत बनकरला कसं पकडलं ?
पोलिसांचे पथक बनकर याचा कसून शोध घेत होते. अखेर आज पहाटे त्याला पुण्यातून अटक करण्यात आली . बनकर हा पुण्यात त्याच्या मित्राच्या फार्महाऊमध्ये लपून बसला होता. मात्र ग्रामीण पोलिसांनी प्रयत्नांची शिकस्त करत, तीन तास त्याचा कसून शोध घेत आज पहाटे 4 च्या सुमारास त्याला शोधून काढलंच आणि त्याला बेड्या ठोकल्या.
मात्र त्या तरूणीच्या सुसाईड नोटमध्ये बलात्काराचा आरोप करण्यात आलेला आणि निलंबित झालेला पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने याला अटक कधी होणार हाच प्रश्न आता विचारला जात आहे. त्याच्या अटकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
