AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Phaltan Doctor death case : महिला डॉक्टरच्या मृत्यूने खळबळ, 10 तास आधी काय-काय घडलं?

Satara Phaltan Doctor Death Case : साताऱ्यातील महिला डॉक्टरने आपलं जीवन संपवल्याचीघटना काल उघडकीस आली आणि प्रचंड खळबळ माजली. मृत्यूपूर्वी त्या महिला डॉक्टरने हाताव काही ओळी खरडून आपल्या मृत्यूस जबाबदार असलेल्याची नावे नमूद केली आहेत. आत्महत्येंसारख टोकाचं पाऊल उचलण्याआधी त्या महिलेच्या आयुष्यात 10 तास काय काय घडलं त्याची माहिती समोर आली आहे.

Phaltan Doctor death case  : महिला डॉक्टरच्या मृत्यूने खळबळ, 10 तास आधी काय-काय घडलं?
| Edited By: | Updated on: Dec 18, 2025 | 11:48 PM
Share

Satara Phaltan Doctor Death Case : सातारा येथील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या तरूण महिला डॉक्टरने काल टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केली. मात्र त्यापूर्वी तळहातावर सुसाईड नोट लिहीत तिने आत्महत्येच कारण आणि त्यास जबाबदार असलेल्या लोकांची नावंही लिहीली होती. या महिला डॉक्टराने दोन पोलीस अधिकाऱ्यांवर गंभीर स्वरुपाचे आरोप केले, या आत्महत्याप्रकरणामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. PSI गोपाळ बदने याने आपल्यावर अत्याचार केल्याचे आणि प्रशांत बनकर याने मानसिक छळ केल्याचे तिने सुसाईड नोटमध्ये नमूद केले.

यामुळे केवळ वैद्यकीय क्षेत्र नव्हे तर संपूर्ण जिल्हा पोलीस दल हादरले आहे. दरम्यान ज्या दोघांवर महिला डॉक्टरने आरोप केले, ते दोघेही आरोपी सध्या फरार असून पोलिसांकडून त्यांचा कसून शोध घेण्यात येत आहे. त्यांच्या कुटुंबियांचादेखील जबाब नोंदवण्यात येत आहे. या महिला डॉक्टरच्या मृत्यूच्या 10 तास आधी काय घडलं, तिने हे टोकाचं पाऊल उचलण्याचा निर्णय कसा घेतला याची माहिती समोर आली आहे.

पहाटे हॉटेलमध्ये केलं चेकइन

मिळालेल्या माहितीनुसार, ही महिला डॉक्टर सातारा उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत होती. गेल्या काही महिन्यापासून ती बनकर यांच्या घरात भाड्याने रहात होती. परवा म्हणजेच 23 ऑक्टोबर रोजी पहाटेच्या सुमारास तिने फलटणमधील एका हॉटेलमध्ये चेक-इन केलं. ही रूम तिने 2 दिवसांसाठी बूक केल्याचे समजते. मात्र भाड्याचं घरं असतानाही ती हॉटेलमध्ये राहण्यास का गेली ते अद्याप स्पष्ट झालं नाही. हॉटेलमध्ये चेकइन करताना तिच्यासोबत कोणीच नव्हतं, ती एकटीच होती.

दारच न उघडल्याने संशय

मात्र तिने दिवसभर रुमचं दारच उघड़लं नाही. अखेर हॉटेल व्यवस्थापनातील कर्मचाऱ्यांना संशय आला आणि त्यांनी दुपारी 4 च्या सुमारास महिला डॉक्टरच्या रूमचा दरवाड उघडला. मात्र समोर तिचा मृतदेह आढळल्याने त्यांना धक्का बसला. तातडीने पोलिसांना पाचारण करण्यात आलं, तेव्हा पोलीस अधिकाऱ्यांना तिच्या हातावर लिहीलेला मजकूर, सुसाईड नोट आढळली.

महिला डॉक्टरने आत्महत्येपूर्वी तिच्या हातावर पेनाने सुसाईड नोट लिहिली होती. या सुसाईड नोटमध्ये तिने तिच्या मृत्यूसाठी जबाबदार असलेल्या दोघांची नावं स्पष्टपणे नमूद केली होती. पोलीस निरीक्षक गोपाल बदने हा माझ्या मरणासाठी जबाबदार आहे, त्याने 4 वेळा माझ्यावर अत्याचार केला. तसेच, प्रशांत बनकर यानेही गेल्या चार महिन्यांपासून माझा शारीरिक आणि मानसिक छळ केला असं तिने तिच्या नोटमध्ये लिहीलं होतं.

पोलिसांनी तिचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. महिला डॉक्टरचा मृत्यू हा गळफास घेतल्याने झाल्याचे पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलं. मात्र तिच्या शरीरावर कोणतीही जखम अथाव व्रण नव्हती असेही त्यात लिहीण्यात आलं होतं.

महिला डॉक्टरच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार

फलटणधील महिला डॉक्टरच्या आत्महत्येची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतली आहे.त्यांच्या आदेशानंतर सुसाईड नोटमध्ये नमूद करण्यात आलेल्या संबंधित पोलिसांच निलंबन करण्यात आलं आहे. दरम्यान आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरचे पार्थिव बीडमधील तिच्या गावी अँब्युलन्सद्वारे दाखल झाले. कडेकोट पोलीस बंदोबस्तात, शोकाकुल वातावरणात रात्री तिच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.