
साताऱ्यातील फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण सध्या संपूर्ण राज्यात गाजत आहे. बीडमधील एका डॉक्टर तरूणीने तळ हातावर सुसाईड नोट लिहीत आत्महत्या केली होती. यात पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदनेच्या नावाचा उल्लेख करण्यात आला होता. आता त्याच्यावर सर्वात मोठी कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणातील सहभाग समोर आल्यानंतर बदनेला पोलीस खात्यातून निलंबित करण्यात आले होते. मात्र आता त्याच्यावर मोठी कारवाई करण्यात आली आहे.
फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई करण्यात आली आहे. फलटण पोलीस ठाण्यातील निलंबित पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदनेला पोलीस खात्यातून बडतर्फ करण्यात आले आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी गोपाळ बदनेला सेवेतून केले बडतर्फ केले आहे. बदने सध्या न्यायालयीन कोठडीत असून पोलीस दलाची प्रतिमा मालिन केल्याचा ठपका ठेवत त्याला बडतर्फ करण्यात आले आहे.
महिला डॉक्टरने आत्महत्या करण्यापूर्वी तिच्या हातावर एक सुसाईड नोट लिहीली होती. माझ्या मृत्यूसाठी PSI गोपाळ बदने हा जबाबदार आहे, त्याने 4 वेळा माझ्यावर अत्याचार केला. तसेच, प्रशांत बनकर यानेही गेल्या चार महिन्यांपासून माझा शारीरिक आणि मानसिक छळ केला असं महिला डॉक्टरने तिच्या नोटमध्ये लिहीलं होतं.
या PSI गोपाल बदनेचे इतरही अनेक कारनामे समोर आले होते. त्याने फक्त मृत महिला डॉक्टरलाच नव्हे तर काही इतर महिलांनाही त्रास दिला होता अशी माहिती समोर आली आहे. PSI बदने हा अनेकदा महिलांची छेड काढायचा, एवढंच नव्हे तर त्यांना डोळाही मारायचा असाही धक्कादायक खुलासा झाला आहे.