
Satara Phaltan Doctor Death Case: फलटम येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात दिवसभरात वेगवेगळी माहिती समोर येत आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी प्रशांत बनकर आणि पीएसआय गोपाल बदने पोलीस कोठडीत आहेत. पोलीस त्यांची कसून चौकशी करत आहे. पण आता आरोपी पीएसआय गोपाल बनकरच्या अडचणीत वाढ झाल्याचे समोर आले आहे. नेमकं या प्रकरणात काय झालं? चला जाणून घेऊया…
बदनेने लपवला होता फोन
महिला डॉक्टरने आत्महत्या करण्यापूर्वी गोपाल बनकर आणि प्रशांत बनकर या दोघांवर मानसिक व शारिरीक छळाचा आरोप केला. तिने याबाबत हातावर नोट लिहिली. डॉक्टरच्या आत्महत्येनंतर पोलिसांनी तातडीने प्रशांत बनकरच्या घरी जाऊन त्याला अटक केली. त्यानंतर गोपाल बदने हा दोन दिवस फरार होता. पहिले तो पंढरपूर येथे गेला, त्यानंतर सोलापूर आणि मग कुटुंबीयांना भेटण्यासाठी बीडला गेला. त्यानंतर तो फलटण पोलीस ठाण्यात येऊन सरेंडर झाला. मात्र, सरेंडर होताना गोपाल बदनेने फोन जमा केला नाही. त्याने चालाखीने तो फोन लपवला होता.
कुटुंबीयांनीच केला फोन जमा
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गोपाल बदनेने लपवलेला फोन पोलिसांनी जप्त केला आहे. गोपाल बदनेच्या नातेवाईकांनीच फलटण शहर पोलीस ठाण्यात मोबाईल जमा केल्याची माहिती समोर येत आहे. गोपाल बदनेच्या मोबाईलमुळे महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात तपासाला गती येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता त्याच्या फोनमध्ये महिला डॉक्टरशी झालेले संवाद समोर येण्याची शक्यता आहे.
राज्य वैद्यकीय डॉक्टर संघटना करणार आंदोलन
डॉक्टर महिलेच्या आत्महत्या प्रकरणी चौकशी करावी या मागणीसाठी डॉक्टर राज्यभर काम बंद आंदोलन करणार आहेत. राज्य वैद्यकीय डॉक्टरांच्या संघटनेने हा इशारा दिला आहे. सोमवारपासून या आंदोलनाला सुरुवात होणार आहे. पहिल्या टप्प्यात सरकारला रिपोर्टिंग करणं बंद करणार तर सात तारखेपासून ओपीडी बंद आंदोलन करणार असल्याची माहिती समोर येत आहे. डॉक्टर महिलेने जे आरोप केले होते त्याची चौकशी व्हावी ही प्रमुख मागणी आहे