शिक्षकाचं नको ते कृत्य, मुलीला दुपारी एक्स्ट्रा क्लाससाठी बोलावलं आणि…

शिक्षकाने दोन मुलींनी एक्स्ट्रा क्लाससाठी बोलावलं आणि..., नको ते कृत्य करणाऱ्या नराधमाचं पितळ उघडं कसं झालं, 'त्या' दुपारी काय घडलं? पोलिसांचा याप्रकरणी तपास सुरु आहे... प्रकरणामुळे सर्वत्र खळबळ

शिक्षकाचं नको ते कृत्य, मुलीला दुपारी एक्स्ट्रा क्लाससाठी बोलावलं आणि...
फाईल फोटो
Updated on: Nov 04, 2025 | 11:10 AM

Pimpri – Chinchwad Crime : पिंपरी – चिंचवड येथून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. शिक्षकानेच अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनभंग केला आहे. ज्यामुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे. पूर्व परीक्षांच्या तयारीसाठी घेतल्या जाणाऱ्या क्लासेसमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. एक्स्ट्रा क्लासेसच्या नावाखाली बोलावून मुलीचा विनभंग करण्यात आल्याची माहिती समोर येताच शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चेतन चव्हाण असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचं नाव आहे.

दोन अल्‍पवयीन मुलींना जादा क्‍लासेसच्‍या नावाखाली बोलावून त्‍यातील एका अल्‍पवयीन मुलीचा शिक्षकाने विनयभंग केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी शिक्षक चेतन चव्‍हाण याने 17 वर्षीय अल्पवयीन पीडित मुलगी आणि तिच्‍या मैत्रीणीला जादा क्‍लासेससाठी बोलावलं होतं. आरोपीने शनिवारी दपारी दीड वाजता पीडित मुलीला बोलावलं आणि तिच्या मैत्रिणीला रसायनशास्‍त्राचा पेपर सोडविण्‍यासाठी देऊन चौथ्‍या मजल्‍यावर पाठवलं.

अल्पवयीन मुलीचा विनयभंग

मैत्रिणीला रसायनशास्‍त्राचा पेपर सोडविण्‍यासाठी देऊन चौथ्‍या मजल्‍यावर पाठविलं. त्या ती काय करते हे पाहण्यासाठी आरोपी अल्पवयीन मुलीला लिफ्टमध्ये घेऊन गेला आणि तिचा विनयभंग केला. त्‍यानंतर मुलगी आपल्‍या मैत्रिणीसोबत बसली असता ऑफिस बंद करण्‍यासाठी खाली चल म्‍हणून तिच्‍या मागे लागला. तिने विरोध केला असता डोळे मोठे करून तिला दम देत पुन्‍हा लिफ्ट मधून खाली येत असताना पुन्‍हा तिचा विनयभंग केला.

शिक्षक एवढ्यावरच थांबला नाही. तुला सोडवण्यासाठी घरी येतो… असं आरोपी म्हणाला. पण मला मावशीकडे जायचे आहे, असे सांगून तिने सुटका करून घेतली. नराधम शिक्षकाच्या तावडीतून स्वतःची सुटका केल्यानंतर पीडित मुलीने वडिलांना घडलेला सर्व प्रकार सांगितलं. त्यानंतर पीडित मुलीच्या वडिलांनी निगडी पोलीस ठाणे गाठत याप्रकरणी गुन्‍हा दाखल केला.

सांगायचं झालं तर, देशात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांचं प्रमाण दिवसागणिक वाढत आहे. राज्यात डॉक्टर महिलेच्या मृत्यूचं प्रकरण ताजं असताना,  राज्यातील इतर कोपऱ्यातून देखील महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत. फक्त बाहेरच नाही तर, घरात, शाळेत, क्लासेसे आणि कामाच्या ठिकाणी देखील महिलांना नको त्या प्रसंगाचा सामना करावा लागत आहे.