
मोठ्या प्रतिक्षेनंतर राज्यात महापालिकेच्या निवडणुका झाल्या. राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केले की, 15 जानेवारी 2026 रोजी मतदान आणि 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी प्रक्रिया पार पडेल. अनेक वर्षांपासून राज्यातील 29 महापालिकांवर प्रशासकीय राज होते. शेवटी निवडणुकांचे कार्यक्रम जाहिर करण्यात आले. गेल्या काही वर्षांपासून राजकारणात मोठ्या प्रमाणात समीकरणे बदलल्याचे बघायला मिळाले. जे पक्ष युती म्हणून निवडणुका लढायचे ते आता एकमेकांच्या विरोधात लढले. एका महापालिकेत युती तर दुसऱ्या महापालिकेत विरोधात निवडणुका लढवल्या गेल्या. राज्यात एनसीपी शरद पवार गट आणि अजित पवार गट वेगळे असून एकमेकांच्या विरोधात आहेत तर तेच महापालिकेच्या निवडणुकीत काही ठिकाणी एकत्र येत निवडणुका लढवताना दिसले.
राज्यातील महत्वाच्या आणि मोठ्या महापालिकेपैकी एक पिंपरी चिंचवड महापालिका आहे. कायमच अजित पवारांचे या पालिकेवर वर्चस्व बघायला मिळाले. मात्र, 2017 च्या निवडणुकीत मोठा धक्का देत पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजपाची सत्ता आली आणि सर्वच राजकीय समीकरणे बदलल्याचे बघायला मिळाले. अनेक दिग्गजांना धक्के बसले. आताही अजित पवारांनी महापालिकेच्या सत्तेवर दावा केला.
सोलापूरात निकालापूर्वीच किरण देशमुखांच्या विजयाचे बॅनर
जळगाव : दोन महिलांना यादीत नाव असूनही मतदान करता आले नाही
BMC Election 2026 Exit Poll Prediction : जेव्हीसीच्या एक्झिट पोलनुसार मुंबईत कोणाला किती जागा?
एक्झिट पोलनुसार मुंबईत शिवसेना ठाकरे गट, मनसेला धक्का
ठाणे मानपाडात मतमोजणी केंद्रावर राडा
राज ठाकरेंच्या जागा कमी येणार, एक्झिट पोलचा अंदाज
चारच्या प्रभागानुसार पिंपरी चिंचवडमध्ये निवडणुका लढवल्या जातात. एका प्रभागात 4 नगरसेवक निवडून येतात. प्रभाग क्रमांक 12 च्या निवडणुकीकडे सर्वांच्या नजरा आहेत. घरकुल, नेवाळे वस्ती, हरगुडे वस्ती, महादेव गोपाळ शिवरकर रस्ता, साने चौक चिखली, देहू-आळंदी रस्ता, सावतामाळी रस्ता, छत्रपती शिवाजी संभाजी मार्ग, स्वामी विवेकानंद मार्ग, व्हिनस हॉस्पिटल जाधव सरकार चौकापर्यंत, स्पाईन रस्ता इर्थपर्यंत प्रभाग 12 आहे. प्रभाग 12मध्ये एकूण लोकसंख्या 34,418 इतकी आहे.
वॉर्ड क्रमांत 13 ची लोकसंख्या 39 हजार 149 आहे. मोरे वस्ती, म्हेत्रे वस्ती, तळवडे चिखली शिवेवरील रस्त्यावरील हॉटेल तुळजाईपासून पूर्वीस श्रीमती हौसाबाई नारायण मोरे स्कूल लगतच्या रस्त्याने अष्टविनायक चौक ओलांडून गणेश इंटरनॅशनल स्कूल, चिखली आकुर्डी रस्त्यापर्यंत. चिखली आकुर्डी रस्त्याने दक्षिणेस साने चौकापर्यंत. आहे. गेल्या निवडणुकीत दोन भाजप, एक राष्ट्रवादी, एक मनसे असे चार उमेदवार विजयी झाले होते.
14 लोकसंख्या 35 हजार 711 आहे. अनुसूचित जातीची 5 हजार 713 तर अनुसूचित जमातीची 589 आहे. हा अत्यंत मोठा प्रभाग आहे. तळवडे रोड, प्रबोधन बोधनी इंग्रजी मीडियम शाळेपर्यंत. तळवडे चिखली शिवेपासून दक्षिणेस धनगर बाबा मंदिराच्या रस्त्याने त्रिवेणीनगर रस्ता ओलांडून व शिवरकर चौक ओलांडून कुदळवाडी इंडस्ट्रीयल रस्त्याच्या आनंदघन वृद्धाश्रापर्यंत व त्याच रस्त्याने पूर्वेस ओम साई चौक, चिखली आकुर्डी रस्त्यापर्यंत प्रभाग आहे.
महत्त्वाच्या लिंक्स
महाराष्ट्र महापालिका निवडणूक निकाल 2026 मतमोजणीचे लाईव्ह अपडेट्स
बीएमसी महाराष्ट्र निवडणूक निकाल LIVE TV
महाराष्ट्र महानगरपालिकेचा सर्वात वेगवान निकाल पाहा फक्त टीव्ही 9 मराठीवर LIVE