AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“माफ करा महाराज… या पेशव्यांच्या वंशजांनी तीन-चार महिन्यात…”, महाविकासआघाडीच्या व्हिडीओतून जोरदार हल्ला

सिंधुदुर्गातील मालवण परिसरात असलेल्या राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळला. या घटनेनंतर शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली होती.

माफ करा महाराज... या पेशव्यांच्या वंशजांनी तीन-चार महिन्यात..., महाविकासआघाडीच्या व्हिडीओतून जोरदार हल्ला
| Updated on: Aug 28, 2024 | 2:39 PM
Share

Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapsed : सिंधुदुर्गातील मालवण परिसरात असलेल्या राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळला. या घटनेनंतर शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली होती. या घटनेनंतर महाविकासाआघाडीने एक व्हिडीओ शेअर केला आहे. “माफ करा महाराज” अशा आशयाचा हा व्हिडीओ आहे.

काय म्हटलंय व्हिडीओत?

“माफ करा महाराज, माफ करा. तुमच्या पुतळ्याच्या अवस्थेलाच आम्हीच कारणीभूत आहोत. महाराज आम्ही यांच्या मोठमोठ्या घोषणा आणि आश्वासनांना बळी पडलो. आम्हाला माती आणि सोन्यातला फरकच कळला नाही. महाराज तुम्ही उभारलेल्या गडकिल्ल्यांचा प्रत्येक दगड शाबूत आहे. पण भ्रष्ट युतीने उभारलेला पुतळा आठ महिनेही टिकला नाही. महाराज तुम्ही स्वराज्याचं हित पाहिलं, रयतेचं हित पाहिलं. पण या भ्रष्ट युतीच्या नेत्यांनी स्वत:चंच भलं केलं. महाराज आम्हीच दोषी आहोत. कारण आम्ही तुमच्या पुतळ्यांच्या बाबतीत नेते म्हणून यांच्यावर भरवसा टाकला. पण यांनी कमिशनसाठी लाडका कॉन्ट्रॅक्टरच गाठला.

महाराज तुमचं नाव घेऊन सत्तेत येणारी लोकं, तुमच्यासोबतही नीच वागली. घात झाला महाराज… घात झाला… इथेच आमच्या वेड्या भावनेचा घात झाला. तुमच्या पुतळ्यांमध्येही यांनी टक्केवारीचाच डाव केला. पुतळा निर्मिताला दोन वर्ष लागतात पण निवडणुकीच्या तोंडावर या पेशव्यांच्या वंशजांनी तीन चार महिन्यात घाईत पुतळा निर्माण केला. महाराज सिमेंटमध्ये जान असून चालत नाही काम करणाऱ्यांच्या रक्तात इमान असायला पाहिजे, याचा आम्हाला विसर पडला. तुमच्या लोककल्याणकारी विचारांना पायदळी तुडवून यांनी मोठा अपराध केला. निवडणुकीसाठी फक्त तुमच्या नावाचा जयघोष केला महाराज. यांना कधीही महाराजांच्या विचारांची, तत्त्वांची आणि कार्याची कदरच नव्हती. त्यामुळेच यांनी शिवरायांच्या पुतळ्याची अशी अवस्था केली. यांना फक्त महाराजांच्या नावावर राजकीय पोळी भाजायची आहे. दुसरं काहीही नाही. पण माफ करा महाराज या गद्दारांना ओळखायला आम्ही चुकलो. आम्ही कधीकाळी डोक्यावर घेऊन नाचलो. पण आता तुमची शपथ… यांना सोडणार नाही…तुमच्यासोबत गद्दारी करणाऱ्यांचा शेवट करेपर्यंत…आम्ही शांत बसणार नाही…” असे या व्हिडीओत म्हटलं आहे.

नेमकं प्रकरण काय?

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा 35 फुटांचा भव्य पुतळा राजकोट किल्ल्याच्या परिसरात उभारण्यात आला होता. या पुतळ्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले होते. 4 डिसेंबर 2023 रोजी नौदल दिनाच्या निमित्ताने या पुतळ्याचे अनावरण करण्यात आलं होतं. मात्र काल (26 ऑगस्ट) छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा कोसळला. अवघ्या 8 महिने 22 दिवसांत शिवरायांचा हा पुतळा कोसळल्याने शिवप्रेमींमध्ये नाराजीची वातावरण आहे. या घटनेनंतर महाविकासाआघाडीकडून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.