PM Narendra Modi Baramati Visit: मोठी बातमी! PM मोदींचा बारामती दौरा रद्द; शरद पवारांची माहिती

बारामतीमधील विद्या प्रतिष्ठानच्या परिसरात उभारण्यात आलेल्या प्रेरणास्थळाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार होते. मात्र आता हा दौरा तुर्तास रद्द झाला असल्याची माहिती ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिली आहे.

PM Narendra Modi Baramati Visit: मोठी बातमी! PM मोदींचा बारामती दौरा रद्द; शरद पवारांची माहिती
| Updated on: Nov 20, 2026 | 1:49 PM

PM Narendra Modi Baramati Visit Update:  देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बारामती दौऱ्यावर येणार होते, मात्र तुर्तास हा दौरा रद्द करण्यात आला आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याची तारीख ठरणार होती. यासंबंधी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा बारामती दौरा तुर्तास रद्द झाला असल्याचं सांगितले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा बारामती दौरा रद्द! 

Loading...

याबाबत सविस्तर माहिती अशी की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बारामती दौऱ्यावर येणार होते. बारामतीमधील विद्या प्रतिष्ठानच्या परिसरात उभारण्यात आलेल्या प्रेरणास्थळाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार होते. मात्र आता हा दौरा तुर्तास रद्द झाला असल्याची माहिती ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिली आहे. आता स्वतः शरद पवार हे 12 डिसेंबर रोजी प्रेरणास्थळाचे उद्घाटन करणार आहेत.

याआधी 16 नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा आयोजित करण्यात आला होता. मात्र शरद पवार यांची प्रकृती बरी नसल्यामुळे हा दौरा पुढे ढकलण्यात आला होता. आज या दौऱ्यासंंबंधी नवी तारीख जाहीर होईल अशी चर्चा होती. मात्र आता हा दौरा रद्द करण्यात आला आहे. शरद पवार हे स्वतः त्यांच्या वाढदिवसाला म्हणजेच 12 डिसेंबर रोजी या प्रेरणास्थळाचे उद्घाटन करणार आहेत.

दरम्यान, आज खासदार शरद पवार यांच्यासह खासदार सुप्रिया सुळे, युगेंद्र पवार तसेच जय पवार हे विद्याप्रतिष्ठानच्या कार्यालयात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा रद्द झाल्याची माहिती दिल्यानंतर शरद पवार हे पुन्हा आपल्या गोविंदबाग या निवासस्थानी रवाना झाले. दुसरीकडे विद्या प्रतिष्ठानच्या सेंट्रल बिल्डिंगमध्ये खासदार सुप्रिया सुळे,युगेंद्र पवार आणि जय पवार यांची बैठक सुरू आहे.

राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चा…!

दरम्यान, राजकीय वर्तुळात सध्या राष्ट्रवादी विलिनीकरणाच्या चर्चा सुरु आहेत. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत जोर- बैठका सुरु असल्याचं बोललं जात आहे. याचदरम्यान, देशाचे पंतप्रधान बारामतीत येत असल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती. मात्र आता हा दौरा रद्द झाल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us