Sharad Pawar : पंतप्रधान नरेंद्र मोदी बारामतीला येणार, शरद पवारांनी दिली माहिती
Sharad Pawar : पंतप्रधान नरेंद्र मोदी बारामतीला भेट देणार आहेत. शरद पवार यांनी ही माहिती दिली आहे. शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांच्यात चांगले मैत्रीपूर्ण संबंध आहेत. शरद पवारांनी खुल्या मनाने अनेकदा नरेंद्र मोदी यांचं कौतुक सुद्धा केलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्रतील दिग्गज नेते शरद पवार यांची विचारधारा वेगळी आहे, त्यांच्यात राजकीय मतभेद आहेत. मात्र त्यापलीकडे जाऊन त्यांच्यात चांगलं मैत्रीचं नातं आहे. हे वेळोवेळी दिसून आलेलं आहे. शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत असले तरी त्यांना ते विविध प्रश्नावर दिल्लीत जाऊन सतत भेटत असतात. शरद पवारांनी खुल्या मनाने अनेकदा नरेंद्र मोदी यांचं कौतुक सुद्धा केलं आहे. शरद पवार आपल्या विरोधकावर करायची म्हणून टीका करत नाहीत. त्यात मुद्दा असतो. तसचं शरद पवार यांनी राजकारणापलीकडे मैत्री जपली आहे. मोदींसोबतच त्यांचं नातं सुद्धा तसचं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मनात सुद्धा शरद पवारांबद्दल तितकाच जिव्हाळा, प्रेम,आपुलकी आहे. हे वेळोवेळी दिसून आलय.
आता पंतप्रधान नरेंद्र मोदी बारामतीला भेट देणार आहेत. येत्या 3 नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी बारामतीला येणार आहेत. विद्या प्रतिष्ठानमध्ये होणाऱ्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत. शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बारामतीमध्ये आमंत्रित केले होते. काल पंतप्रधान कार्यालयाने एक कार्यक्रम पाठवला आहे. 3 नोव्हेंबरला मोदी बारामतीत येणार आहेत. नरेंद्र मोदी विद्या प्रतिष्ठानला भेट देणार आहेत. विद्या प्रतिष्ठानमध्ये गौतम बुद्धांचा 4 टन वजनाचा पुतळा बसवण्यात येणार आहे. पंतप्रधान मोदींच्या हस्ते त्या पुतळ्याचे अनावरण होणार आहे.
कार्यक्रमाचे कोणा-कोणाला निमंत्रण?
पुतळ्याभवती काही पेटिंग लावण्यात येणार आहेत. ज्यामध्ये जिजाऊ, शाहू महाराज, महात्मा गांधी, बाबासाहेब आंबेडकर, भाऊराव पाटील, अण्णाभाऊ साठे, यशवंतराव चव्हाण आणि शारदाबाई पवार यांचे पेटिंग लावण्यात येणार आहेत, शरद पवार यांनी ही माहिती दिली. राज्यपाल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. ऑक्सपर्ड विद्यापीठाचे प्रमुख त्यांनाही या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले आहे. खासदार पार्थ पवार यांना देखील निमंत्रण देण्यात आले आहे. सायरस पुनवाला यांनाही निमंत्रण देण्यात आले आहे.
