मोठी बातमी ! शरद पवारांच्या राष्ट्रवादीत खळबळ, आमदाराचं घर फुटलं, मुलाने केला भाजपमध्ये प्रवेश

Sharad Pawar NCP : पुणे महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का बसला आहे. एका आमदाराच्या घरात फूट पडली आहे. या आमदाराच्या मुलाने भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

मोठी बातमी ! शरद पवारांच्या राष्ट्रवादीत खळबळ, आमदाराचं घर फुटलं, मुलाने केला भाजपमध्ये प्रवेश
Sharad Pawar Sad
Image Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Dec 20, 2025 | 9:24 PM

राज्यातील महानगर पालिकांच्या निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. 29 महानगरपालिकांसाठी 15 जानेवारीला मतदान पार पडणार आहे. तर 16 जानेवारीला निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे सर्व पक्ष तयारीत व्यस्त आहेत. अनेक नेत्यांनी आपापल्या सोयीनुसार भाजपमध्ये प्रवेश केला आहे. अशातच आता पुणे महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का बसला आहे. एका आमदाराच्या घरात फूट पडली आहे. या आमदाराच्या मुलाने भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे भाजपची ताकद वाढली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

शरद पवारांना पुण्यात मोठा धक्का

पुणे महानगर पालिकेच्या निवडणुकीपूर्वी शरद पवारांना जबर हादरा बसला आहे. शरद पवार गटाचे आमदार बापूसाहेब पठारे यांचे सुपुत्र सुरेंद्र पठारे यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. त्यामुळे पुण्यात भाजपची ताकद आणखी वाढली आहे. सुरेंद्र पठारे यांच्यासह अनेक माजी नगरसेवकांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे आता आगामी निवडणुकीत भाजपला बळ मिलाले आहे.

अनेक पदाधिकाऱ्याचा भाजपमध्ये प्रवेश

शरद पवार गटाचे आमदार बापूसाहेब पठारे यांचे सुपुत्र सुरेंद्र पठारे यांच्यासह दिवंगत माजी आ. रमेश वांजळे यांच्या कन्या सायलीताई वांजळे, माजी नगरसेवक सचिन दोडके, माजी नगरसेविका रोहिणीताई चिमटे, बाळासाहेब धनकवडे, विकास दांगट, नारायण गलांडे, प्रतिभाताई चोरगे, पायलताई तुपे, प्रशांत तुपे, शुभांगीताई ढोले, संतोष मते, काँग्रेस नेते व माजी मंत्री वसंतराव चव्हाण यांचे सुपुत्र कणव चव्हाण, मुळशी तालुक्यातील उबाठा गटाचे कार्यकर्ते व पंचायत समिती माजी सभापती भानुदास पानसरे, उपतालुका प्रमुख गणेश पानसरे, कृष्णकुमार पानसरे, श. प. गटाचे तालुका अध्यक्ष आनंद माझिरे, उपाध्यक्ष संतोष पानसरे, सरचिटणीस सुहास पानसरे, उपाध्यक्ष किरण साठे, सचिन पानसरे या नेत्यांनी आणि पदाधिकांऱ्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.

पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री चंद्रकांत पाटील, माजी आ. संग्राम थोपटे, भाजपाचे पुणे जिल्हाध्यक्ष धीरज घाटे, माजी सभागृह नेते गणेश बिडकर, भाजपा माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन, श्रीनाथ भिमाले, योगेश मुळीक यांच्यासह भाजपाचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.